Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धरणगाव प्रतिनिधी : पष्टाणे बु।।  येथील या गावाच्या  मानाचा गणपती आरती जिल्हापरिषद सदस्य गोपाल बापू चौधरी याच्या हस्ते झाली आरती नंतर सर्व गाव संघटित राहून गावाचा विकास करावा असे गोपाल चौधरी यांनी सांगितले.गणपतीची आरती  नंतर गणपती बाप्पा चा जयघोष करण्यात आला, त्या ठिकाणी चहा पाण्याचा कार्यक्रम करण्यात आला, गावाने संघटित राहून आपला विकास करावा.गावात ऐकोपा कायम राहावा नाकी सण उत्सव याच्या पुरता मर्यादित राहू नये यातून आपल्या गावाची प्रगती साधता येईल असे बापू चौधरी म्हणाले   त्याप्रसंगी गणपती मंडळाचे युवक शुभम ठाकरे,केतन ठाकरे(पप्पु राजे) ललित ठाकरे, गौरव ठाकरे, जयेश ठाकरे,अजय पा, विशाल ठाकरे,किरण जाधव,हर्षल पा,वाल्मिक जाधव,मच्छिंद्र मराठे व गावातील मा,सरपंच…

Read More

जळगाव ;- जिल्ह्यातील सात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून याचे आदेश आरोग्य खात्यातर्फे पारीत करण्यात आले आहेत. आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रातील गट-अ या संवर्गातील २८० वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश पारित झाले. यात जळगाव जिल्ह्यातील सात अधिकार्‍यांचा समावेश आहे. सहा बदल्या या जिल्ह्यात तर एकाची बदली जिल्ह्याबाहेर करण्यात आली आहे. यामध्ये येवती (ता. बोदवड) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजय सपकाळ यांची धामणगाव येथे, साकळी (ता. यावल) येथील डॉ. सागर पाटील यांची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात, उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील डॉ. विशाल पाटील यांची जळगाव जिल्हा क्षयरोग केंद्र येथे, मुक्ताईनगर येथील डॉ. नीलेश पाटील यांची मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात, रावेर येथील डॉ. एन. डी. महाजन…

Read More

जळगाव ;- वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज (शनिवार) सायंकाळी 5 वाजेपासून धरणातून 200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.

Read More

जळगांव प्रतिनिधी : जिल्ह्यातील सात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहे. राज्यातील280 वैद्यकीय  अधिकाऱ्यांच्या बदलाचे  आदेश आरोग्य खात्यातर्फे पारीत करण्यात आले आहेत. आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रातील गट-अ या संवर्गातील 280  वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश नुकतेच पारित करण्यात आले. या 280 वैद्यकीय अधिकारामध्ये 7  जळगाव जिल्ह्यातील  अधिकार्‍यांचा समावेश आहे. सहा बदल्या या जिल्ह्यात तर एकच बदली ही जिल्ह्याबाहेर झाली आहे. यात येवती (ता. बोदवड) प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अजय सपकाळ यांची धामणगाव येथे, साकळी (ता. यावल) येथील डॉ. सागर पाटील यांची चोपडा उपजिल्हा रुग्णालयात, उंबरखेड (ता. चाळीसगाव) येथील डॉ. विशाल पाटील यांची जळगाव जिल्हा क्षयरोग केंद्र येथे, मुक्ताईनगर येथील डॉ. नीलेश पाटील यांची मुक्ताईनगर…

Read More

नेहरू युवा केंद्र, जिल्हा प्रशासनाकडून आयोजनलाईव्ह महाराष्ट्र – केंद्र सरकार यावर्षी ‘आजादी का अमृत महोत्सव’ वर्ष साजरे करीत असून त्याअंतर्गत सदृढ आणि सक्षम भारत निर्माण करण्यासाठी नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे जिल्हा प्रशासनाच्या सौजन्याने आज आयोजित केलेल्या ‘फिट इंडिया फ्रीडम रन’मध्ये जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला.केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या निमित्ताने फिट इंडिया फ्रीडम रन २.० चे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरूवात पोलीस कवायत मैदान येथून करण्यात आली. पोवाडा सादरीकरणनंतर दौड सुरू झाली. प्रसंगी खा.उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, राष्ट्रीय सेवा…

Read More

जळगाव I प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसीय पारंपरिक खेळांचे आयोजन दिनांक 17 व 18 सप्टेंबर वार शुक्रवार व शनिवार रोजी करण्यात आले होते.शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील,समन्वयिका सौ वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत पारंपरिक खेळांचे उदघाटन करण्यात आले. पारंपरिक खेळात सागरगोट्या,विटी – दांडू,टायर फिरवणे,दोरीवरच्या उद्या,लगोरी,झोका,भोवरे फिरवणे,लंगडी,धावणे,बेडूक उद्या,अशा अनेक खेळांचा समावेश होता.हे पारंपरिक खेळ विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन खेळले व पारंपरिक खेळाचा अनुभव घेतला या प्रसंगी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.प्रत्येक खेळाचे प्रमुख विद्यार्थ्यांना खेळ शिकवत होते आणि खेळवत होते याप्रसंगी पालकांची उपस्थिती ही होती आज हे सर्व पारंपरिक खेळ आपण विसरलो आहोत. अशा प्रकारचे अगदी महाराष्ट्रातल्या भूमीतले काही खेळ…

Read More

जळगाव ;- जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे भारत विकास परिषद आणि देवदूत यांनी कोविड काळात केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खा. उन्मेष दादा पाटील यांनी आज केले. भारत विकास परिषद जळगाव शाखेतर्फे रूग्ण साहीत्याचे लोकार्पण व कोविड योध्दा सन्मान सोहळयात ते बोलत होते. कोविड आपत्‍तीत आरोग्य क्षैत्रातून देवदूतच अवतरले होते. २४ तास घरदार सोडून, स्वताचा जिव धोक्यात घालून सेवा देणारे हया देवदूतांना सन्मानित करणे ही भाग्याची बाब असल्याचे बोलून भारत विकास परिषद जळगाव शाखेच्या कार्याबददल गौरव केला. डॉक्टरांना देवदूत का? म्हणतात हे कोविड आपत्‍तीतून लक्षात आले. डॉक्टरांवरील विश्‍वास कमी झाला होता आता तो वाढेल असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.…

Read More

जळगाव ;- ठाणे परिसरातील बदलापूरच्या प्रसिद्ध आर्ट गॅलरीमध्ये मान्यवर कलावंतांच्या सोबतीला जळगावच्या कलावंतांनी साकारलेल्या कलाकृती भाविकांना पाहता येत आहेत. जलरंग, ड्राय पेस्टल, अॅक्रलिक अशा विविध माध्यमांतून गॅलरीमध्ये 122 च्यावर गणेशाच्या कलाकृती अवतरल्या आहेत. यामध्ये वैविध्यपूर्ण, कलात्मक आणि कल्पक अशा पाच जळगावकरांच्या कलाकृतींचाही समावेश आहे. चित्रकार आणि चित्रकला, शिल्पकलेला प्रोत्साहन देण्यासाठी बदलापूर आर्ट गॅलरीने हा उपक्रम राबविला आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील अनेक दिवंगत, ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश करण्यात आल्याचे गॅलरीचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितले. कोल्हापूर येथील आबालाल रहेमान यांनी साकारलेले गणपतीचे चित्र ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्याकडून गॅलरीसाठी उपलब्ध झाले, ते चित्र या प्रदर्शनात…

Read More

जळगाव प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71व्या  वाढदिवसानिमित्त भा ज पा जिल्हा व महानगर पालिका तर्फे सेवा समर्पण ,अभियानात अंतर्गत भव्य कोरोना लसीकरणाचा  कार्यक्रम लसीकरणाचा  कार्यक्रम  अंतर्गत पहिला व दुसरा डोस मोफत देण्यात आला .2271  नागरिकांनी घेतली कोरोना लस घेतली . देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त  भा ज पा जिल्हा व महानगर पालिका तर्फे सेवा समर्पण ,अभियानात अंतर्गत भव्य कोरोना लसीकरणाचा  कार्यक्रम आज  १७ रोजी  सरदार वल्लभाई पटेल सभागृह टेलीफोन ऑफिस मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट जवळ येथे  सकाळी ९ वाजता झाला. यावेळी  भारत मातेच्या प्रतिमा पुजन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून…

Read More

जळगांव ते भुसावळ  रस्त्यांचे अपूर्ण काम पूर्ण झाल्या शिवाय टोल घेऊ नये लाईव्ह महाराष्ट्र: चिखली ते तरसोद या दरम्यान महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने या महामार्गावर नशिराबादच्या पुढे टोल वसुलीला सुरवात झालीय आहे जेव्हा की जळगाव ते भुसावळ दरम्यान ररस्त्याचे काम अपूर्ण आहे ते पूर्ण झाल्याशिवाय टोल घेऊ नये  10 दिवसात टोल वसूल बंद न झाल्यास मनसे स्टाईलने टोल नाका बंद करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन,सुविधा व आस्थापना विभाग यांच्याकडून एका निवेदनातुन देण्यात आला आहे.चिखली ते तरसोद या दरम्यान महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याने या महामार्गावर नशिराबादच्या पुढे 16पासून वाहनधारकांकडून टोल वसूलीस सुरुवात झालेली आहे.सदस्थितीत…

Read More