Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

चाळीसगाव : प्रतिनिधी तहसील कार्यालयाच्या लिपिकाला अडीच हजारांची लाच घेताना धुळ्याच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, दीपक बाबूराव जोंधळे , वय- 47 फौजदारी लिपिक (दंडप्र) तहसील कार्यालय, चाळीसगाव जि. जळगाव, रा. शास्त्रीनगर प्लॉट नंबर 16 कापड मिल मागे चाळीसगाव जि. जळगाव. असे संशयिताचे नाव आहे. यातील तक्रारदार याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्या मध्ये मेहुनबारे पोलीस स्टेशन कडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी यांना…

Read More

जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यात ७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका नराधमाने अत्याचार करीत मृतदेह गोठ्यात टाकल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. स्वप्नील उर्फ सोन्या पाटील, वय १९, ता. भडगाव असे आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख,यांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना आदेश दिले होते.त्यावरुन स्थनिक गुन्हे शाखेचे सपोनि निलेश राजपुत, पोउपनिरी गणेश वाघमारे, गणेश चोभे, पोह विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, महेश…

Read More

जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षांपासून लाच घेण्याचे प्रमाण शासकीय विभागात मोठ्या प्रमाणात होत असून यावर जळगाव एसीबीचे पथक कारवाई करीत आहेत. नुकतेच बोदवड येथे रेशन कार्ड वर आईचे व मुलाचे नाव कमी करण्यासाठी व नवीन रेशन कार्ड तयार करून देण्यासाठी एक हजारांची लाच मागून ती स्वीकारल्याने बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा लिपिक उमेश बळीराम दाते, (55, बोदवड) यास जळगाव एसीबीच्या पथकाने कार्यालयातच रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Read More

निम्न तापी पाडळसे प्रकल्प २५ वर्षे रखडल्याने प्रकल्पाचा खर्च पाचपटीने वाढला प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, सत्यजित तांबे यांची विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मागणी प्रतिनिधी जळगाव: जिल्ह्यातील अमळनेरसह पाच तालुक्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. निम्न तापी पाडळसे प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून रखडलेला आहे. हा प्रकल्प रखडल्यामुळे प्रकल्पाचा खर्च पाचपटीने वाढला आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे दरवर्षी १० हजार दशलक्ष घनमीटर पाणी येथून वाहून जात आहे. हा प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे 54 हजार 936 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यापासून अलिप्त राहिले आहे. या प्रकल्पाचा प्रधानमंत्री…

Read More

जळगाव शहरातील नवीन आव्हाने रोड परिसरात असलेल्या केसी पार्क परिसरात रात्री आठ वाजेच्या सुमारास एका घरावर दगडफेक करीत गोळीबार झाल्याचे घटना घडली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन आव्हाने रोड परिसरात असलेल्या अशोक माने यांच्या घरावर रात्री आठ वाजेच्या सुमारास अनोळखी तरुणांनी दगडफेक करीत गोळीबार केल्याचे घटना घडल्याने परिसरात हा धरून गेला आहे या ठिकाणी लागलीच पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी संदीप गावित यांच्यासह जळगाव शहर पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते . शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट चेक करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

Read More

जळगाव- काही दिवसापूर्वी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची फेसबुक पेजवर बदनामी करण्यात आले होती. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे देखील फेसबुक पेजवरून बदनामी करण्यात आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना जळगाव ग्रामीण या फेसबुक पेजवर ७ एप्रिल ते 25 जुलै पर्यंत या पेजवर वेळोवेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर या फेसबुक पेजवर टाकण्यात आला होता. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय पोटे यांची नियुक्ती केली होती. या चौकशी अंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात इसमावर नगरसेवक गणेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ना. गुलाबराव पाटील यांची फेसबुक पेजवर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा…

Read More

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची बदली आयुष प्रसाद जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार : आशिया यांना यवतमाळ जिल्हाधिकारीपदाची धुरा जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया या दोघांची अचानक बदली झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची काल बदली झाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. या बाबतचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. त्यांच्या जागी पुणे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्ह्णून रुजू होणार असल्याचे त्या पत्रात नमूद केले आहे. राज्य शासनाने काल काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात जळगाव…

Read More

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली… जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल हे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार त्यांनी हाती घेतला होता त्यानंतर आज 21 रोजी त्यांच्या जागेवर आयुष प्रसाद यांची निवड केल्याचे पत्र सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी गेल्या वर्षभरा आधी जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार आपल्या हाती घेतला होता. त्यानंतर आज दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर प्रशासनातर्फे पुणे येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.

Read More

उमवित देणार नाट्यशास्त्र अभ्यासाचे धडे ! खान्देशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला असून प्रवेशासंबंधी नुकतीच जाहिरात निघाली. दरम्यान, मार्च २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. कुणाल पवार यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रभारी कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. कुणाल पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, नाट्यशास्त्र विभाग सुरू व्हावे, यासाठी कलावंतांनी बऱ्याच वेळा तत्कालीन कुलगुरूंची भेट घेऊन पाठपुरावा केला. अर्जसुद्धा करण्यात आले. त्यावर कुलगुरूंनी निधीचे कारण पुढे करून नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात येऊ शकत नाही, असे सांगून त्याबाबत असमर्थता दाखवली होती. परिणामी, कलावंत विद्यार्थी बाहेर जिल्ह्यात…

Read More

जळगाव – राज्यभरात पाऊस जोरदार बरसात असून जळगाव जिल्ह्यातील पावसाचा जोर सकाळ पासून कायम आहे. तापी नदीच्या क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हातनुर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने हातनूर धरणाचे ४१ दरवाजे रात्री उघडले आहे. त्यामुळे तापी नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. राज्यात पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसापासून सतत दार पाऊस सुरू असून रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. तापी नदी वरील हातनुर धरणात…

Read More