दोनगाव ता. धरणगाव येथील गावात आणि परिसरात शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे , गावाच्या शैक्षणिक विकासासाठी ज्यांनी भगिरथासमान प्रयत्न केला असे आर. डी. पाटील यांचे ज्येष्ठ बंधू जगन्नाथ देवचंद पाटील यांच्या शुभहस्ते विद्यालयात ध्वजारोहण संपन्न झाले. त्याप्रसंगी माजी सरपंच गोरखनाथ पांडुरंग पाटील , माजी मुख्याध्यापक डी. एस . पाटील , मुख्याध्यापक डी.ई. पाटील , दोनगाव चे उपसरपंच भाऊसाहेब सुरेश पंढरीनाथ पवार सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू उपस्थित होते.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे दि.२३ ते २५ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. दि.८ जून २०२१ पासून दि.३१ जुलै, २०२१ पर्यंत झालेल्या (उन्हाळी) झालेल्या परीक्षांचे निकाल जाहिर झाले असून या परीक्षेमधील बहिस्थ लेखी व बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेच आयोजन करण्याच्या निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. बहिस्थ लेखी परीक्षा दि.२३ ते २५ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या दरम्यान ऑनलाईन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यु) स्वरुपात स्मार्ट फोन/ लॅपटॉप/डेस्क स्टॉप वेब कॅमेरासह याद्वारे घेण्यात येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी या कालावधीत विद्यापीठ संकेतस्थळावर…
जळगाव;- केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे शनिवारी स्वच्छता पंधरवडा अंतर्गत जळगावातील अंबरनील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. केंद्र शासनाने १ ते १५ ऑगस्ट स्वच्छता पंधरवडा हाती घेतला आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाबळ परिसरातील अंबरनील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रत्येकाने एक वृक्ष संगोपनाची शपथ घेतली. प्रसंगी नेहरू युवा केंद्र सल्लागार समिती सदस्य विनोद ढगे, स्वयंसेवक हेतल पाटील, कोमल महाजन, दुर्गेश आंबेकर, रोहन अवचारे यांच्यासह दीपक परदेशी, आकाश धनगर आदी सहकारी उपस्थित होते. उपक्रमासाठी ट्री गार्ड के.के.कॅन्सचे रजनीकांत कोठारी, लक्ष्मी ऍग्रोचे…
जळगाव (प्रतिनिधी ) ;- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण कमी होत असून आज दिवसभरात केवळ २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जळगाव (प्रतिनिधी ) ;- आज 14 ऑगस्ट रोजी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थींचा सहभाग होता. कार्यशाळेत प्रा.सुरेश पांडे यांनी मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारे संभाषण कौशल्य, वैशिष्ट्यपूर्ण वर्तन, संवाद कौशल्य या महत्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन केले. सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला असंख्य अडचणींवर मात करण्यासाचे सामर्थ्य निर्माण करतो म्हणून कठीण प्रसंगी न डगमगता सकारात्मक विचाराने वाटचाल करावी . विचारात खूप सामर्थ्य असते म्हणून चांगले विचार करा तसेच व्यक्तिमत्व घडण्यात संगतीचा खूप मोठा वाटा असतो म्हणून केव्हाही चांगले मित्र निवडा असे अनमोल मार्गदर्शन केले आणि सोबतच स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काही…
धरणगावात बालकवी जयंती उत्साहात साजरी : औदुंबराचे केले रोपण धरणगाव (प्रतिनिधी) : ;- बालकवी म्हणजे धरणगावचे भुषण आहे. त्यांच्या स्मृती जतन करणं हे प्रत्येक धरणगावकरांचं कर्तव्य आहे. बालकवी स्मारकाचे काम रखडलेले असले तरी पुढील काळात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून आपण स्वतः त्यास गती देवू असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी यांनी केले. स्मारकाचे किरकोळ सुशोभिकरण नपातर्फ तात्काळ करुन देण्याची हमी त्यांनी घेतली. ते साहित्य कला मंच आयोजित बालकवींच्या १३१ व्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कबचौउमविचे सिनेट सदस्य प्रा. डी. आर. पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक मंचचे अध्यक्ष प्रा. बी.एन.चौधरी यांनी केले. स्मारकासाठी साहित्य कला मंच गेल्या…
जळगाव (प्रतिनिधी ) ;- धरणगाव तालुक्यातील दोनगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्रास पणे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील तरुण पिढी दारूच्या आहारी जात असुन गावातील शांतता आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यामुळे गावातील अनेक महिला भगिनी त्रस्त आहेत. गावात अनेक वर्षांपासून दारू बंदी होती परंतु गेल्या काही दिवसांपासून सर्रास पणे मोठ्या प्रमाणात दारु विक्री सुरू आहे. दारू विक्री ताबडतोब बंद होण्यासाठी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी पाळधी पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक यांना आज रोजी निवेदन दिले. दारू विक्री बंद न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांच्या सोबत निवेदन देण्यासाठी किशोर पाटील , उपसरपंच…
जळगाव;- भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील 265 गावांचा जल जीवन मिशन योजनेत नव्याने समावेश करुन या योजनांच्या खर्चासाठी लागणाऱ्या 58 कोटी 16 लाख रुपयांच्या निधीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज मंजूरी देण्यात आली. पालकमंत्रीस्तरीय जल जीवन मिशन समितीची बैठक येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी वरीलप्रमाणे मान्यता देण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम, डॉ हर्षल माने यांचेसह जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा…
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे आवाहन जळगाव ;- जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर पोलिस शिपाईपदाच्या १२८ रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन सादर केलेल्या अर्जात आवश्यक तो बदल करण्यासाठीच्या कालावधीत २२ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढ करण्यात करण्यात आली आहे. उमेदवारांनी महापोलिस या संकेतस्थळावर पोलिस कॉर्नर बटनला क्लिक करुन पासवर्ड बदलावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. पोलिस शिपाई पदाच्या १२८ रिक्त पदांची भरतीसाठी ३ सप्टेंबर रोजी जाहीरात देण्यात आली होती. शासनाने मराठा समाजासाठी निर्माण केलेला एसईबीसी प्रवर्गासाठी काही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या. सुप्रीम काेर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्याने मराठा समाजाच्या उमेदवारांना खुला किंवा…
जळगाव;- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत असून नवीन मतदार नोंदणी करताना एकल (Unique) मोबाईल क्रमांक नोंदविलेल्या मतदारांना ई-मतदान ओळखपत्र (e-EPIC) डाऊनलोड करण्यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत शनिवार, 14 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मदतीने संबंधित मतदान केंद्रावर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी पात्र मतदारांची यादी BLO यांना उपलब्ध करुन देण्यात आलेली असून 14 ऑगस्ट, 2021 रोजी शिबीराव्दारे तसेच जानेवारी, 2021 नंतर नोंदणी केलेल्या नविन मतदारांशी व्यक्तीगत संपर्क साधून जिल्ह्यातील 9 हजार 292 मतदार BLO यांचे मदतीने एकाचवेळी e-EPIC डाऊनलोड करणार आहेत. तरी जळगाव जिल्ह्यातील पात्र मतदारांनी…

