Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

1 लाख  68 हजारासाठी ब्लॅकमेलिंग करणाऱ्याला एलसीबी अटक केली लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : आजारातून बरे होण्यासाठी जडीबुटीचे औषध देण्याच्या बहाणा करून 3 लाख १३ हजार रुपये घेऊन विवस्त्र फोटो काढून 1 लाख 68 हजारासाठी ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागत असलेल्या एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, सुनिल मडकू पाटील (वय-४४) रा. पारोळा जि. जळगाव हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. त्यांनी किरकोळ आजार होता. आजारापासून दिलासा मिळावा म्हणून त्यांनी भडगाव तालुक्यातील कोळगाव येथे एका रस्त्यावर औषधाचा विनापरवाना कॅम्प लावणाऱ्या संशयित आरोपी सुरजसिंग राजूसिंग चितोडीया रा. केसरनगर, भुसावळ…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। धरणगाव येथून जवळ असलेल्या बांभोरी येथून डिझेल घेवून घरी जाणाऱ्या तरूणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना आज दुपारी घडली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. योगेश मराठे (वय-१९) रा. बोरगाव ता. धरणगाव असे मयत तरूणाचे नाव आहेयाबाबत माहिती अशी की, योगेश मराठे हा तरूण (एमएच १९ डीयू ५३७९) क्रमांकाच्या दुचाकीने गावापासून जवळ असलेल्या बांभोरी येथे डिझेल घेण्यासाठी आला होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास डिझेल घेवून परत गावाकडे जात असतांना समोरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने योगेश मराठे हा जागीच ठार झाला आहे. घटनेची माहिती मिळाला धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, गोपनीय विभागाचे मिलिंद…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : बस कर्मचाऱ्यांचा संप येत्या दोन दिवसात नही मोडल्यास स्वतः बस स्थानकातून बस बाहेर काढणार असे वक्तव्य आमदार चंद्रकांत पाटील यांनी काढले. गेल्या दीड महिन्यापासून बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे शासनाने त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य केले असले तरीही शासन विलीनचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे अजूनही बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे या संपामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहे आज सकाळी गारखेडा येथे ॲपे रिक्षा छोटा मिनी ट्रक यात झालेल्या अपघातात तीन जण दगावले. यावर बोलताना आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की   बस आगरा मध्ये असलेल्या कार्यक्रमात गेलो असता बस कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचे अल्टिमेटम दिले असून दोन दिवसात बस पूर्ववत…

Read More

धरणगाव प्रतिनिधी : येथे संत गाडगेबाबा ची 65 वि पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले यावेळी श्री वाघ यांनी आपल्या मनोगतात संत गाडगेबाबा याचे विचार मांडले गाडगेबाबानिदिलेल्या दस सूत्री नियमाचे पालन जर केले तर मानवी आयुष्य समृद्ध होईल. यावेळी त्यांनी सावकाराचे कर्ज घेऊ नका, अडाणी राहू नका, एक वेळेस भुके राहा पण मुलबाळ ना शिकवा असे संदेश गाडगेबाबा नि दिले असे वाघ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले तसेच कॉग्रेस चे प्रदेश सचिव डी जी पाटील यांनी संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक असून त्यानी रंजले गाजले, दिन दुबळे , अपंग अनाथ लोक साठी धर्मशाळा बांधली असे मत व्यक्त केले तर राष्ट्रवादी चे…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील : येथे आज सकाळी दहा वाजेला महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी कार्यकर्त्यांना भेट देऊन त्यांचा उत्साह वाढवला. आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा चोपडा येथील नवीन पाणी योजनेच्या उद्घाटनासाठी नियोजित दौरा होता जळगाव येथून चोपडा रवाना होत असताना धरणगाव येथे त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेत हितगुज साधली व कार्यकर्त्यांना पक्ष कार्यासाठी तत्पर राहण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, धरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन तसेच माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धनराज माळी, प्रा. एन. डी. पाटील, रवींद्र पाटील, दिपक वाघमारे, मोहन पाटील, अरविंद देवरे, नाटेश्वर पाटील, निलेश…

Read More

त्यांना मंत्री हे बाळासाहेबांनी केले होते – ना गुलाबराव पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : एकनाथराव खडसे हे मंत्री असताना माझ्या मतदारसंघात रस्ते मंजूर केली असतील मात्र त्यांना मंत्री हे बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते असा  घनघणाती टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना लगावला. मी माझ्या मतदारसंघात विकास केला आहे बोदवड परिसर सिंचन सारखे योजना माझ्या मतदारसंघात रखडलेले नाही मी आजही धरणगावला वेळेवर पाणी देतोय अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर निशाणा साधला असून ते मंत्री असताना माझ्या मतदारसंघात रस्ते मंजूर केले असतील मात्र  त्यांनाही मंत्री हे बाळासाहेबांनी केलं हे त्यांनी लक्षात ठेवावं अशा शब्दात गुलाबराव यांनी घणाघात केला आहे

Read More

राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असे वातावरण तयार करण्यात येत आहे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्यात एक वातावरण तयार करण्याचे प्रयत्न केला जात आहेत ते राज्यात कायदा व शिस्त राहिली नाही पोलिसांचे नियंत्रण समाजावर राहिलेले नाही.तसेच आपल्या कडे येणारे  लोकप्रतिनिधी हे आपल्या कामासाठी येत नाही ते लोकांची समस्या घेऊन येतात त्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणूक द्यावी अशा कानपिचक्या आज राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनीपोलीस मुख्यालय इमारतीचे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या घरांचे उद्घाटन कार्यक्रमात बोलताना काढले. जळगाव येथील पोलीस मुख्यालय मारुती व पोलिस इमारतीचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : ‘कोविड- 19’ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या उत्पन्नात मोठी घट झाली असूनही नागरिकांच्या आरोग्यासह त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी निगडित असलेल्या योजनांना राज्यातील महाविकास आघाडी शासन प्राधान्याने निधी उपलब्ध करून देत आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले. चोपडा नगरपरिषदेच्या 64.76कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नूतन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभाचा उद्घाटन सोहळा गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते   पार पडला. यावेळीकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते तर आमदार अनिल पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजीमंत्री एकनाथराव खडसे, उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी, माजी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : खासगी कोचींग क्लासमधील सॉफ्टवेअरमध्ये बदल करून दुसऱ्याला देऊन फसवणूक केल्या प्रकरणी एका तरूणीच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात माहिती असे की, खासगी क्लासेसचा डाटा कॉपी करुन सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करुन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल देवेंद्र चढ्ढा (वय ५०, रा. विशाल कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जून २०१६ ते २०१७ दरम्यान दीपाली दीपक भदाणे यांनी चढ्ढा यांच्या खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची यादी इतर व्यक्तींना मेलद्वारे पुरवली. क्लास मॅनेजमेंट व ओएमआर या सॉफ्टवेअरमध्ये परस्पर बदल करुन फसवणूक केली. अशी फिर्याद चढ्ढा यांनी दिली आहे.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील एका कार्यक्रमात मी रस्त्यांबाबत वक्तव्य केले होते.चांगले रस्ते असावेत अशी अपेक्षा त्यामागे होती. परंतु माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असा खुलासा ट्विटर व फेसबुक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदर आहे तसेच महिलांविषयीही आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना होती, आजही आहे आणि यापुढेही राहील असेही मंत्री श्री.पाटील यांनी स्पष्ट केले. आणि होणाऱ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Read More