लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चाळीसगांव शहरापासून जवळच असलेल्या बिलाखेड जवळ बोलेरो व दुचाकी एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार असून एक जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरालगत असलेल्या बिलाखेड जवळ बोलेरो व बुलेट समोरासमोर एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हि थरारक घटना आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. यात प्रकाश एकनाथ बाविस्कर (वय-२४) व विजय दगडू मोरे (वय-२५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर आदित्य श्रावण शहादेव रा. आडगाव हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडताच बोलेरोवरील चालक हा पसार झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.