Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कन्नड घाटात पुन्हा दरड कोसळली
    चाळीसगाव

    कन्नड घाटात पुन्हा दरड कोसळली

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 26, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव परिसरात  पावसाने २५ च्या रात्री  जोरदार हजेरी लावली त्यामुळे पुन्हा  कन्नड घाटामध्ये  दरड कोसळली आहे. दरम्यान या घाटामधून कोणीही प्रवास करू नये, असे आवाहन महामार्ग पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.


    काल रात्री चाळीसगाव परिसरासह इतर अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे डोंगर भागातील तितुर व डोंगरी नदीला मोठा पूर आला आहे. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे कन्नड घाटामध्ये दरड कोसळून रस्ता खचला होता. त्यामुळे काही दिवसांसाठी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जिल्हाप्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून व पाहणी करून दुचाकी, हलक्या व छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी हा घाट खुला केला होता. अवजड वाहनांना अजूनही हा घाट प्रवासासाठी खुला करण्यात आलेला नव्हता. घाट खुला करून १० दिवस उलटत नाही तोच पुन्हा काल पुन्हा कन्नड घाटामध्ये दरड कोसळली असून अधूनमधून दरड कोसळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या घाटामधून प्रवाशांनी प्रवास करू नये असे, आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. दरम्यान, हा रस्ता बंद झाल्याने पुन्हा प्रवाशांचे हाल होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कन्नड घाटात एसटी बसचा थरार! स्टेअरिंग रॉड तुटला; ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

    August 23, 2026

    गिरणा धरणाचे दरवाजे आज उघडणार; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    July 31, 2026

    गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

    July 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.