लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बाभोरी पुलावर दूचाकीने टँकरला ओव्हरटेक करताना आई व मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली यात एक महिला जखमी झाली आहे.एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील रहिवाशी चारुशीला राहुल पाटील , त्यांचा मुलगा निशांत राहुल पाटील आणि चारुशीला पाटील यांची बहीण रुपाली पाटील हे तिघे एम एच १९ – डी.क्यू – ३८९६ या क्रमांकाच्या ऍक्टिव्हा दुचाकीवरून एरंडोलहून जळगावला आई -वडिलांनकडे येत होते पुढे चालत असलेल्या टँकरला ओव्हरटेक करताना तोल जाऊन ते पडले आणि चारुशीला पाटील ( वय ४० ) व निशांत पाटील ( वय १२ ) हे दोघे आई व मुलगा टँकरच्या मागच्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
खा संजय राऊत याचे नाव न घेता लगावला टोलालाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेचे खासदार ही विनोद वीरान सारखे बॅटिंग करीत आहेत त्यांना सांगायचे आहे की महाभारतात संजय बघितलं रंगभूमीचे युद्ध दिसत होते आणि ते निर्णय घेण्यात मात्र या संख्यांना फक्त वसुलीचा दृष्टांत पडते जमिनीचा विसर पडला आहे असा टोला आज खा संजय राऊत याचे नाव न घेता प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.जळगाव जिल्हा परिषदेला पंचायत राज कमिटी तीन दिवसीय दौऱ्यावर आलेली आहे यातील कमिटी सदस्य आमदार सदाभाऊ खोत हे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की महाविकासआघाडी मध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा विदुषकी चाळे करण्यात बरीचशी मंडळी दिसत आहे अलीकडच्या काळामध्ये…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील तडवी कॉलनी परिसरातून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरात प्रवेश करत कपाटातील ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्ताक रसुल तडवी (वय-५५) रा. तडवी कॉलनी रावेर हे खाजगी नोकरीला आहेत. २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ ते २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान सगळेजण घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात शिरून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मुस्ताक रसुल तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव परिसरात पावसाने २५ च्या रात्री जोरदार हजेरी लावली त्यामुळे पुन्हा कन्नड घाटामध्ये दरड कोसळली आहे. दरम्यान या घाटामधून कोणीही प्रवास करू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.काल रात्री चाळीसगाव परिसरासह इतर अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे डोंगर भागातील तितुर व डोंगरी नदीला मोठा पूर आला आहे. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कन्नड घाटामध्ये दरड कोसळून रस्ता खचला होता. त्यामुळे काही दिवसांसाठी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जिल्हाप्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून व पाहणी करून दुचाकी, हलक्या व छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला केला होता. अवजड वाहनांना अजूनही हा घाट…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दलित वस्ती विकास कामांची इ-निविदा प्रक्रियेत अनियमितता केली म्हणून रावेर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना व ग्रामसेवकांवर ठपका ठेवत सरपंचांना अपात्र करण्याची आणि ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटिसा प्राप्त झाल्याची माहिती आहे. यामुळे चांगलीच खळबड उडाली आहे.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य नंदकिशोर महाजन यांनी तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेच्या इ -निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्यातजामतीतील आली होती. त्या समिती मध्ये तालुक्यात झालेल्या अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीमधील विकास कार्यक्रमांतर्गत इ-निविदांमध्ये अनियमिततेबाबत चौकशीकेली गेली होती. या समितीचा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन देणेसाठी नियोजनबध्द कार्यक्रम राबविण्याचे निर्देश ना. छगन भुजबळ यांनी आज दिलेत. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात ना छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक बी. जी. जाधव, जिल्हा मार्केटींग अधिकारी एन. डी. मगरे, विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार साहेबराव शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे निरिक्षक सी. डी. पालीवाल, रविंद्रभैय्या पाटील आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले की, अंत्योदय योजनेत…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे त्याचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्याचे आज जळगावात स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी काँगेस जिल्हाउपाध्यक्ष पंकज महाजन, यांनी सत्कार केले.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सायंकाळी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पारोळ्यात त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी चे पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्याचे आज सायंकाळी पारोळा येथे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक व विभागीय अध्यक्ष संजय मुरलीधर पवार, जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अण्णासाहेब डॉक्टर सतीश भास्करराव पाटील जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची युती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील यांनी सत्कार करून केले.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव शहरातील प्रभाग क्रमांक 4 शिंपी समाज मंगल कार्यालया मधे आयोजित लसीकरण मोहीम घेण्यात आलीया कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष निलेश आबा चौधरी , उपनगराध्यक्ष ,विलास महाजन,नगरसेवक भागवत चौधरी वासुदेव चौधरी,सुरेश महाजन डाक्टर,आरोग्य अधिकारी किरण पाटील, डाँक्टर मयुर जैन, सिस्टर मोरवकर,सोनवणे,सहकारी भदाने,महेंद्र महाजन बडगुजर, इत्यादी, आरोग्य विभाग कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .शहरातील प्रभाग 4 मधील शिंपी समाज कार्यालयात लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजक, नगरसेवक, गट नेता विनय पप्पू भावे, नगरसेविका अंजली भानुदास विसावे,यांनी केले होते.या मोहिमेत पहिला डोस 492, दुसरा डोस 223…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहराला कोरोना मुळे बऱ्याच लोकांनी आपले आत्पेष्ट नातेवाईक गमावले या करणामुळे सगळ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहेडेंगू मलेरिया मोठ्या प्रमाणात पसरला आहे आणि लहान मुलांना जास्त प्रमाणात आहे आधीच आपण कोरोंना सारख्या महाभयंकर आजारातून नुकतेच बाहेर पडत आहोत.शहरातील स्वच्छता ही वॉटर ग्रेस कंपनीला दिला आहे तो कोट्यवधींचा असूनही शहराच्या पाहिजी तशी स्वच्छता होत नाही याची तपासणी सुद्धा होत नाही असा ही आरोप करण्यात आला आहे. त्यांना मनपा येवढाच पगार वॉटर ग्रेस कंपनीकडून दिला जात आहे हे सर्व जळगावकर शहरातील नागरिकांसाठी घातक आहे यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली आहे की तुमच्याकडून आरोग्य यंत्रणा कार्यान्वित होत नसेल तर…

