जळगाव । प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोटार सायकल चोरट्यास ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांचा सुगावा लागल्याने पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला आहे. दिपक सुनिल खरे (वय २२, रा. शहापुरा ता. पाचोरा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुभम राजेंद्र परदेशी ( शहापुरा पाचोरा) हा पसार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहेत. पाचोरा तालुक्यातील शहापुरा येथील काही महाविद्यालयीन तरुण कुठलाही कामधंदा न करता केवळ मौजमस्ती करण्याकामी पैशांची उधळपट्टी करत असल्याची माहिती पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. या महाविद्यालयीन तरुणांची माहिती घेण्याकामी त्यांनी पथकाला रवाना केले होते. दिपक सुनिल खरे या तरुणास…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव ;- जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार झाल्याने बुधवारी रात्री 10 वाजेपासून धरणाचे सर्वच्या सर्व 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. तापी नदीपात्रात 78 हजार 929 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. हतनुर धरणाची धोक्याची पातळी 214 आहे आणि आता 209.330 या लेव्हल वर पाणी पोहोचल्याने धरणाचे सर्व गेट उघण्यात आली आहे. हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मुंबई ;- स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबर अखेर राज्यातील साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई-पीक पाहणी देखील नोंदविली असल्याची माहिती प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक शेतकरी खातेदारांची नोंदणी जळगाव जिल्ह्यात (१.१९ लाख) झाली आहे. द्वितीय क्रमांकावर धुळे (९४ हजार) तृतीय क्रमांकावर अमरावती (८१ हजार) जिल्हा आहे. सर्वाधिक नोंदणी नाशिक आणि अमरावती विभागात झाली आहे. त्या खालोखाल प्रतिसाद कोंकण आणि नागपूर विभागात दिसून येतो आहे. ई-पीक…
नवी दिल्ली ;- कॉऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच सीआयएसीईने आयसीएसई आणि आयसीएस बोर्ड परीक्षा 2021 सेमेस्टर 1 परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर 1 वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार cisce.org वर CISCE च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण वेळापत्रक पाहू शकतात. ICSE आणि ISC या दोन्हीसाठी सेमेस्टर एकची परीक्षा 15 नोव्हेंबरपासून सुरू होईल. दहावीची परीक्षा 6 डिसेंबरला संपले तर बारावीची परीक्षा 16 डिसेंबरला संपणार आहे. दहावीच्या परीक्षा दररोज सकाळी 11 वाजता सुरू होतील आणि परीक्षेचा कालावधी 1 तास असेल. बारावीची परीक्षा दररोज दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा…
नवी दिल्ली वृत्तसंस्था ;- देशातील करोनाची दुसरी लाट ओसरली असल्याचे सांगण्यात येत असतानाच आता पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 43,263 करोनाबाधितांची भर पडली आहे तर 338 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 40,567 जण करोनामुक्त झाले आहेत. त्या आधी बुधवारी 37,875 नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 369 करोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशातील दर दिवशीच्या करोना रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही केरळमधून समोर येत आहे. बुधवारी केरळमध्ये 30,196 नव्या रुग्णांची भर पडली तर 181 जणांचा मृत्यू झाला. बुधवारची करोनाबाधितांची ही संख्या देशातील एकूण रुग्णसंख्येच्या…
मुंबई वृत्तसंस्था ;- संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्या लाटेची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत काल राज्यात एकाच दिवसात 15 लाखांपेक्षा अधिक लस मात्रा देत लसीकरणाचा नवा विक्रम महाराष्ट्राने नोंदवला आहे. बुधवारी रोजी दिवसभरात 15 लाख 3 हजार 959 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या 6 कोटी 55 लाखांवर गेली आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक 1 कोटी 79 लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिरसोली प्र.न.येथिल उपसरपंच श्रावण शंकर ताडे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज दुपारी शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतमध्ये सौ. सकुबाई मिठाराम पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.शिरसोली प्र.न. येथिल ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या १७ आहे. ग्रामपंचायत निवडणूक होऊन जवळपास आठ महिन्याच्यावर कार्यकाळ संपला आहे. सरपंचपद हे अनुसुचित जमाती पुरुष राखीव असल्याने १७ फेब्रुवारी रोजी सरपंचपदी हिलाल मल्हारी भिल्ल तर उपसरपंचपदी श्रावण शंकर ताडे यांची निवड करण्यात आली होती. उपसरपंच ताडे यांनी ठरल्याप्रमाणे ६ महिने उपसरपंचपदाचा कार्यकाळ साभाळला त्यानंतर त्यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा सरपंच हिलाल मल्हारी भिल्ल यांच्याकडे देऊन २३ ऑगस्टरोजीच्या ग्रा.प.च्या मासिक सभेत मजुर करण्यात आला. रिक्त असलेल्या उपसरपंचपदाच्या जागेसाठी ठरल्याप्रमाणे…
जळगाव ;- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 23 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले असून तसे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी निर्गमित केले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाची पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. मात्र जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांचेकडील दि. 13 ऑगस्ट, 2021 मधील अटी लागू राहतील, असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.
जळगाव ;- जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ मागील २९ वर्षांपासून सामाजिक जनजागृती च्या अनुषंगाने देखाव्यांचे सादरीकरण करीत असते यासाठी गणेश मंडळाला सन २०१६ साली बेटी बचाव देखाव्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. बँकेच्या वतीने क्रांतीकारी देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना इंग्रजांनी ठोठावलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवर आधारित सेल्युलर जेल च्या देखाव्याचे भव्य सादरीकरण देखील करण्यात आले होते. या वर्षीची कोविड विषाणूजन्य परिस्थिति लक्षात घेता साध्या पद्धतीने देखावा सादर करण्यात येणार असून बँकेचे सभासद व ग्राहक यांचेसाठी विविध विषयांवर आधारित ऑनलाईन मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळाची नुकतीच बैठक झाली असून त्यात…
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त (महसुल) गोरक्ष गाडीलकर यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. राज्य शासनाच्या आदेशान्वये कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू असल्याने विभागीय लोकशाही दिन विभागातील दहा विभाग प्रमुखांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त श्री. गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

