Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धरणगाव: प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविल्या प्रकरणी एका विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस एका अनोळखी तरूणाने दि.31 रोजी पळवून नेल्याची प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

Read More

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत बुधवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दोन‍ निकाल हाती आले. त्यामध्ये अनुसूचित जमाती संवर्गातून नितीन ठाकूर, विमुक्त जाती/भटक्या जमाती संर्वगातुन दिनेश चव्हाण आणि महिला संवर्गातून स्वप्नाली महाजन हे तिघे विजयी झाले. उर्वरीत सात जागांची मतमोजणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. रविवार दिनांक २९ जानेवारी रोजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २७ मतदान केंद्रावर एकुण सरासरी ४९ टक्के मतदान झाले होते. दहा जागांसाठी २७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. खुल्या संर्वगात ५ जागांसाठी ११ उमेदवार, इतर मागास संर्वगात एका जागेसाठी ३ उमेदवार, अनुसूचित जाती संर्वगात एका जागेसाठी ४ उमेदवार, अनुसूचित…

Read More

तुकोबांचा अपमान म्हणजे आमच्या बापाचा अपमान – भिमराज पाटील धरणगाव प्रतिनिधी येथील समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष, पंच मंडळ व समाज बांधवांनी जगद्गुरू तुकोबारायांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करण्याऱ्या धीरेंद्र शास्त्री च्या अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेत पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालयात निवेदन सादर केले.            बागेश्वर धाम येथील मनुवादी विकृत मानसिकता असलेल्या धीरेंद्र शास्त्री ने नुकतंच जगद्गुरू तुकोबाराय यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. हा विकृत प्रवृत्ती असलेला व्यक्ती म्हणतो की, ‘महाराष्ट्र के एक संत हैं संत तुकाराम करके उनकी बिवी उन्हे रोज पिटती थी ईसलीये वह ईश्वर की भक्ती करने लगे।’. ज्याला तुकोबाराय काय आहेत यांची इतंबूत माहिती नाही, ज्या व्यक्ती चे…

Read More

जळगाव : जळगाव  महानगरपालिका आयुक्तपदाचा मॅट’ने देत डॉ. विद्या गायकवाड यांच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. जळगाव महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना तडकाफडकी कार्यमुक्त केल्याचे आदेश २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अचानकपणे आले. त्यांच्या जागी परभणी येथील आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. शासकीय आदेशानुसार त्यांनी तत्काळ जळगाव येथे येत पदभार स्वीकारला होता. आदेश झाल्यावेळी डॉ. विद्या गायकवाड या पुणे येथे प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. हा एकतर्फी पदभार स्वीकारण्यात आला असल्याचा आरोप डॉ. विद्या गायकवाड यांनी करत मॅट’ने मध्ये तक्रार केली होती. ‘मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली. मात्र, निकाल…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्युज जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे स्विय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांनी नुकतीच अडावद येथे भेट दिली असता. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी  डॉ अक्षय पाटील  याची भेट घेतली. या प्रसंगी जिल्ह्यात सर्वच समाजात नावलौकिक असलेले व उत्तम सूत्रसंचालन करणारे कवी लेखक प्रफुल्ल नाना उपस्थित होते.

Read More

जळगावकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणारी कार व दुचाकी यांचा अपघात होऊन २ जण जागीच ठार झाले तर १ युवक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर पिंपळकोठा गावापासुन थोड्या अंतरावर सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. एम.एच.१५ एच.वाय ०७०० ही मर्सिडीज गाडी जळगाव कडून नाशिककडे भरधाव वेगाने जात होती. या गाडीने नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस धडक दिल्याने त्यात नितिन जामसिंग पाटील वय-२१वर्षे व घनश्याम भानुदास बडगुजर वय-२०वर्षे हे दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच गतप्राण झाले. याशिवाय ज्ञानेश्वर गणसिंग पाटील वय २२वर्षे हा पादचारी युवक गंभीर जखमी झाला. यावेळी माजी जि.प.सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, अशोक पाटील, राजेंद्र पाटील,…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी  एरंडोल येथील प्रसिद्ध ऑईल मिल चालकास एक पुरुष व एक महिलेने त्यांचे ऑईल मिल बाबत सरकारी कार्यालयात तक्रार करण्यात येईल अशी धमकी देवून त्यांचेकडून 7 ते 8 लाख रुपयांची खंडणी मागणी केल्याने सदर पुरुष व महिले विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशन भाग 5 CCTNS गुरनं. 13/2023 भादवि कलम 384, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी एरंडोल पोलिसांनी १ महिलेसह ५ पुरुषांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे कि , एरंडोल येथील मारवाडी गल्लीतील रहिवासी आनंद अनिल काबरे यांचे वडील नामे अनिल गणपती काबरे यांना एक पुरुष व एक महिलेने त्यांचे ऑईल मिल बाबत सरकारी कार्यालयात…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्युज : नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारी नाट्यानंतर सत्यजीत तांबे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आंदोलनाचे जुने फोटो व्हायरल होत आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोलपंपावरील फोटोला काळे फासले होते. याप्रकरणी तांबे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल आहे. आहे. तांबे यांना भाजपने पाठींबा देऊ केला आहे. भविष्यात ते भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. यानिमित्ताने सोशल मीडियात हे जुने फोटो व्हायरल करून या घटनेची आठवण करून देण्यात येत आहे. इंधन दरवाढीविरोधात आक्टोबर २०१८ मध्ये म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या सरकारच्या काळात युवक काँग्रेसने राज्यभर आक्रमक आंदोलन केले होते. तेव्हा…

Read More

माझ्या प्रत्येक भाषणाची कॅसेट होतय जळगाव : माझ्या भाषणा मधील वक्त्यव्याचा वर्तमान पत्रात, टीव्हीत कसे मेसेज जाणार, कुणी माझा काय मेसेज पाठवायचं हे त्यांनी ठरवल आहे. त्यामुळे विरोधक मला अडचणीत आणताना थकत आहे, त्यांची मला कीव येते. असा मिश्किल टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मावीच्या नेत्यांना लगावला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील हे जळगावात एका कार्यक्रमानिमित्‍ताने आज आले होते. या कार्यक्रमादरम्‍यान बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्‍य करताना विरोधकांवर निशाणा साधला. पण माझीही यंत्रणा मोठी.. केवळ मी बोलून चालत नाही. कुणीतरी त्याची स्क्रिप्ट तयार करयात. की, याने काही बोलावे आणि त्याचा असा अर्थ लावायचा. हा मस्त प्रोग्राम…

Read More

आनंद तरंग स्नेह संमेलनाचे उत्साहात शुभारंभ! धरणगाव प्रतिनिधी – विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारं हक्काचं व्यासपीठ म्हणजे शाळेचं स्नेहसंमेलन असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तीमत्व विकासासाठी स्नेह संमेलन उपयुक्त आहे. स्नेह संमेलनातील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थी घडले जातात. त्यांना विविध क्षेत्रात आवड निर्माण होते सुजाण नागरिक तयार होतात.विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध कलागुण जोपासावेत असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते बाल कवी ठोंबरे विद्यालय आयोजित आनंद तरंग स्नेह संमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे हेमालालकाका भाटिया हे होते. आज धरणगाव येथील श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालकवी ठोंबरे प्राथमिक…

Read More