Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

चाळीसगाव तालुक्यातील आश्रमशाळेत केली कारवाई जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका आश्रमशाळेच्या ग्रंथपालाने ७ हजारांची लाच स्वीकारताना त्याला जळगावच्या लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. कालबद्ध वेतनश्रेणी मंजुरीसाठी हि लाच स्वीकारली आहे. श्रीकांत गुलाब पवार (38) असे ग्रंथपालाचे नाव असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करगाव आश्रमशाळेचे ४१ वर्षीय कर्मचारी असून तक्रारदार यांची कालबध्द वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, जळगाव या कार्यालयाकडून मंजूर करून आणण्यासाठी यापूर्वी ऑनलाईन पवार यांनी 15 हजारांची लाच स्वीकारली होती व त्यानंतर प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्गीय विभाग नाशिक, येथून पदोन्नतीची थकीत रक्कम 85 हजार 519 टक्केप्रमाणे 12 हजारांची लाच पवार यांनी मागितल्यानंतर त्यामध्ये तडजोड होवून…

Read More

भरपाईसाठी शेतकर्‍यांचा अंत पाहू नका; पालकमंत्र्यांचा गर्भित इशारा जळगाव – जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रावेर, यावल, सावदा, चोपडा या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी या नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आता विमा कंपनी अधिकार्‍यांना शिंगाडे दाखविण्याची वेळ आली आहे. दरम्यान नुकसान भरपाईसाठी शेतकर्‍यांचा अंत पाहू नका असा गर्भित इशारा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी नुकसानीमुळे मेटाकुटीला आला आहे. आसमानी संकटासह सुलतानी संकटांचा देखिल शेतकर्‍याला सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी शासनाच्या…

Read More

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्पष्टीकरण जळगाव,‌ दि.२९ सप्टेंबर (जिमाका)- सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जळगाव जिल्ह्यात तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची पदभरती आता कंत्राटी तत्त्वावर होणार आहे. अशा अफवा व बातम्या पसरविल्या जात आहेत. ही बातमी खोटी आहे. यामध्ये कोणत्याही तथ्य नाही. असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन शाखेमार्फत ही जाहिरात निघाली होती. अशा प्रकारच्या जाहिराती वेळोवेळी निघत असतात. कोणत्याही प्रकारच्या भूसंपादन प्रक्रियेत आपल्याला अतिरिक्त मनुष्यबळ लागत असते. जे आपण त्या ठराविक कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावरती घेत असतो. यामध्ये आपणास टायपिंगचे काम करणारे डेटा एन्ट्री ऑपरेटर त्याचबरोबर भूसंपादन प्रक्रियेविषयी संपूर्णपणे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी : प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने मागुन येणाऱ्या दाम्पत्याची दुचाकी आदळून दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ममुराबाद गावानजीकच्या फार्मसी कॉलेजजवळ रविवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी झालेल्या दोघांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, पत्रकार संदीप सुरेश होले (वय-३६) रा. जुने जळगाव हे आपल्या पत्नी देवयानी संदीप होले यांच्यासोबत रविवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएस ४७७९) ने गेले होते. दुपारी ३ वाजता जळगाव येथे घरी परतत असतांना…

Read More

महानगरपालिकेची १७ रोजी मुदत संपतेय..! जळगाव : येथील जळगाव शहर महानगरपालिकेची १७ रोजी मुदत संपत आहे. सार्वत्रिक निवडणूक लगेच घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाच्या नगरविकास विभागातर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तांची प्रशासक म्हणून शुक्रवारी दि. १५ सप्टेंबर रोजी आदेशाद्वारे नियुक्त केली आहे. त्यामुळे आता मनपाचे आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे प्रशासक म्हणून पदभार आलेला आहे. जळगाव महापालिकेची मुदत १७ सप्टेंबर रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत कळविले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त…

Read More

राज्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाची अनेक जिल्ह्यात पदाधिकारी नियुक्तीचा कार्यक्रम सुरु असून यात जळगाव जिल्हाध्यक्षपदी संजय पवार यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाचे जेष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू सदस्य मानले जाणारे व जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संजय पवार याना नुकतेच जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीचे पात्र देण्यात आले आहे. संजय पवार हे जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्हा बँक चेअरमन, महाराष्ट्र राज्य पणन संचालक, जिल्हा दुध फेडरेशन संचालक , कॉटन मार्केट संचालक सहकार क्षेत्रात यांचे मोठे कार्य आहे. या नियुक्तीचे पत्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिले आहे. याना नुकतेच जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्याने सामाजिक, राजकीय क्षेत्रातून अभिनंदनच वर्षाव होत…

Read More

जळगाव शहरातील एका लॉजच्या आड अवैधरीत्या कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर यंत्रणेने छापा टाकत आंबटशौकीन पुरूषांसह पाच महिलांना ताब्यात घेतल्यानंतर शहरात खळबळ उडाली. ही कारवाई मंगळवार, 12 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडा मार्केट येथील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून पंटर पाठवल्यानंतर खात्री होताच छापा मारला. दरम्यान, या सर्व प्रकाराची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 5 महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले. या प्रकारामुळे परीसरात…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तक्रारदारासह नातेवाईकांना अटक न करण्यासह न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात ८ हजाराची लाच घेतांना पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकाला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जयवंत प्रल्हाद पाटील (वय-५४) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी आणि न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्यासाठी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडे ३० हजारांची मागणी केली. यापुर्वी पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी तक्रारदाराकडून २० हजार रूपये घेतले.…

Read More

जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना मासे विकून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला एकाने विनयभंग करीत तिच्या पतीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील हनुमंतखेडे शिवारात घडली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात विवाहिता आपल्या पतिसह वास्तव्याला आहे. मासेमारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. ३ सप्टेंबर रोजी पिडीत महिला ही आपल्या पतीसह हनूमंतखेडा शिवारातील शेताजवळ मासे पकडण्यासाठी गेले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास एका झाडाखाली महिला बसलेले होते. तिचे पती स्वयंपाकासाठी सरपण घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात गेले होते. दरम्यान, संशयित आरोपी राहूल विष्णू भिल हा तिथे आला. त्यावेळी त्यांने विवाहितेसोबत अश्लिल वर्तन…

Read More

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात नुकतीच एसीबीच्या कारवाईची घटना ताजी असताना आज देखील दोन जणांना लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक भीभमराव लहू नाईक (55) व कंत्राटी सेवक आनंद नारायण कडेवाल (34) यांना शेळी पालनासाठी प्रस्ताव सादर झाल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील अनुदानाची रक्कम प्राप्त करून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच मंगळवारी दुपारी अटक केली आहे. जळगावातील वसंतराव नाईक भटके विमुक्त जाती महामंडळाच्या कार्यालयाकडे यावल तालुक्यातील बोरावल येथील ४२ वर्षीय तक्रारदाराने शेळी पालन साठी एक लाख रुपयांचे कर्जाचे प्रकरण दाखल केले. त्यापैकी पहिला हप्ता 75 हजार…

Read More