Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र: रावेर तालुक्यातील आहिरवाडी येथे नुकतेच रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी गावातील तरुणांनीव शेतकरी बांधवांनी  मोठ्या प्रमाणात या शिबिरात सहभागी झाले होते. रावेर तालुक्यातील आहिरवाडी येथे  8रोजी  श्रीराम साप्ताहिक मिलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहिरवाडी याच्या  तर्फे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले. जळगाव जिल्ह्यातील डेंग्यू रोगाच्या साथीला आवश्यक असलेल्या रक्ताच्या विविध घटकांसाठी ची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे;त्यात कोरोना सदृश्य परिस्थिती असल्याने रक्त तुटवडा भरपूर प्रमाणात आहे,या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अहिरवाडी येथील सिद्धेश चौधरी,शुभम वैद्य, सुमित महाजन, पंकज महाजन, शुभम शिंदे,सागर पाटील इत्यादी स्वयंसेवकांनी रक्तदान शिबिर ठरविले व फक्त एक दिवसाच्या नियोजनात तब्बल 54 रक्तदात्यांनी रक्तदान करून सर्वांसमोर एक आदर्श उभा…

Read More

अंतुर्ली येथील दुर्दैवी घटना मुक्ताईनगर ;- विहिरीत तोल जाऊन पडल्याने आईला वाचविण्यास गेलेल्या २४ वर्षीय तरुणांचाही बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी येथे उघडकीस आली असून परिसरात या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे . सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, नितीन पंढरीनाथ पाटील आणि त्याची आई प्रतिभा पंढरीनाथ पाटील (वय-४५) रा. अंतुर्ली ता. पाचोरा असे मयतांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, प्रतिभा पंढरीनाथ पाटील यांचे अंतूर्ली शेत शिवारात शेत आहे. आज ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या शेतात फवारणी करण्यासाठी मुलगा नितीन पंढरीनाथ पाटील याच्यासह गेल्या. दरम्यान, फवारणीसाठी पंपासाठी लागणारे पाणी घेण्यासाठी प्रतिभा पाटील ह्या दुपारी २ वाजेच्या त्यांच्या शेतातील…

Read More

मुंबई :- मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आणि डी गँगचा फायनान्सर युसूफ लकडावालाचाऑर्थर रोड कारागृहात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी लकडावलाला जे जे रुग्णालयात नेलं होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. युसूफ लकडावाला कॅन्सरने त्रस्त होता. मनी लाँडरिंगसह पैशाच्या अफरातफरी प्रकरणात ईडीने त्याला अटक केली होती. आज त्याचा मृत्यू झाला. युसूफ लकडावाला हा मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर तर होताच, शिवाय तो बॉलिवूड आणि डी गँगचा मोठा फायनान्सरही होता. 2019 मध्ये जमीन खरेदीप्रकरणी सरकारी कागदपत्रामध्ये फेरफार करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली बिल्डर युसूफ लकडावालाला (76) अहमदबाद आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारी असलेल्या लकडावालाला अटक करण्यात झाली…

Read More

मुंबई ;- महाराष्ट्र सदनाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह सहा आरोपींना दोषमुक्त केलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाकडे भुजबळ यांनी यासंदर्भात अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत दोषमुक्त करण्यात यावं मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती. आज (9 सप्टेंबर) न्यायालयाने छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त केल्याचं समोर आलं आहे. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात महाराष्ट्र सदन कथित गैरव्यवहार प्रकरणी पुरावे असल्याचा एसीबीचा दावा होता.

Read More

मुंबई : =पुण्यापाठोपाठ मुंबईतही जमावबंदी आदेश लागू झाला आहे. मुंबई पोलिसांनी पुढील 9 दिवस कलम 144 लागू केलं आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील 9 दिवस सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जण्यास परवानगी नाही. मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नसेल. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असल्याने, नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार आहे.

Read More

जळगाव । प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोटार सायकल चोरट्यास ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांचा सुगावा लागल्याने पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला आहे. दिपक सुनिल खरे (वय २२, रा. शहापुरा ता. पाचोरा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुभम राजेंद्र परदेशी ( शहापुरा पाचोरा) हा पसार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस पथक त्याच्या मागावर आहेत. पाचोरा तालुक्यातील शहापुरा येथील काही महाविद्यालयीन तरुण कुठलाही कामधंदा न करता केवळ मौजमस्ती करण्याकामी पैशांची उधळपट्टी करत असल्याची माहिती पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. या महाविद्यालयीन तरुणांची माहिती घेण्याकामी त्यांनी पथकाला रवाना केले होते. दिपक सुनिल खरे या तरुणास…

Read More

जळगाव ;- जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार झाल्याने बुधवारी रात्री 10 वाजेपासून धरणाचे सर्वच्या सर्व 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. तापी नदीपात्रात 78 हजार 929 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. हतनुर धरणाची धोक्याची पातळी 214 आहे आणि आता 209.330 या लेव्हल वर पाणी पोहोचल्याने धरणाचे सर्व गेट उघण्यात आली आहे. हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Read More

मुंबई ;- स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबर अखेर राज्यातील साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई-पीक पाहणी देखील नोंदविली असल्याची माहिती प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक शेतकरी खातेदारांची नोंदणी जळगाव जिल्ह्यात (१.१९ लाख) झाली आहे. द्वितीय क्रमांकावर धुळे (९४ हजार) तृतीय क्रमांकावर अमरावती (८१ हजार) जिल्हा आहे. सर्वाधिक नोंदणी नाशिक आणि अमरावती विभागात झाली आहे. त्या खालोखाल प्रतिसाद कोंकण आणि नागपूर विभागात दिसून येतो आहे. ई-पीक…

Read More

नवी दिल्ली ;- कॉऊन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स म्हणजेच सीआयएसीईने आयसीएसई आणि आयसीएस बोर्ड परीक्षा 2021 सेमेस्टर 1 परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर 1 वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार cisce.org वर CISCE च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण वेळापत्रक पाहू शकतात. ICSE आणि ISC या दोन्हीसाठी सेमेस्टर एकची परीक्षा 15 नोव्हेंबरपासून सुरू होईल. दहावीची परीक्षा 6 डिसेंबरला संपले तर बारावीची परीक्षा 16 डिसेंबरला संपणार आहे. दहावीच्या परीक्षा दररोज सकाळी 11 वाजता सुरू होतील आणि परीक्षेचा कालावधी 1 तास असेल. बारावीची परीक्षा दररोज दुपारी 2 वाजता सुरू होईल आणि परीक्षेचा…

Read More

नवी दिल्ली वृत्तसंस्था ;- देशातील करोनाची दुसरी लाट ओसरली असल्याचे सांगण्यात येत असतानाच आता पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 43,263 करोनाबाधितांची भर पडली आहे तर 338 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 40,567 जण करोनामुक्त झाले आहेत. त्या आधी बुधवारी 37,875 नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 369 करोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशातील दर दिवशीच्या करोना रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही केरळमधून समोर येत आहे. बुधवारी केरळमध्ये 30,196 नव्या रुग्णांची भर पडली तर 181 जणांचा मृत्यू झाला. बुधवारची करोनाबाधितांची ही संख्या देशातील एकूण रुग्णसंख्येच्या…

Read More