लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा प्रशासनाच्या ऊन गड व गलथान कारभाराची जिवंत उदाहरण आज भररस्त्यात पाहावयास मिळाले कागदोपत्री वाळूचा व्यवसाय बंद आहे मात्र गिरणा नदीच्या पात्रातून अंदाधुंद वाळूचा उपसा अवैध मार्गाने करण्यात येत आहे भरदिवसा शहरातून या वाळूची वाहतूक बिनधास्तपणे करीत आहे यातच आज शिव कॉलनी स्टॉपजवळ वाळू वाहतूक करणार्या भरधाव वेगाने धावत असणार्या ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली. यात मात्र कोणाचाही जीव गेला नाही ही भाग्याची गोष्ट आहे यावर जिल्हा प्रशासन कोणावर आळा घालणार हे पाहणे योग्य राहील. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, वाळूची वाहतूक करणार्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने आज एमएच १९ व्ही-३४४१ क्रमांकाच्या रिक्षेला शिव कॉलनी येथे…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील सणुजा निरजराव फराटे (वय-२२) ह.मु. पाटणा ता. चाळीसगाव या विवाहित तरूणीचा शिवारातील एका विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सणुजा निरजराव फराटे हि विवाहित तरूणी आहे. तिचे सासर हे पुणे जिल्ह्यातील मांडवगण येथील आहे. तत्पूर्वी ती आपल्या आईवडिलांकडे आलेली असताना हि थरारक घटना घडली. वैद्यकीय अधिकारी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भडगाव तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी आणि नागरिकांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून यात बँकेच्या कर्मचार्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या प्रकरणात सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त मूल्याचे दागिने लंपास करण्याचा डाव पोलिसांनी पर्दाफाश करत उघडकीस आणली आहे. याबाबत वृत्त असे की,भडगाव तालुक्यातील आमडदे येथिल महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी व ग्राहक यांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अखेर या जबरी चोरीचा उलगडा होऊन पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर व त्यांच्या पोलीसानी अवघ्या तीन तासात बँक कर्मचारी व त्याच्या दोन साथीदार यांना ताब्यात घेत या जबरी चोरीचा पर्दाफाश…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तीन माजी पालकमंत्री चार, आमदार, एक महापौर हे विजयी झाल्या यात महा विकास आघाडीचे सहकार पॅनल नाही वीस जागांवर विजय मिळवला आहे आहे त्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे यात मुख्यतः सर्वाधिक संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या मतमोजणीला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली तर 1 वाजेला मतमोजणी संपली यात महिला राखीव मतदार संघाला सर्वाधिक वेळ लागला. यात सर्वात मोठा धक्कादायक निकाल रावेर विकासाचो लागला यात भाजप पुरस्कृत माजी आ अरुण पाटील यांना सहकार पॅनल…
धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील जवळच असलेल्या लोणे फाट्याजवळ सवारी जीप व मोटार सायकल यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये मोटार सायकल वरील एकाचा जागीच मृत्यू व २ जण गंभीर जखमी झाले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीप ने लोणे फाट्याजवळ मोटर सायकल ला जबर धडक दिली. यामध्ये मोटार सायकल वर असलेला एक जण जागीच ठार झाला तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जीप पलटी होऊन त्यामध्ये असलेल्या २ जणांना थोडे लागले असून काहींना किरकोळ खरचटले आहे. मृत व्यक्ती व गंभीर जखमी झालेले दोघे वैजापूर जवळ असलेल्या मेलाणे ता. चोपडा येथील असून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीत रावेर विकासो मतदार संघात माजी आ.अरुण पांडुरंग पाटील यांना जनाबाई गोंडू महाजन यांनी जाहीर पाठींबा दिला होता. परंतू मतमोजणीच्या निकालानंतर जनाबाई महाजन यांचा विजय झाल्यामुळे राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामामुळे सर्वच जण चकित झाले आहेत. जनाबाई गोंडू महाजन यांनी पाठिंबा दिल्यानंतर गेल्या १० दिवसांपासुन राजकीय वातावरण शांत होते. परंतू मतदानाच्या आदल्या दिवशी जनाबाई गोंडू महाजन यांनी राजकीय खेळी खेळत स्वत:च्या पारड्यात मते पाडण्यासाठी अचानक फिल्डींग लावायला सुरुवात केली. शेवटी जाहीर पाठिंब्यानंतरही जनाबाई महाजन यांचा विजय आल्यामुळे तालुक्यातील राजकारणात भविष्यात हमरी तुमरीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावेर विकासो…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील चौघुले प्लॉट परिसरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका सलून व्यवसायिक तरुणाची चॉपरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली.ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात राहणाऱ्या सुनील सुरेश टेमकर वय-३६ या तरुणाचे चौघुले प्लॉट परिसरात सलून दुकान आहे. गेल्या ५ दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याचे दुकान बंद होते. रविवारीच त्याने दुकान उघडले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्यावर कुणीतरी चॉपरने वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याची प्राणज्योत मालावली. जिल्हा रुग्णालयात शनीपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील बळीराम पेठेतील बळीराम गंगुबाई शाळेच्या गल्लीत एका पत्राच्या शेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनांमध्ये वापर करणाऱ्यावर शहर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाई २१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बळीराम गंगूबाई शाळेच्या मागील गल्लीत एका पत्र्याच्या टपरीतमध्ये संशयित आरोपी नाजीम खान नयीम खान रा. काट्या फाईल, शनीपेठ जळगाव हा बेकायदेशीरपणे घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये करत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांना शनीवारी दुपारी १२ वाजता मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दुपारी १ वाजता धाड टाकून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । ‘फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये’ असे सांगून 22 वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर असे, धुळे शहरातील शारदा नगर येथील 22 वर्षीय विवाहितेला पुणे येथे ‘फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये’ असे सांगत तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ पती सुमित कृष्णा जाधव, सासरे कृष्णा उत्तम जाधव, सासु प्रमिला कृष्णा जाधव व नणंद गौरी जाधव आदींनी केल्या. सुरूवातीला घरात विवाहितेला चांगली वागणूक मिळाली. मात्र, नंतर पाच लाख माहेरून घेऊन ये…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळ एका मुलीचा ५९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी १७ ऑक्टोबर रोजी लांबविला होता. या गुन्ह्यातील तीन संशयितांना अटक करण्यात आली असून मोबाईल हस्तगत करण्यात आला होता.रविवारी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी जिल्हा पेठ पोलीसांनी फिर्यादीस चोरीस गेलेला मोबाईल सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंता हस्ते परत देण्यात आला. अधिक माहिती अशी कि , पुजा दिलीप भावसार (वय-२८) रा. गणेश कॉलनी अशोक बेकरी ख्वाजा मिया जवळ ही तरूणी १७ ऑक्टोबर रेाजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील अशोक बेकरीजवळ पायी जात असतांना समोरून दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीके १३८६) क्रमांकावरील दुचाकीवर अनोळखी तीन जणांनी धडक…

