लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 10 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध होणार असून 17 रोजी मतदान वॉटर आरती मतमोजणी होणार आहेकृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक नुकताच राज्य निवडणूक सहकारी प्राधिकरण यांच्या सचिवां यशवंत गिरी यांनी नुकताच कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्या निवडणूक कार्यक्रमाच्या तारखा जाहीर केले आहे त्यामुळे ग्रामीण भागातील राजकारणात आत्तापासून खलबते सुरू झाली आहेकृषी उत्पन्न बाजार समिती मतदार यादी प्रसिद्ध करणे 10 नोव्हेंबर रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रारूप मतदान यादी हरकती व आक्षेप मागविणे — 10 ते 22 नोव्हेंबरआक्षेप व हरकती वर जिल्हानिवडणूक निर्णय अधिकारी यांनी 22 नोव्हेंबर…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा साथरोग काळात तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प रुग्णांच्या उपचारासाठी व त्यांना बरे करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन प्रसंगी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऋषिकेश येथे देशात उभारण्यात आलेल्या 36 हवेतून निर्माण होणाऱ्या पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी देशभरातील पीएसए प्लांट बसविल्या गेलेल्या रुग्णालयांना ऑनलाईन संबोधित केले. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: नवरात्री उत्सवाला आज पासून प्रारंभ झाला असून जागृती युवक मंडळा वर्ष ३७ व्या वर्षाला प्रारंभ झाला आहे या 37 व्या घटस्थापनेच्या निमित्ताने विधिवत पूजन कॉन्ट्रॅक्टर भगवान महाजन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. आज नवरात्रोत्सवाची उत्साहात सुरवात झाली. मरीमाता मंदिर परिसरात सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जागृती युवक मंडळाच्या माध्यमातून देवीच्या मूर्तीची विधिवत स्थापना व घटपूजा अतिशय प्रसन्न वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाली. गेल्या अनेक वर्षांपासून जागृती युवक मंडळाच्या माध्यमातून नवरात्रोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. मंडळात वयाने जेष्ठ व्यक्तींचा असलेल्या उत्साह युवकांना देखील लाजवेल असा असतो. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, देखाव्यांची आरास, विविध उपक्रम राबविणे येतात.परंतु कोरोनाच्या परिस्थितीत हा नवरात्रोत्सव साध्या…
प्रतिनिधी अमोल पाटील: तालुक्यातील लाडली येथे पशुधनावर लंपी स्किन डिसीज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने या रोगाला नियंत्रण मिळविण्यासाठी आज पासून लसीकरणाला प्रारंभ झाले.असून यासोबतच जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण व जनजागृती शिबिराचे जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. लसीकरणाचा प्रार्दुभाव कमी होण्यासाठी पशुधनाला या रोगापासून वाचविण्यासाठी लसीकरण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जि .प सदस्य प्रताप पाटील यांनी डॉक्टरांना सूचना दिल्या की ज्या ठिकाणी हा संसर्गजन्य रोग असून प्रत्येक शेतकऱ्याचा गोठा फवारणी करून तसेच लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात करावे. धरणगाव तालुक्यात 14000 लसींची मागणी करण्यात आली आहे…
धरणगाव (प्रतिनिधी)। नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाने कमल जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त केल्याचे समजते. याबाबत विश्वसनिय सुत्रांकडून माहिती मिळाली. या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील कमल जिनिंगमध्ये आज मोठ्या प्रमाणात धान्य येणार असल्याची गोपनिय माहिती नाशिक येथील विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाला मिळाली. आज गुरूवारी ७ ऑक्टोबर रोजी एका पथकाने शहरातील कमल जिनिंगमध्ये अचानक छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात गहू आणि तांदूळची पोते आढळून आले आहे. दरम्यान या घटनेचा पंचनामा करण्यात आल्याचे विश्वसनिय सुत्रांकडून माहिती मिळाली. याबाबत पोलीसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेला साठा रेशनचा आहे का की, खाजगी ? याची माहिती मिळविण्यासाठी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:- तालुक्यातील सावखेडा शिवारात श्रावण लालचंद भिल वय त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.या दरम्यान संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून घटनास्थळी सहायक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे
प्रतिनिधी प्रविण पाटील: तालुक्यातील जळके व वसंतवाडी परिसरात विजेची चोरी करणाऱ्यांवर महावितरण विभागाने धडक कारवाई करण्यात आली.याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील जळके व वसंतवाडी येथे आज दुपारी ३वाजेच्या सुमारास जळके विद्युत उपकेंद्राचे ज्यु.अभियंता मानसी माने यांनी महावितरण कंपनीचे कर्मचारी लाईनमन लोकमान तडवी, शिवाजी काळे, संतोष पाटील, दिनेश पाटील व संतोष सरदार या पथकाने धाडसत्र राबविले. या कारवाईत विधी सत्वरी करणाऱ्या दहा जणांना पकडले. जळके, वसंतवाडी येथे दोन्ही गावांतील नागरिकांचे लक्ष लागले ते म्हणजे कार्यवाही होणार का? परंतु अचानक झालेल्या कार्यवाही मुळे चर्चाही रंगली कि असे काय घडले कि या परिसरात स्वतः अभियंत्यांना लक्ष द्यावे लागले आतापर्यंत कोणाच्या आशिर्वादाने विजचोरी होत…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील – बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सन्मान करण्यात आला.सविस्तर वृत्त असे की, तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक तसेच बहुजन समाजासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमी रस्त्यावर आंदोलन करणारे, पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देणारे भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ यांची राष्ट्रीय पिछडा वर्ग [ ओ.बी.सी ] मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली म्हणून, बहुजन क्रांती मोर्चा कडुन…
अन् सहाच्या सहा जागांवर दणदणीत विजयलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते अमरिशभाई पटेल याचं पुन्हा धुळ्यात वर्चस्व असल्याचं एकदा स्पष्ट झालं. शिरपूर पंचायतीच्या सहा गणांच्या सर्व जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे शिरपूरमध्ये अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व अधोरेखित झालं आहे. धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत धुळ्यात एकूण 65 टक्के मतदान झाले. त्यात शिरपूर तालुक्यात 57.12 टक्के मतदान झाले होते. धुळ्यात प्रचंड मतदान झाले असले तरी शिरपूर येथील निकालांवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलं गेलं होतं. पंचायत समितीच्या सहा गणांवर भाजप वर्चस्व कायम राखणार की महाविकास आघाडीच्या प्रयोगासमोर भाजप अपयशी ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं…
शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मिशन मोडवर कामकाज होणे आवश्यक – खासदार रक्षाताई खडसेजळगाव, (जिमाका) दि. 5 – शासनाच्या योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणांनी मिशन मोडवर कामकाज करुन या योजनांचा लाभ मिळवून द्यावा. असे निर्देश खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिले.जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन सभागृहात खासदार श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी…

