Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी – दोन वर्षाच्या कोरोना काळात केंद्र व राज्य सरकार यांनी वेळोवेळी पूर्णतः लॉकडाऊन आणि काही वेळा निर्बंध घातल्याचा प्रतिकूल परिणाम उद्योग-व्यवसाय-व्यापारावर झाला. बहुतांश उद्योगांमध्ये कामगार यांना दीर्घ सुटी देण्यात आली किंवा कामगार कपात करावी लागली तर काहींनी वेतन कपात केली. अशाही स्थितीत जळगावमधील जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. मध्ये असे काहि न करता विविध कामांसाठी पदांवर नव्याने १०६० जणांना कायमस्वरूपी नोकरीची संधी देऊन सामावुन घेतले आहे. जैन इरिगेशन आणि संलग्न उत्पादक कंपन्यांवर सध्या वित्त पुरवठा विस्कळीत झाल्याचे संकट आहे. तरीही सामाजिक बांधिलकी ठेऊन नियमित सहकारी (कामगार) शिवाय रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात आल्या आहेत. सध्या जैन इरिगेशनच्या जळगाव स्थित…

Read More

जळगाव ;- डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये आजपासून विविध विभागातील कामांसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेे. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी परिसर संचालक डॉ.सुधाकर पाटील, प्राचार्य डॉ.पूनमचंद सपकाळे, डॉ. शैलेश तायडे, अतुल बोंडे, प्रा. शीतल पाटील, प्रा. ललित जावळे तसेच कार्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी देवेंद्र भंगाळे, माधुरी पाटील, मिलिंद तायडे, वाणी यांच्यासह कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक व सहाय्यक हे उपस्थित होते. यामध्ये शालेय कामकाजातील प्रवेश प्रक्रिया, रजिस्ट्रेशन प्रोसेस, पात्रता प्रक्रिया, स्कॉलरशिप, परीक्षा विभाग व इतर कामे या संबंधित सखोल मार्गदर्शन त्या त्या विभागातील तज्ञ व्यक्तींकडून केले जाणार आहे.

Read More

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने रासेयो जिल्हा व विभागीय समन्वयक यांची कार्यशाळा सोमवार, दि.२३ ऑगस्ट रोजी विद्यापीठात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम भवन येथे घेण्यात आली. यावेळी मंचावर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे, जिल्हा समन्वयक डॉ.मनीष करंजे (जळगाव), डॉ.सचिन नांद्रे(धुळे) आणि डॉ.विजय पाटील (नंदुरबार) हे होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्री.दिलीप पाटील यांनी दि.२४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत रासेयोच्या एकक दत्तक गावात कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा स्थापन करण्यात यावा असे सांगितले. सुरवातीस डॉ. नन्नवरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळेत झालेल्या चर्चेत २४ सप्टेंबर ते…

Read More

जळगाव/धुळे/नंदुरबार : गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निर्माण झालेला वीजमीटरचा तुटवडा परिणामी नवीन वीजजोडण्यांची मंदावलेली गती यावर महावितरणने धडक निर्णय घेत यशस्वी मात केली आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये सिंगल व थ्रीफेजचे तब्बल १५ लाख ७६ हजार नवीन मीटर मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर उच्च व लघुदाबाच्या ५ लाख १८ हजारांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी, मार्च २०२०मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरचा लॉकडाऊन तसेच इतर कारणांमुळे वीजमीटर उपलब्धता कमी होत गेली. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग काहीसा मंदावला होता. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी त्यावेळी घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत वीजमीटरचा तुटवडा संपविण्याचे व नवीन वीजजोडण्यांचा…

Read More

एरंडोल;- भरधाव वेगाने पारोळ्या कडून एरंडोल कडे जाणाऱ्या ट्रकने एरंडोल कडून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात दुचाकीवरील इंद्रसिंग दगडू पाटील वय २७ वर्षे व भूषण कौतिक पाटील वय २२ वर्ष हे जळू येथील युवक जागीच ठार झाले. ही दुर्घटना रविवारी मध्यरात्री घडली.ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की इंद्रसिंग दगडू पाटील व भूषण कौतिक पाटील हे दोघे युवक एरंडोल कडून एम.एच.२० एफ. क्यू. ७५०५ क्रमांकाच्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ने जळू येथे घरी जात असताना शहा पेट्रोल पंप नजीक पारोळ्या कडून कडून भरधाव वेगाने येणाऱ्या एम.एच.१९ झेड ४५२७ क्रमांकाच्या भरधाव…

Read More

चाळीसगाव ‘- चाळीसगाव शहरात गेल्या वर्षापासून रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे. नागरिकांनी याबाबत नगरपालिकेला वारंवार लिखित स्वरूपाची तक्रारी केल्या. मात्र प्रतिसाद शुन्य मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून तहसील कार्यालयापासून नगरपालिका दरम्यान ढोल बजाव आंदोलन सोमवार रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. यावेळी चाळीसगाव खड्डे मुक्त झालेच पाहिजे अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. दरम्यान येत्या पंधरा दिवसांत खड्डे बुजवण्यात आले नाही तर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांना इतर कामांसाठी पैसे आहेत. परंतु चाळीसगावातील विविध भागातील रस्त्यांसाठी पैसे नाहीत अशी खोचक टीकाही करण्यात आली. चाळीसगाव शहरात गेल्या वर्षभरापासून खड्ड्यांच्या समस्यांनी नागरिक त्रस्त…

Read More

पाचोरा ;-तालुक्यातील डोंगरगाव स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रच्या स्थापनेला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्वामी समर्थांच्या प्रतिमेचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. डोंगरगाव येथे 22 ऑगस्ट 2010(रविवार) या दिवशी केंद्राची स्थापना करण्यात आली.केंद्रात बेटी बचाव बेटी पढाव,वृक्षारोपण, विविध सण-उत्सव साजरे करून संपूर्ण गाव या निमित्ताने एकत्र येतात . आज पालखी सोहळ्यात सहभागी स्वामी सेवा केंद्राचे सहकारी बंधू -भगिनी गणेश भजनी मंडळ,दीपक पाटील, दीपक वाळके,भानुदास सावळे,समाधान सावळे ,नाना वाळके ,समाधान इजारे,योगेश कळवत्रे, राहुल गुजर,रामेश्वर बडक,दिनेश आवारे,ज्ञानेश्वर वखरे,जितेंद्र सावळे, मुकेश मापारी,महादू सावळे दगडू वखरे विजू बाबा सावळे यांच्यासह…

Read More

जळगाव –  आगामी होणार्‍या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस स्वतंत्र पॅनल निर्माण करुन जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप पाटील व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार शिरीष चौधरी ,प्रदेश सचिव डी.जी.पाटील, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, जिल्हा बँक संचालक डॉ.सुरेश पाटील,माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, माजी जि.प.सदस्य आर.जी. पाटील, विजय महाजन, अशोक खलाणे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, एस.टी. पाटील, विकास वाघ, जमील शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष शामकांत तायडे आदी उपस्थित होते.

Read More

जळगाव;- जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ४बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून १, भडगाव-१ आणि चाळीसगाव तालुक्यातून २ असे एकुण ४ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६८२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २६ बाधित रूग्ण हे जिल्ह्‌यातील विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण २ हजार ५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .

Read More

जळगाव ;- पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कृषी क्षेत्राविषयी व बळीराजाप्रती बांधिलकी म्हणून सुमीरा गांधी परिवार आणि नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे ३१ शेतकऱ्यांना पोळ्याचा साज वाटप करण्यात आला. हा अनोखा उपक्रम गेली ७ वर्षे नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमिरा परिवार यांच्यातर्फे करण्यात येत आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा असून बैलाच्या सजावटीच्या साहित्याने बाजार फुलले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांवरील रोग तसेच करोना संक्रमण यामुळे त्रस्त झालेले शेतकरी मात्र पोळा सणाकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना पोळ्यासाठी खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून पोळ्याचे…

Read More