Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) ;- मुक्ताईनगर येथे शासकीय विश्रामगृह येथे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची बैठक संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित म्हणून प्रमुख पाहुणे भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव आकाश धनगर ,कुणाल कोल्हे, कोमल पाटील, जिल्हा समन्वयक योगेश कोळी ,निर्मल भालेराव ,भावेश रोहिमारे, नयन पाटील हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक अ.फ.भालेराव हे होते. यावेळी युवा परिषदेच्या तालुका पदाधिकाऱ्यांना प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील , जिल्हाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव कोमल पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच साहित्यिक अ. फ. भालेराव यांनी अध्यक्षीय भाषणात त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष निलेश मेढे यांनी…

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) ;- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी केली असतांना त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असून बँकेला ईडीची नोटीस प्राप्त झाल्याच्या चर्चेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची मुबई येथील ईडीच्या कार्यालयात सायंकाळी चौकशी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यातील एका खासगी साखर कारखान्याला कर्जपुरवठासह बँकेतील इतर आर्थिक व्यवहारासंबंधात सक्त वसूली संचालनालय अर्थात ईडी विभागाने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान जिल्हा बँकेला ही नोटीस प्राप्त झाल्याच्या माहितीने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.…

Read More

जळगाव ;- जिल्ह्यात प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज ११ रोजी जिल्ह्यात ३ रुग्ण आढळले असून ४ जण बरे होऊन घरी परतले आहे. तसेच २५ जणांवर उपचार सुरु आहेत. तसेच दिवसभरात एकाचाही मृत्यू झाला नाही .

Read More

जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांचा पत्रकार परिषदेत आरोप जळगाव (प्रतिनिधी ) शहर महापालिकेत प्रलोभने दाखवून सत्तांतर झाले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत एकाच कुटुंबातील दाम्पत्य असलेल्या विरोधी पक्ष नेता आणि महापौर पद असणे लज्जास्पद असल्याचा आरोप जळगाव फर्स्टचे समन्वयक डॉ. राधेश्याम चौधरी यांनी केला असून नैतिकतेच्या आधारे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी डॉ. चौधरी यांनी केली आहे. विरोधी पक्षनेतेपदी राहून सुनील महाजन यांनी नैतिकता बासनात गुंडाळली आहे. हे जनतेच्या हितासाठी नाही . सत्तेत शिवसेना आहे . मग विरोधी पक्षनेतेपदी असताना जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर आवाज उठविला आहे. मनपातील कोणता प्रश्न चव्हाट्यावर आणला आहे का ? समितीमध्ये महापौरांचा…

Read More

मुंबई (वृत्तसंस्था ) सध्या एकाच वेळी अनेक संकटाचा सामना १८,००० एसटी बसचा ताफा असणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ करत आहे. डिझेलसाठी पैसे नसल्यामुळे रद्द केलेल्या एसटी बसवर असणाऱ्या चालक आणि वाहकांना रजा घेण्यास सांगण्यात आल्याचा आरोप युनियनने केला आहे. गणेशोत्सवासाठी हजारो प्रवासी जाण्यासाठी रांगेत उभे असतानाही, गेल्या काही महिन्यांपासून पगाराच्या विलंबामुळे एसटी कामगारांना पैशांची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे. संथ गतीने सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबद्दल कामगार संघटना चिंता व्यक्त करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वेतन विलंबित आहे. पुढचा पगार कधी येईल हा प्रश्न नेहमीच असतो. बस चालवण्यासाठी डिझेलला पैसे नाहीत आणि यामुळे बस रद्द झाल्यावर कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यास सांगितले…

Read More

जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 32.8 टक्के वाढ जळगाव (प्रतिनिधी):- या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात 32.8 टक्के वाढ नोंदवण्यात आली. भारतातील ठिबक व तुषार सिंचनाचे संच उत्पादन करणाऱ्या प्रथम क्रमांकाची तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने 10 ऑगस्ट रोजी घेतलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या म्हणजे 2021-22च्या पहिल्या तिमाहीच्या आर्थिक निकालास मंजूरी दिली व ते जाहीर करण्यात आले. विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की, जागतीक पातळीवर कंपनीकडे 3804 कोटी रुपयांच्या ऑर्डर्स हातात आहेत. आर्थिक वर्ष 2021-22च्या पहिल्या तिमाहीचे ठळक वैशिष्ट्ये:- – एकत्रित करश्चात नफा 13.4 कोटी रुपये – एकत्रित कर,व्याज व घसाराकरपूर्व नफा 263.8 कोटी…

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर नियुक्त्या करण्यात आल्या असून कोरोना काळात ऑनलाईन परीक्षा घेण्याचे ठरले असताना परीक्षेसाठी नवीन प्रक्रिया राबविली गेली का ? अशा विविध प्रश्नांसाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू ई वायुनंदन यांची आज भेट घेण्यात आली . यावेळी अतुल कदमबांडे ,कुणाल पवार, शिवराज पाटील, विजय पाटील, रोहन सोनवणे ,आदी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदी नियुक्ती करताना विद्यापीठ कायदा २०१६ नुसार कलम १४ (५ ) नुसार प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रा. डॉ. मधुलिका सोनावणे यांची नियुक्ती देण्यात आली आहे. मात्र हि नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.…

Read More

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- एटीएममध्ये पैसै नसल्याने अनेकदा ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र या त्रासापासून आता ग्राहकांची मुक्ती होणार आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक आदेश जारी करत एटीएममध्ये पैसे नसलेल्या संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असे स्पष्ट केले आहे. १ ऑक्टोबरपासून हा नवा नियम लागू होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जाहीर केले. आरबीआयने सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना एटीएममध्ये वेळोवेळी पैसे भरण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास बँकांवर १० हजारांची दंडात्मक कारवाई केली जाईल. एटीएममध्ये कॅश उपलब्धतेबाबत आरबीआयने सर्व बँक अध्यक्ष,…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवरला काल नाशिक येथून अटक करण्यात आली होती. झंवर आज न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे अवसायक जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला, योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने सदर पतसंस्थेच्या मालमत्ता बनावट वेबसाइट तयार करून गुप्त कटातील साथीदार सुनील झंवर व त्याच्या फर्मच्या नावे बेकायदेशीररित्या वर्ग करून पूर्ण मोबदला न देता ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्‍क्‍याने विकत घेऊन त्यांच्या ७० टक्के रकमेचा व संस्थेच्या मालमत्तेचा अपहार…

Read More

जळगाव -राज्याच्या साहित्यिक क्षेत्रात अमूल्य योगदान आणि सर्वसामान्य जनतेला आपल्या अपूर्व साहित्य निर्मितीतून जीवन जगण्याचे सार सांगणाऱ्या कवियीत्री, खान्देश कन्या तथा निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक 2012 रोजी सुमारे तीन एकर जागेत आसोदा या त्यांच्या जन्मगावी मंजूर करण्यात आले होते.मात्र गेल्या नऊ ते दहा वर्षापासून या स्मारकाच्या कामाला आजपावेतो आवश्यक गती मिळालेली नाही. यामुळे खान्देशासह राज्यातील साहित्यिकांमध्ये नाराजीची वाढली असून खानदेशात बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाबाबत होत असलेली उपेक्षा मनाला वेदना देणारी आहे. याबाबत आपण आग्रही भूमिका घेत स्मारकाची उपेक्षा थांबवावी अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांचेकडे पत्राद्वारे केली आहे. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या…

Read More