Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाहनधारकांकडून टोल वसुली बंद करावी
    जळगाव

    वाहनधारकांकडून टोल वसुली बंद करावी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 17, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगांव ते भुसावळ  रस्त्यांचे अपूर्ण काम पूर्ण झाल्या शिवाय टोल घेऊ नये

    लाईव्ह महाराष्ट्र: चिखली ते तरसोद या दरम्यान महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने या महामार्गावर नशिराबादच्या पुढे टोल वसुलीला सुरवात झालीय आहे जेव्हा की जळगाव ते भुसावळ दरम्यान ररस्त्याचे काम अपूर्ण आहे ते पूर्ण झाल्याशिवाय टोल घेऊ नये  10 दिवसात टोल वसूल बंद न झाल्यास मनसे स्टाईलने टोल नाका बंद करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन,सुविधा व आस्थापना विभाग यांच्याकडून एका निवेदनातुन देण्यात आला आहे.

    चिखली ते तरसोद या दरम्यान महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने या महामार्गावर नशिराबादच्या पुढे 16पासून वाहनधारकांकडून टोल वसूलीस सुरुवात झालेली आहे.सदस्थितीत या रस्त्यावरील अनेक ठिकाणी कामे अपूर्णावस्थेतआहे. त्यातच जळगांव ते भुसावळ या दरम्यान   काम अपूर्ण असल्यामुळे सदरील रस्त्यावरुन वाहन धारकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच संबंधित टोल कंपनीने टोल वसूली सुरु केली असल्याने अपूर्ण काम राहिलेल्या रस्त्यावरच वाहनांच्या रांगाच रांग लागत असल्याने एखाद्या वेळेस त्याठिकाणी अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.संबंधित रस्त्यांचे १०० टक्के काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही वाहन धारकांकडून टोल वसूली करण्यात येऊ नये या टोल वर जळगाव जिल्ह्यातील वाहन धारकांसाठी सदरील कंपनी  85 रुपये प्रती वाहन या पध्दतीने पैसे आकारीत आहे. परंतु सदरील दर हा जळगांव शहरातील वाहनधारकांसाठी कमी म्हणजेच 30 ते 35 रुपये प्रती वाहन आकारण्यात यावे. अशी मागणी केली आहे .

    काम पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित टोल कंपनीस आपणांकडून तशा सूचना देण्यात याव्यात.  संबंधित कंपनीने टोल वसूली बंद केली नाही तर १० दिवसाचे आत संबंधित टोल
    नाका हा मनसे स्टाईलने बंद करण्यात येईल असा इशारा  दिला याबाबतचे निवेदन मनसे जिल्हा संघटक राजेंद्र निकम,राजू बाविस्कर,महेश माळी,गणेश नेरकर,गोविंद जाधव,विशाल, कुमावत,निलेश अजमेरा,संतोष सुरवाडे,रमेश भोई,मनोज भोई,निलेश खैरनार,बळीराम पाटील,अॅड.दिनेश चव्हाण,मंगेश भावे,सिध्देस कवठाळकर, गोरख गायकवाड,अजय परदेशी,भाईदास बोरसे, संदिप पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी भारदे याना दिले.  

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगावमध्ये भाजपचा उत्साहपूर्ण प्रचार दौरा; प्रभाग ६ मध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद

    November 16, 2025

    विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या; खान्देशात घडली धक्कादायक घटना !

    November 16, 2025

    महिलांनी केले अश्लील हावभाव : चाळीसगाव पोलिसांनी घेतले ताब्यात !

    November 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.