Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धरणगाव ;- जिल्ह्यात २६ पोलीस निरीक्षक आणि सहाय्य्क निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून आज धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी यांच्याकडून स्वीकारला. यावेळी नूतन पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनाही निरोप दिला.

Read More

जळगाव ;- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या गौरवशाली अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे व क्षेत्रिय लोक संपर्क ब्युरो, जळगाव यांच्यावतीने जळगाव जिल्ह्यात 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान जागर यात्रा फिरणार आहे. जळगाव जिल्ह्यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले. येणारे वर्षभर अमृत महोत्सवाचे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन शासनस्तरावर करण्यात येणार आहे. कोविडचे संकट अजुन संपलेले नाही. त्यामुळे कोविडच्या सर्व नियमांचे…

Read More

जळगांव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभागाच्यावतीने आयोजित स्व.डॉ.तेजपाल चौधरी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑनलाईन राष्ट्रीय व्याख्यानमालेचा बुधवारी समारोप झाला. प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार, केंद्रीय हिंदी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अनीलकुमार शर्मा, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.योगेश पाटील, समीक्षक डॉ. दिनेश चौबे, विभाग प्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. चौबे यांनी भारतीय संदर्भात तुलानात्मक साहित्य यावर भाष्य केले. तुलनात्मक साहित्य हे भारतीय अस्मितेला जीवंत ठेवते. नवीन संदर्भ आणि नवीन रूप यांची सांगड घालून तुलनात्मक साहित्य नवीन संदर्भांना जन्म देते. असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. अनीलकुमार शर्मा म्हणाले की, डॉ.तेजपाल चौधरी यांनी…

Read More

जळगाव ;- लहानपणापासूनच मिळेल ते काम करण्याची आवड… सतत काहीतरी नविन शिकण्याची जिज्ञासा…या जिज्ञासेतूनच १४० रुपये रोजाने कामासाठी येणार्‍या गणेश कोळी या तरुणाने वेळेचा सदुपयोग करत थेट पीएसआय पदापर्यंत घेतलेली झेप ही निश्‍चितपणे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. जळगाव तालुक्यातील खिर्डी या छोट्याशा गावातील रहिवासी असलेले शालिक कोळी ह्यांचा एकुलता एक मुलगा गणेश कोळी हे आज जळगावातील सायबर सेल विभागात पीएसआय म्हणून कार्यरत आहे. पीएसआयपर्यंतच्या या प्रवासाबाबत गणेश कोळी यांनी गोदावरी साप्ताहिकाशी दिलखुलास संवाद साधला. गणेश कोळी यांनी संवाद साधतांना सांगितले की, माझ्या आयुष्यात कुठलीही गोष्ट मी ठरवून केली नाही, सर्वकाही अनपेक्षितपणे घडत गेले आणि त्याचा स्विकार मी केला. लहानपणापासून…

Read More

जळगाव ;- डॉ. निलेश गोविंद किनगे इंटरवेंशनल न्यूरॉलॉजिस्ट ऍक्सऑन ब्रेन हॉस्पिटल हे जळगावातील सुप्रसिध्द मेंदूरोग तज्ञ असून त्यांच्या रुग्णालयात दिनांक १४ रोजी पाचोरा येथील वनराज समाधान भोई वय -38 वर्षे यांना अचानक पने डोकेदुखी आणि चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले . त्यामुळे तात्काळ त्यांना डॉक्टर निलेश किनगे यांच्या रुग्णालयात आणण्यात आले . यांनी तात्काळ रुग्णाचा सि.टी. स्कॅन करण्यास सांगितले . सि.टी. स्कॅन केल्यानंतर रुग्णाच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेला दिसून आला . त्यानुसार रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले त्यानंतर यांनी रुग्णाच्या मेंदूची अँजिओग्राफी केली असता त्यामध्ये रुग्णाच्या मेंदूमध्ये व्हाइडनेक अनुरीझम आढळला त्यातून रक्तस्त्राव होऊन रुग्णाला लकवा झाला . डॉक्टर…

Read More

धरणगाव;-  तालुक्यातील पाळधी दुरक्षेत्र पोलिस स्टेशन मंजुर असुन नविन पोलिस चौकी बांधण्या व स्टाॅप वाढवणे व नविन वाहणे बाबत ना.दिलिप वळसे पाटील ग्रृहमंत्री यांना मागणी चे निवेदन रा.का.पाटीॅ. जिल्हाध्यक्ष अरविंद माकरी यांनी दिले. पाळधी ता.धरणगांव येथिल पाळधी व परीसरातिल वर्दळ लक्षात घेता पाळधी दुर क्षेत्र पो.स्टे.ला स्टाॅप वाढवण्यांची.,मंजूर दुरक्षेत्र चौकीच्या बांधकाम सुरु करण्या बाबत ,नविन पोलिस वाहण मिळण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली. या निवेदनात कमी पोलिसांच्या कमी संख्येमुळे कायदा व सुव्यवस्था टिकण्यासाठी व कर्मचारी याचा तान कमी करण्यासाठी व पाळधी हद्दीत नॅशनल हायवे १४कि.मि. हद्द असल्यांने व बांभोरी पाळधी दोन मोठी गांवे व ईजिनिअरगि काॅलेज असल्यांने ते करावी अशी…

Read More

जळगाव ;- केंद्रीय मंत्र्यानी केलेल्या वक्तव्याचा आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे कि, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खा. राहुल गांधी यांच्याबाबत असभ्य शब्द वापरले. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीतही बेजबाबदार वक्तव्य केले. या दोन्ही मंत्र्यांचा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध व्यक्त करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर शहर जिल्हा उपाध्यक्ष शाम तायडे, शहर अध्यक्ष प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे,जाकीर बागवान,दीपक सोनवणे, मुजीब पटेल, योगेश देशमुख, शफी बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read More

जळगाव;- बोरी धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज 25 ऑगस्ट रोजी सकाळी 8.00 वाजता बोरी धरणाचा एक दरवाजे 0.15 मीटरने उघडण्यात आला असून बोरी नदीपात्रात 451 क्युसेक्स पाणी प्रवाह सोडण्यात आला आहे. तरी बोरी धरणाचे खालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नागरिकांनी जीवित वा वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Read More

बोदवड;- शहरातून दोन गायी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोदवड शहरातील रेणूका नगरात राहणारे सुभाष सिताराम देवकर (वय-५२) हे शेतकरी आहे. शेती व गुरांचे पालन करून उदरनिर्वाह करतात. २४ ऑगस्ट रोजी त्यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्यातून २० हजार रूपये किंमतीची गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे सकाळी ४.३० वाजता उघडकीला आले. गावात गायीचा शोध घेत असतांना त्यांच्या गावातील संजय पांडूरंग पाटील यांची देखील २० हजार रूपये किंमतीची गाय चोरीस गेल्याचे समजले, बोदवड परिसरात गुरांच्या चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातच आता दोन गायींची चोरी झाल्याचे उघडकीला…

Read More

यावल ;- तालुक्यातील अट्रावल सांगवी शिवारातून बैलाची चोरी करतांना एकाला शेतकऱ्याने पकडले आहे. यावल पोलीसात गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत विजय तावडे (वय-३५) रा. डोंगर सांगवी ता. यावल हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे बैलजोडी आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी त्याचा २० हजार रूपये किंमतीचा बैल अट्रावल सांगवी शिवारातील शेतात बांधले होते. अट्रावल गावातील किरण दिनकर कोळी याने बांधलेला बैल चोरून नेत असतांना त्याला रंगेहात पकडले आहे. शेतकऱ्यांनी त्याला चांगला चोप देवून यावल पोलीसांच्या हवाली केले आहे. चंद्रकांत तावडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी किरण कोळी याच्यावर…

Read More