Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

मुंबई वृत्तसंस्था : कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे  प्रशासनाने खबरदारी म्हणून सर्वच ठिकाणी सतर्कता बाळगली जात असतांना राज्य सरकारनेही या पार्श्‍वभूमिवर नवीन नियमावली जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. हा व्हेरिएंट अत्यंत घातक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज तातडीची बैठक घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. या पार्श्‍वभूमिवर आता राज्य सरकारनेही खबरदारी घेऊन नागरिकांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यात सार्वजनिक वाहतूकीत केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत मॉल, सभागृह, कार्यक्रम याठिकाणी लसीचे दोन डोस असलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून युनिवर्सल पास देण्यात आले…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार हे 28 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे नामदार पवार हे दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाळधी येथे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र यांचा विवाह  असल्याने त्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार हे 28 रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे ते दुपारी दोन वाजेला पाळधी येथे गुलाबराव पाटील यांच्या घरी उपस्थित राहणार आहे.

Read More

वार्ताहर भाईदास पाटील: येथील ग्रुप ग्रामपंचायत भवरखेडे बु येथे ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला व तसेच आपल्या महाराष्ट्र मधल्या मुंबई येथे झालेल्या 26.11.2008 रोजी दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना व नागरीकांना अभिवादन करण्यात आले भावपूर्ण आदरांजली वाहून त्यांचे नमन करण्यात आले . सर्व प्रथम भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच किरण पाटील यांनी पुष्प गुच्छ अर्पण केले त्यानंतर सामुहिक संविधान वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,यावेळी उपसरपंच अजय ब्राम्हणे यांनी सामुहिक संविधान वाचन केले,आपल्या मनोगतात त्यांनी भारतीय संविधान सर्वाना समान अधिकार देऊन सन्मानाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देते भारतीय संविधान दिनाचे महत्त्व सांगुन…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील – धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे ‘ माझे संविधान,माझा अभिमान ‘ या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एस.पाटील हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे तर प्रमुख वक्ते प्रा.भरत शिरसाठ व पी.डी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक बळवंत पाटील,जी.पी.चौधरी हे होते. यावेळी विद्यायात रांगोळी,निबंध लेखन,वकृत्व व पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते पी. डी.पाटील यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव करीत भारतीय संविधानाच्या ३९५ कलम व गुरू शिष्य परंपरा यांची ओळख उपस्थितांना करुन दिली तसेच दुसरे वक्ते प्रा.भरत…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील: तालुक्यातील शेतीपंपाची वीज कनेक्शन अचानक पणे कट करण्याचे काम वीज कंपनीच्या वतीने सुरू आहे.शेतकऱ्यास कुठलीही माहिती न देता त्यांचे नुकसान करण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. शेतकऱ्याची रब्बी हंगामास सुरुवात झालेली असून पेरणी सुद्धा झालेली आहे,पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना वीज कनेक्शन तोडल्याने पीक वाया जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.त्यासाठी आपण तात्काळ वीज कनेक्शन तोडणी थांबवून वीज कनेक्शन जोडणी करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल अश्या आशयाचे निवेदन म.रा.वि.कंपनीचे कार्यकारी अभियंता पवार साहेब यांना देतांना भाजपचे जेष्ठ नेते शिरीषआप्पा बयास,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,ता.सरचिटणीस सुनील पाटील सर,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी,शहराध्यक्ष…

Read More

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात कोरोना संसर्गामुळे हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. काम करणारी तसेच कुंटुंबप्रमुख व्यतींचा या कोरोना महामारीमध्ये मृत्यू झाला. अनेक कुटुंबं उघड्यावर आली. मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हा निधी देण्यात येईल. नातेवाईकास पन्नास हजार रुपये सानुग्रह सहाय्य दिले जाणार राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: साईबाबा मंदिराजवळ अज्ञात टोळक्याने केलेल्या चाकूहल्ल्यात एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील रहिवाशी कापूस व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली . चाकूहल्ल्यात मृत्यू झालेल्या या व्यापाऱ्याचे नाव स्वप्नील रत्नाकर शिंपी ( वय ३२ ) आहे . स्वप्नील शिंपी हे दिलीप उर्फ गुड्डू राजेंद्र चौधरी ( वय ३२ , रा – फरकांडे ) यांच्यासोबत भागीदारीमध्ये कापसाचा व्यापार करीत होते . आज हे दोघे भागीदार होंडा सिटी कारने ( क्रमांक एम एच ०१ – ए एल ७१२७ ) जळगावला त्यांची रक्कम घेण्यासाठी आले होते जळगावला येऊन ते त्यांना मिळालेले व्यवसायातील जवळपास १० ते १५ लाख रुपये…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला तसेच याप्रसंगी २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे “माझे संविधान, माझा अभिमान” या अभियान अंतर्गत संविधान दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमला माल्यार्पण केले तसेच शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. तद्नंतर २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या हुतात्म्यांना व प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविकात उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी काळे कायदे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना, इव्हीएम मशीन रद्द करणे, मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षण पूर्वरत सुरू करावे व खाजगीकरण रद्द करण्यात यावे यासंदर्भात कायद्याच्या चौकटीत राहून जेलभरो आंदोलन करण्यात आले. या जेलभरो आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय ओबीसी मोर्चा चे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी केले. तत्पूर्वी कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हयात प्रशासनाने संविधानिक कायद्याअंतर्गत ३७/१ लागू असल्याने आबासाहेब राजेंद्र वाघ यांना अटक करण्यात आली. नंतर सोडण्यात आले. यावेळी धरणगांव पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक अहिरे साहेब यांना…

Read More

माणसाने माणसाशी माणसा प्रमाणे वागावे हे संविधान शिकवते – न्यायाधीश एस.डी. सावरकर प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: विकल्प ऑर्गनायझेशन व वकील संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर शतकोत्तर परंपरा असलेल्या पी. आर. हायस्कूल सोसायटीच्या प्रांगणात अतिशय उत्साहात संपन्न झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प.रा. विद्यालयात विकल्प ऑर्गनायझेशन व वकील संघ धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलत असतांना धरणगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एस.डी. सावरकर यांनी सांगितले की, ‘संविधान आपल्याला कसे वागावे, कसे बोलावे, आपले वर्तन कसे असावे याची माहिती देत माणसाने माणसाशी माणसा प्रमाणे वागावे याची शिकवण आपल्याला देते. व्यक्तीने अधिकारा सोबतच कर्तव्यांची देखील…

Read More