Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आसोदा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने दारूच्या नशेत राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घडली घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जळगाव तालुक्यातील आसोदा येथील रहिवाशी शेतकरी रमेश अशोक पाटील (वय-३६) आपल्या पत्नी व दोन मुलीसह राहतात. शेतीकाम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २३ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी ह्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. तर दोन्ही मुली कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सायंकाळी ७ वाजेच्या पुर्वी रमेश पाटील यांनी राहत्या घरातील पुढच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी सायंकाळी शेतातून घरी आल्या त्यावेळी हा प्रकार समोर आला. त्यांचा मृतदेह खाली…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्यात अलीकडच्या काळातील वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमिवर पोलिसांनी ‘मास्टर प्लॅन’ आखला आहे यासाठी संवेदनशील भागात पोलीस चौक्या उभारण असून शहरात सीसीटीव्ही लावण्यासाठी 7 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे तसेच गुन्हेगारांचे मॅपींग करण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्यावर मोक्का, एमपीडीए, हद्दपारी आदींसारखी कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती आज नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर यांनी दिली. वर्षातील गुन्हेगारांच्या हालचाली आणि गुन्ह्यांचा आढावा घेणे सुरू असून गुन्ह्यांच्या व्याप्तीनुसार यापुढे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी नागरिकांकडून देखील सहकार्य अपेक्षित आहे. जळगावात यापुढे सजन्नांना सलाम आणि दुर्जनांवर प्रहार अशी पोलीस प्रशासनाची भूमिका असणार असल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आज सकाळी कांचन नगरात थेट घरात घुसून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात हल्लेखोरांना यश आले नाही. या प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न.208/21 भा.द.वि. 307, 324, 323, 504 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच अटक केली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी पथक नेमूनदिले होते. या पथकात सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, सुरज पाटील, राहुल पाटील, पोलिस नाईक प्रितम पाटील, अविनाश देवरे यांनी संशयीत तिनही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.मिलींद शरद सकट रा. गेंदालाल मिल जळगाव…

Read More

धरणगाव प्रतिनिधी: भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसाच्या औचित्याने सेवा समर्पण अभियान अंतर्गत सौरभ देसले यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा धरणगाव तालुका व आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने लसीकरण शिबीर भोद बु|| येथे ५०० कोविशिल्ड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.कोविड प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आज देशभरात व राज्यभरात कोविड लसीकरण करून नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी आरोग्य यंत्रणा जोरदार कार्य करत असून , गावा गावातील नागरिकाना लसीकरणाची उपलब्धता करून देण्यात येत आहे.त्या प्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पि.सी.आबा पाटील, जि. प.सदस्या माधुरीताई अत्तरदे, ओबीसी जिल्हाध्यक्ष संजय महाजन,भाजपचे तालुकाध्यक जिजाबराव पाटील जगन्नाथ पाटील, भगतसिंग आप्पा, भाजप तालुका सरचिटणीस…

Read More

मुंबई वृत्तसंस्था: मागील काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेले ओबीसी राजकीय आरक्षण अखेर सत्यात उतरताना दिसू लागले आहे.राज्य सरकारने यासंदर्भात अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. पण, तो अध्यादेश राज्यपालांनी काही सूचनांसह परत पाठवला होता. यानंतर त्यात राज्य सरकारने आवश्यक ते बदल करून राज्यपालांकडे पाठवल्यानंतर आज त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी करून आपल्या मंजुरीची मोहोर उमटवली आहे.ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळादरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे अध्यादेशावर स्वाक्षरी केल्याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आभार मानले आहेत. मंत्रिमंडळाने पाठवलेला अध्यादेश राज्यपालांनी मंजूर केला, यासाठी आम्ही सगळे राज्यपालांचे आभारी आहोत. अनेकदा काही शंका असतील, तर राजभवन त्याची…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करून 50 टक्क्यांच्या आत  आणेवारी आणून शेतकऱ्यांना 30 हजर रुपये हेक्टरी मदत मिळावी आशा मागणीचे निवेदन धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धरणगाव तहसीलदार यांना  देण्यात आले आहे.धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धरणगाव तहसीलदार यांना ओला दुष्काळ जाहीर करून ५०%च्या आत आणेवारी लावणे तसेच नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करून हेक्टरी 30 हजार  रुपये नुकसान अनुदान मिळण्या बाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष धनराज माळी सर , माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर नाना‌ महाजन , विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश आबा पाटील ,  जेष्ठ नेते मोहन नाना , माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन , तालुका कार्याध्यक्ष अरविंद आबा देवरे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : हरियाणा येथील रोहतक येथे झालेल्या नॅशनल 7th स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील राज्यस्तरीय संघ,अथलेटिक्स खेळाडू  सहभागी झाले होते त्यांनी कुस्ती स्पर्धेत 2 गोल्डमेडल,स्केटिंग स्पर्धेत 1 गोल्ड मेडल,अथलेटिक्स स्पर्धेत 1 सिल्व्हर व 1 गोल्ड मेडल संपादन करून घवघवीत यश मिळाले आहे .नुकत्याच २-३ दिवसांपूर्वी रोहतक, हरियाणा येथे झालेल्या नॅशनल 7th स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील राज्यस्तरीय विजेते संघ तसेच अथलेटिक्स खेळाडू सहभागी झाले होते. हरियाणा येथे झालेल्या नॅशनल स्पर्धा खूप अटीतटीच्या झाल्या. त्यात कुस्ती स्पर्धेत 2 गोल्ड मेडल धरणगाव येथील सौरभ पवार आणि महेश वाघ (कोच – पै.संदीप कंखरे), स्केटिंग स्पर्धेत 1 गोल्ड मेडल जळगाव शहरातील…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अकरावी प्रवेशासाठी सीईटी अर्जाची मुदत संपली आहे त्यामुळे सीईटी अर्जासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दिव्या यशवंत भोसले यांनी मा मंत्री मोहदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षेकरिता अर्जाची मुदत संपली आहे. सीबीएसईचा निकाल उशिराने जाहीर झाल्याने अनेक विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी वंचित राहिले. त्यामुळे सीईटी अर्जासाठी  मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दिव्या यशवंत भोसले यांनी मा मंत्री मोहदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्या म्हणाल्या, की यासंदर्भात राज्यातीलभरातील पालक व विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. त्या अनुषंगाने आदरणीय आमदार रोहित दादा पवार व शालेय…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रीय स्तरावर (हरियाणा येथे) स्टुडंट नॅशनल गेम कुस्तीत 55 किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करतांना धरणगावच्या मल्लने गोल्ड मेडल मिळाले त्याचा ततहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी घरी जाऊन सत्कार केला त्याला सर्व परीने मदत करण्याचे आश्वासन दिले.धरणगावातील कुस्तीपटू महेश वाघ यांना राष्ट्रीय स्तरावर (हरियाणा येथे) स्टुडंट नॅशनल गेम कुस्तीत 55 किलो गटात महाराष्ट्राचे नेतृत्व करतांना गोल्ड मेडल मिळाले याबाबत धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी त्यांचे राहते घरी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व भावी आयुष्यसाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत.महेश ला कुस्तीची तयारी करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेत याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेशी चर्चा करून मदत करता येईल असा शब्दही…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्ह्यात पिस्तुल फायरींग सारख्या घटना वाढत असून त्यावर आळा लावण्यात पोलिसांनी अपयश येत असून मोटर सायकलचे गुन्हेगार पोलिसांच्या हाथी लागत आहे मात्र पिस्तुल विक्री किंवा शहरात येण्यावर रोख लावण्यात पोलिसांना अपयश आले एका मागून एक घडणाऱ्या घटनांवरून दिसत आहे आज सकाळी कांचन नगरात थेट घरात घुसून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात हल्लेखोरांना यश आले नाही. तर एक हल्लेखोर हा घटनास्थळीच जखमी होऊन बेशुध्द झाल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे अगदी सकाळीच घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास प्रारंभ केला आहे.नशिराबाद येथे भावाच्या खुनाचा बदला घेण्यात आला ही  घटना ताजी असताना दोन दिवसानंतर…

Read More