जळगाव प्रतिनिधी : हॉकी महाराष्ट्राच्या वतीने बालेवाडी पुणे येथे १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षाच्या आतील मुलांची राज्य संघासाठी तर महिलांची १७ सप्टेंबर रोजी निवड चाचणी आयोजित केली असल्याने त्यासाठी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट ८ मुलांची तर महिलांमध्ये 6 मुलींची निवड हॉकी यांनी शनिवारी घोषित केली. जळगाव जिल्ह्यातील ज्युनिअर बॉईज मध्येमोहम्मद तौसीफ शकील कुरैशी, फ़राज़ फ़िरोज़ तड़वी ( सर्व भुसावळ), चेतन विलास माळी, धीरज धनराज जाधव, गणेश कांतिलाल चौधरी, हरिप्रकाश शिवपाल सैनी, दिवेश चौधरी, अबरार सय्यद जावेद, (सर्व जळगाव), मोइन खान (राखीव खेळाडू, भुसावळ). तर सिनियर मुली वर्षा भगवान सोनवणे, कोमल मनोज सोनवणे, सरला रविन्द्र असवार, गायत्री अर्जुन असवार, वैष्णवी संतोष चौधरी, चेतना…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी : नशिराबाद येथील परकोट मोहल्ला येथे अज्ञात व्यक्तींनी खिडकीतून बंद घरात प्रवेश करत सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचा सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नजरूल इस्लाम खलील अहमद रा. परकोट मोहल्ला नशिराबाद ता.जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता ते ९ सप्टेंबर रात्री ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून खिडकीतून आत प्रवेश करत बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटातून लॉकर तोडून त्यातील सुमारे ६३ हजार १०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.…
लाईव्ह महाराष्ट्र: जळगाव महापालिकेचे सहायक आयुक्त आकाश डोईफोडे यांची बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली असून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्याच्या नगरविकास खात्याने जारी केलेल्या निर्देशानुसार जळगाव महापालिकेत सध्या सहायक आयुक्तपदी असणारे आकाश डोईफोडे यांची बोदवड येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. डोईफोडे आता बोदवड येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ते लवकरच आपला कार्यभार सांभाळण्याची शक्यता आहे.बोदवड नगरपंचायतीच्या विकासकामांना आकाश डोईफोडे यांच्या नियुक्तीने वेग येण्याची शक्यता आहे.
धरणगावात श्री जी जिनिग येथे कापसाच्या खरेदीला प्रारंभ झाला आहे पहिल्या दिवशी कापसाला 6 हजार 253 रुपयांचा भाव मिळाला आहे.धरणगाव प्रतिनिधी येथील श्री जिनिग मध्ये कापसाच्या खरेदीला श्री गणेशाच्या आगमनाच्या दिवशी प्रारंभ झाला आहे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी यांनी सांगितले की शेतकऱ्याच्या कापसाला यावेळी चागला भाव राहील कारण बाहेरही मोठ्या प्रमाणात कापसाला मागणी आहे आज खालच्या दर्जा ला चागला भाव मिळत आहे पहिल्या दिवशी शेतकऱ्याच्या कापसाला 6 हजार 256 रुपयांचा भाव दिला आहे असे ते प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले
जळगाव प्रतिनिधी : राज्यात पुन्हा भाजपचे सरकार यावे ही श्रींची इच्छा आहे गेल्या दोन वर्षाच्या काळात कोणीच सुखी नाही असा टोला आघाडी सरकारला लावत राज्यात भाजपचे सरकार यावे ही गणरायाची इच्छा आहे असे ते यावेळी म्हणाले आज जामनेर येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाल्यानंतर आमदार गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले की गणरायाकडे मागणे केले असे नाही मात्र श्री चीच इच्छा आहे की राज्यात भाजपचे सरकार यावे सर्वच घटकांना म्हणजे माध्यमिक,गरीब, श्रीमंत या सर्वांना अपेक्षा आहे या आघाडी सरकारच्या दोन वर्षांची कारकीर्द बघितली असता. या राज्यात कोणीच सुखी नाही. मी फक्त गणरायाला कोरोना बाबत व नैसर्गिक आपत्ती बाबत साकडे घातले आहे सरकार…
जळगाव प्रतिनिधी: पायी जाणाऱ्या नागरिकांनाच्या हातातील मोबाईल हिसकावून मोबाईल लांबविणाऱ्या तिघांपैकी दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांकडून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत केला असून दोघांना जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अक्षय मुकेश अटवाल आणि अक्षय आनंदा जावळे दोन्ही रा. शनीपेठ अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्हा पेठ पोलीसात दाखल असलेले मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्यात. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार विजय पाटील, युनूस शेख, पोहेकॉ जयंत चौधरी, संदीप साळवे, पो.ना. विजय पाटील, पो.ना.…
चाळीसगाव l प्रतिनिधी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी सराफाकडून सुमारे साडेसहा लाखांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना ९ रोजी घडली असून सराफ मालकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात डोगहनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, अरुण मुरलीधर बाविस्कर (वय-७१) रा. राजेंद्र प्रसादरोड, पीपल्स बँकेजवळ चाळीसगाव यांचे त्यांच्या घरासमोर उदय ज्वेलर्स नावाने दागिन्यांचे दुकान आहे. काल ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता दोन व्यक्ती त्यांच्या दुकानावर आले. आपण ग्राहक असल्याचे भासवून त्यांनी सोन्याचे दागिने पाहण्यासाठी घेतले. दोन्ही संशयितांनी ७० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाच्या २ सोन्याची चैन, १ लाख ७१ हजार ५०० रुपये किंमतीचे विविध कानातले दागिने,…
धरणगाव प्रतिनिधी: तालुक्यातील दोनगाव येथे 12 रोजी स्वर्गीय जिजाबाई राघो पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे12 रोजी स्वर्गीय जिजाबाई राघो पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त डोणगाव येथे हरिभक्त पारायण श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे हे आहे या कार्यक्रमाचे आयोजन हेमंत राघो पाटील किशोर राघो पाटील यांनी केले असून कोरोना संबंधित प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम कटाक्षाने पाळावे व सहकार्य करावे असे आव्हान पाटील परिवारातर्फे करण्यात आले आहे
जळगाव ;- जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटरच्या अधिष्ठातापदी शल्य तज्ञ डॉ.महेश चौधरी यांची निवड झाली असून त्याबद्दल नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डी.एम. कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी डॉ.महेश चौधरी यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्यात. तसेच डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून डॉ.चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.
विजेत्यांसाठी भरघोस रोख पारितोषिके; 2 ऑक्टोबरला पारितोषिक वितरण जळगाव । प्रतिनिधी महात्मा गांधीजींच्या 153 व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजण्यात आलेली आहे. महात्मा गांधीजींनी जवळजवळ सर्वच विषयांवर चिंतन केले, आपला प्रभाव टाकला आहे. त्यातील अभिनय हा तर त्यांच्या बालपणापासूनच आवडीचा विषय होता. विद्यार्थ्यांमध्ये अभिनय कला रुजविणे व महात्मा गांधीजींच्या विचारांच्या जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत निःशुल्क नोंदणी व 20 सप्टेंबर पर्यंत आपले व्हिडीओ पाठविणे आवश्यक आहे. विजेते व पारितोषिक वितरण 2 ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, असे स्पर्धेचे आयोजक गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे कळविले आहे. दोन गटासाठी…

