Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव ;- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अभिवादन करून उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी महसुल श्रीमती शुभांगी भारदे, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसिलदार सर्वसाधारण सुरेश थोरात, तहसिलदार महसुल पंकज लोखंडे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Read More

जळगाव ;- इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलतर्फे रिंग रोड परिसरातील यशवंतनगरात इनरव्हील बोटॅनिकल फॉरेस्ट गार्डन साकारले आहे. यात 300 औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण केले. या ठिकाणी नागरिकांना शांततेत बसता यावे, त्यांना ताजी व शुद्ध हवा मिळावी, यासाठी बेंचेस देखील प्रदान करण्यात आले. भविष्यात हे अनोखे गार्डन आयुवैदीक औषधींसह शुद्ध ऑक्सिजनसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या औषधी व जास्तीत जास्त ऑक्सिजन देणार्‍या वनस्पतींच्या रोपांचे सर्वांनी संवर्धन करावे. इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलचा हा पर्यावरणासाठीचा आगळा-वेगळा जळगाव पॅटर्न ठरावा. या उपक्रमापासून इतरांनी प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा हा पॅटर्न राबवावा, असे मत माजी महापौर सीमा भोळे, भाजपाच्या दिप्ती चिरमाडे, महानगरपालिकेचे अभियंता योगेश वाणी…

Read More

जळगाव ;- सुप्रीम कंम्पनीजवळ असलेल्या शेतामधून अज्ञात चोरटयांनी पीव्हीसी पाईप लांबविल्याची घटना घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जफरोद्दिन रहिमोद्दिन पिरजादे (वय ७६, रा. जुना मेहरूण पिरजादेवाडा जळगाव) हे शेतकरी असून सुप्रिम कंपनीच्या जवळच त्यांची शेती आहे. १७ ऑगस्ट सकाळी ७ ते १८ ऑगस्टच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या २५ हजार रूपये किंमतीचे २० फुट लांबीचे ३५ पिव्हीसी पाईप आणि ५ हजार रूपये किंमतीचे इतर साहित्य असा एकुण ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

Read More

जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने सुरू असलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत’ प्रशिक्षण शिबीराचा उद्या ‍शनिवार दि.२१ ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पन्नास ‘सहाय्यता दूत’ पहिल्या टप्प्यात तयार केले जात असून त्यासाठी १७ ऑगस्ट पासून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. उद्या शनिवारी दुपारी २ वाजता या प्रशिक्षणाचा समारोप होणार असून यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रंजना पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांची उपस्थिती राहणार असून प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार अध्यक्षस्थानी राहतील अशी माहिती विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनिष जोशी यांनी दिली.

Read More

जळगाव ;- हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 7.00 वाजता धरणातून तापी नदीपात्रात 40894 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Read More

जळगाव ;- शहरात असणाऱ्या बोहरा गल्ली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आळून याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , योगेश बाबुराव पाटील (वय-४५) रा. इंद्रप्रस्थ नगर जळगाव हे हातमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. नेहमी प्रमाणे १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ते बोहरागल्लीत कामानिमित्त (एमएच १९ एमएम १३१८) दुचाकी पार्किंगला लावली होती. याबाबत त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.

Read More

जळगाव ;- आज जिल्ह्यात दिवसभरात २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे, तर ३ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले ३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. सध्या ३२ रुग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्हा प्रशासनाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६७३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार ६६ रुग्ण कोरोनामुक्त मुक्त होऊन घरी परतले आहे. तर आज पर्यंत २ हजार ५७५ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Read More

मुबई (वृत्तसंस्था ) आज मी जन आशीर्वाद यात्रेनिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी नतमस्तक झालो. साहेब आज तुम्ही आशीर्वाद द्यायला हवे होता असेही राणे यावेळी म्हणाले. जे काही घडले, तुमच्यामुळे घडलो. आज बाळासाहेब असते तर आशीर्वाद दिले असते. आज बाळासाहेब नसले तरीही आशीर्वाद डोक्यावर आहेत. बाळासाहेब असते तर म्हणाले असते की नारायण अशीच प्रगती करत रहा. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीचे स्मारक असो विरोधाची भाषा नको, त्या भावनेचा आदर करायला हवा असेही राणे म्हणाले. ज्यांना विरोधात बोलायचे आहे त्यांनी स्वतः बोलाव, उजव्या डाव्यांना बोलायला लावू नये. आम्ही त्यांनाही थेट उत्तर देऊ. कोणी आपल्यात मांजरीसारखे आडवे येऊ नये असेही राणे म्हणाले. येत्या महापालिका निवडणुकीत…

Read More

जळगाव;- यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या गावांसाठी जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकाराने विशेष आरोग्य शिबीरासह आदिवासी विकास विभागाच्या योजना, त्यांचे संरक्षण आणि कायदे,आपात्कालीन कार्य, वन्यजीव जनजागृती, कोरोना विषयक जनजागृती व लसीकरण मोहीम राबविण्यात आली. रावेर आणि यावल तालुक्यातील गारखेडा, उसमळी, जामन्या, गाडऱ्या आणि लंगडाआंबा या भागातील आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन बुधवारी सातपुडा विकास मंडळ, पाल संचलित जामन्या येथील आश्रमशाळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. शेख हे होते. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, अँड. सागर चित्रे, विजय दर्जी, शरद न्हायदे, यावल पंचायत…

Read More

जळगाव (प्रतिनिधी ) लोककलावंना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने शासन विविध स्तरावर विचार करत आहे. त्या अनुषंगाने लोक-कलावंताद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून त्याला आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्यस्तरावर लोककलावंत निवड समितीची स्थापना केली आहे. त्यात जळगावचे प्रसिद्ध लोकनाट्य कलावंत तथा खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांची सदस्यपदी निवड झाली. समितीत राज्यभरातून लोककलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, तज्ञांचा समावेश असून त्यात जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर या जिल्ह्यातील लोककलावंताची निवड व पडताळणी करून शासनाच्या या मदतीपासून कुठलाही लोककलावंत वंचित रहाणार नाही यांची दक्षता घेतली जाणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील कलावंताच्या संख्येनुसार प्रत्येक कलावंताला ५ हजार रुपयांची…

Read More