प्रिंप्राळा रेल्वे उड्डाणपूलाचे नागपूरहून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण जळगाव येथून पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती जळगाव शहर व जिल्ह्यातील विकासाचा ध्यास घेऊन विविध विकास प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. प्रिंप्राळा रेल्वे उड्डाणपूलाचे वेळेत काम पूर्ण होऊन लोकार्पण होत आहे. निम्न-तापी-पाडळसे सारखे अनेक प्रकल्प जिल्ह्यात वेळेत मार्गी लागणार आहेत. त्यामुळे नुसतं जळगाव शहराचा विकास होत आहे असे नाही तर संपूर्ण जळगाव जिल्हा बदलतोय, विकासाकडे मार्गक्रमण करत आहे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे काढले. जळगाव शहराचा विकासाचा…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगर येथील वंजारी टेकडी जवळ जुन्या किरकोळ वादातून एका -२६ वर्षे तरुणाचा कोयता व चॉपर वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी समोर आली आहे. या घटनेत इतर दोन जण गंभीरित्या जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. अरुण बळीराम सोनवणे (वय-२६) रा.समता नगर जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, अरुण सोनवणे याचे काही दिवसांपासून त्याच परिसरात राहणारे इतर तरुणांसोबत किरकोळ वाद होता. दरम्यान या वादाच्या अनुषंगाने आज सकाळी देखील हा वाद झाला त्यानंतर हा वाद काही…
अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला पारोळा तालुक्यातील बोळे येथून अंत्यसंस्कार साठी जात असताना पिकअप कंन्टेनरचा अपघात झाला. यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिलेचा गंभीर अवस्थेत धुळे येथे उपचारासाठी जात असताना मृत्यू झाला. या अपघातात २१ जण जखमी झाले आहेत. पारोळा तालुक्यातील बोळे येथील २० ते २५ जण शिंदखेडा तालुक्यातील चिलाणे येथे अंत्यविधी साठी जात असताना त्यांच्या पिकअप गाडीला पारोळा शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या विचखेडे गावाजवळ हा अपघात झाला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात रेखाबाई गणेश कोळी (वय ५५), योगिता रवींद्र पाटील (वय ४०, दोन्ही रा. बोळे ता. पारोळा) यांचा जागीच तर चंदनबाई…
सेवानिवृत्ती निमित्त विद्यापीठ कर्मचारी वर्गाचा विद्यापीठ प्रशासनाकडून केला सन्मान! अकोला प्रतिनिधी: मनीष खर्चे शासकीय, निमशासकीय विभाग तथा खाजगी सेवेतील सेवानिवृत्ती हा कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे, मात्र ज्या विभागातील सेवेने आपल्याला मानसन्मान, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक बांधिलकी प्रधान केली आहे त्या सेवेतून निवृत्त होताना आनंदाची तथा दुःखाची संमिश्र भावना कर्मचाऱ्यांचे मनात असते असे सांगताना अतिशय सन्मानाने सेवानिवृत्तीला सामोरे जाणे हे प्रत्येक कर्मचाऱ्यांचे आयुष्यातील ध्येय असून तो त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषि डॉ. श्यामसुंदर माने यांनी केले. कुलगुरू डॉ शरद गडाख यांचे संकल्पनेतून सेवानिवृत्तीला सामोरे जाणाऱ्या विद्यापीठ स्तरीय अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना…
पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी जळगाव ग्रामीण मधील ७ पुलांसाठी १२ कोटींच्या कामांना मान्यता ! जळगाव प्रतिनिधी :- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव ग्रामीण मधील ७ पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटींच्या कामांना नुकतीच मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ आशियाई विकास बँक अर्थासाहित व नाबार्ड अर्थासहित योजनेतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात ७ पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या कामांना मंजुरी मिळाली असल्याने नागरिकाना मोठा दिलासा मिळणार असून मुख्यमंत्री ग्रामसडक…
मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती मुंबई/जळगाव,दि.९ नोव्हेंबर (जिमाका) – जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती लागू होणार आहेत. अशी माहिती मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. मंत्रालयातील वॉर रूम येथे आज मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी या बैठकीला मंत्रीमंडळ उपसमितीचे सदस्य सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषीमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपानराव भुमरे,…
गेल्या काही महिन्यापासून जळगाव शहरातील अनेक परिसरात गुन्हेगारी माजविणाऱ्या टोळ्यांच्या सदस्यांना हद्दपार करण्याचा सपाटा सुरु असताना आज पुन्हा तीन सराईत गुन्हेगारांना २ वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानक व रामानंदनगर पोलीस हद्दीत दरोड्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे, अशिल शिवीगाळ करणे, घातक हत्यार्याने दुखापत, दमबाजी करणे असे एकूण ०८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पाच गुन्हे सदरील टोळीने केले आहे. यात हद्दपार प्रस्ताव क्र. ०४/२०२३ प्रमाणे १) स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकुर वय १९ रा डीएन सी कॉलेज जवळ शंकर अप्पानगर जाळगांव (टोळी प्रमुख), (२) निशांत प्रताप चौधरी वय १९ रा…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्याचे माजी आ.बी.एस.पाटील यांच्या चारचाकीचा अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी सुदैवाने चारचाकी गाडीमध्ये माजी आ.पाटील हे नव्हते तर त्यांचे चालक असल्याचे समजते. हा अपघात नवलनगर जवळ दि.१० ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथून सर्व्हिसिंग करून येत असलेल्या माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या वाहनाला नवलनगर जवळ अपघात झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील नव्हते. केवळ चालक होता. तर गाडीतील दोन्ही एअर बॅगा उघडल्याने चालकही किरकोळ जखमी झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांची…
नाशिकमध्ये अमली पदार्थांचे साठे सापडल्यानंतर आ. तांबे यांचा इशारा – पोलीस महासंचालकांना पत्र, भरारी पथके तैनात करण्याची मागणी एकीकडे नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा सापडला असताना दुसऱ्या बाजूला शाळेजवळील सिगारेट-तंबाखु विक्री करणाऱ्या टपऱ्या महापालिकेच्या मदतीने हटवणारे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला होणे, ही बाब चिंताजनक आहे. नाशिकच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरांमध्ये आणि गावागावांमध्ये विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकणार नाहीत, यासाठी काळजी घेण्याची गरज आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. ‘उडता पंजाब’ सारखा ‘उडता महाराष्ट्र’ होऊ देऊ नका, असं आवाहन करत राज्यभरात पोलिसांनी भरारी पथकं तयार करून शाळांबाहेरील या अशा छोट्या टपऱ्या व दुकानांवर नजर ठेवावी, अशी…
शिरसोलीनजीक वसंतवाडी येथे घडली घटना प्रवीण पाटील लाईव्ह महाराष्ट्र प्रतिनिधी: जळगाव तालुक्यातील शिरसोलीनजीक असलेल्या वसंतवाडीत ४१ वर्षीय प्रौढाने सायंकाळी ५:३० सुमारास काठेवाडी वाड्याजवळ धरणात बुडाल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत रमेश भिवा चव्हाण हे बुडाले असून त्यांच्या शोधासाठी प्रशासनाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज तांडा येथील मुली या धरणावर भुलाबाई विसर्जन करण्यासाठी गेलेल्या होत्या तेथे रमेश चव्हाण हा तरुण त्या मुलींनजवळुन भुलाबाई घेऊन धरणाच्या पाण्यात विसर्जिन करून पोहत येत असतांना धरणाच्या मध्यम भागात आल्यावर अचानक बुडत असल्याचे धरणाच्या काठावर उभ्या असलेल्या युवकांच्या लक्षात आले त्याने व तेथे उपस्थित मुलींनी ही माहिती गावात कळवली त्यानंतर धरणावर…

