धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील गंगापुरी बु. ग्रामपंचायत तर्फे जन आरोग्य कार्ड तयार करून ते वितरित करण्यात येणार आहेत. हे जन आरोग्य कार्ड बनविण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरातील कुटुंब प्रमुखांचा पासपोर्ट १ फोटो, आधार कार्ड झेरॉक्स प्रत व पूर्ण कुटूंबासाठी १५०/- रूपये फी. घेऊन सकाळी ०९ वाजता गावातील समाज मंदिर ओट्यावर पिंपळाच्या झाडाखाली हे कार्ड तयार करून मिळणार आहेत. ज्यांना कोणाला कार्ड काढायचे आहे त्यांनी हे कार्ड अवश्य काढा. हे कार्ड खाजगी दवाखान्यात वापरता येते. आरोग्य कार्ड पूर्ण परिवारा करिता आहे. आरोग्य कर्डात परिवारामधील अकरा लोकांची नावे टाकून मिळतात. आरोग्य कार्ड लगेच बनवून मिळेल. जन आरोग्य कार्ड नोंदणीत ओपीडी, आयपीडी बिलामध्ये…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
गडकिल्ले हेदाखविले आपले जीवन स्मारक आहेत त्यांना जीवित करणे गरजेचे आहे – छत्रपती खा संभाजी राजे भोसले चाळीसगांव प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे तर होतेच त्यासोबत राज्य कसे चालले पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले, रयतेवर महिलांवर अन्याय अत्याचार केला त्यास शासन कसे करावे हे महाराजानी दाखवून दिले आज चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण होत आहे हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण प्रसंगी केले महाराष्ट्र मध्ये राहणारे टाटा, अंबानी, शिवभक्त, शिवप्रेमी यांना सोबत घेऊन किल्ले संवर्धन साठी फोर्थ फेडरेशन…
तक्रार : फेर प्रभाग रचनेची मागणी!आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीची निवडणूक आयोगाकडे धाव लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचना फुटी प्रकरणी अखेर निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आलेली असून फेर प्रभाग रचनेची मागणी करण्यात आलेली आहे. आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते प्रविण पाठक यांनी याबाबत तक्रार दिलेली असून तक्रारीच्या प्रति नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. टीईटीनंतर या प्रभाग रचना फुटी प्रकरणाकडे समस्त राज्याचे लक्ष लागून आहे. कोणत्या राजकीय पुढार्यांच्या सांगण्यावरून प्रभाग रचना करण्यात आली, कोणी केली व ती कोणी फोडली हे उजेडात कधी येणार याकडे समस्तांचे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भांड्यांसह दागिन्यांनाही पॉलीश करून देण्याचा बहाण्याने अज्ञात दोन भामट्यांनी महिलेचे ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र व कानातले टॉप्स लंपास केले.ही घटना मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी मेहरूण येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, मेहरूण परिसरातील रेणूका हॉस्पिटल समोर संगिता विजय सोनवणे (वय-४२) ह्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिला घरात काम करत असतांना अज्ञात दोन भामटे (वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष) आले. त्यांनी तांबा व पितळाचे भांडे पॉलीशी करून देत असल्याचे सांगितले. त्यानुसार संगिता सोनवणे यांनी भांडी पॉलीश करण्यास दिले.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : केळीचे हजाराच्या पैसे घेवून घरी परतणाऱ्या भोकर-भादली येथील शेतकऱ्याला अज्ञात पाच हल्लेखोरांना बेदम मारहाण करून ५० हजाराची रोकडसह सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठी जबरी हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना दि 28 रोजी रात्री घडली. जखमी शेतकऱ्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. याबाबत माहीती अशी की, निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७) रा. भोकर भादली ता. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतातील केळी तालुक्यातील किनोद येथील व्यापाऱ्याला विक्री केले होते. त्याचे पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे दुचाकीने सायंकाळी ५ वाजता किनोद येथे गेले होते. व्यापाऱ्याकडून ५० हजार रूपयांची रोकड घेवून ते दुचाकीवरून भोकर…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ शहर पुन्हा खुनाने हादरले आहे. 32 वर्षीय महिलेचा खून करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. भुसावळ शहरात खुनांचे सत्र थांबायला तयार नाही. मद्यपी पतीचा महिलेने खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुन्हा शहरातील सुचित शुभम बारसे (32, रा.कवाडे नगर, भुसावळ) या विवाहितेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपीने महिलेच्या छातीवर चाकूचे अनेक वार करून तिचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. वर्दळीच्या आरपीडी रस्त्यावर पोलिस चौकी क्रमांक सात असून या चौकीच्या मागे असलेल्या निर्जनजागी ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचा अंदाज…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : रोहिणी खडसेंवर झालेल्या हल्ला हा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं फुलाचा एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला या हल्ल्यामध्ये बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी आपल्यावर हल्ला चढविला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा थरारक घटनाक्रम आज मंगळवार २८ डिसेंबर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितला. त्या म्हणाल्या की, मी सोमवारी २७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे (एमएच १९ सीसी-१९१९) या क्रमांकाच्या कारने येत असताना अचानक त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. कारमध्ये यावेळी त्यांच्यासह त्यांचे…
शाळेला दिली तीस हजार रुपयांची ग्रंथसंपदा आणि बाल शिवराय व जिजाऊंचे पोट्रेट धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलच्या १९९७ च्या दहावीच्या बॅचच्या ९१ माजी विद्यार्थ्यांनी तब्बल पंचवीस वर्षानंतर एकत्र येत स्मृतीतरंग या कार्यक्रमाद्वारे आपल्या गतस्मृतींना उजाळा दिला. याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील प. रा. विद्यालयाच्या १९९७ च्या इयत्ता दहावीच्या बॅचला या वर्षी २५ वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने त्या वेळचे विद्यार्थी पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले आणि शालेय जीवनाच्या विविध सुखद आठवणींना उजाळा दिला.धरणगाव व परिसर तसेच मुंबई, पुणे,नाशिक, औरंगाबाद, रायगड, धुळे, जळगाव, तडोदा, शिरपूर, मलकापूर, खामगाव, सुरत, अहमदाबाद येथून माजी विद्यार्थी मोठ्या…
प्रतिनिधी प्रविण पाटील : तालुक्यातील वसंतवाडी येथे उपसरपंच निवडणूक नुकतीच पार पडली उपसरपंच पदी सखुबाई पाटील यांची निवड बिनविरोध करण्यात आली. वसंतवाडी येथे आज उपसरपंच निवडणूक सरपंच वत्सलाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ग्रामसेवक बबन वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य प्रिती जगताप, अनिता चिमणकारे,अरुणा सोनवणे,भागवत पवार, सखुबाई पाटील,गजमल पवार व भिमराव निकम इत्यादी सदस्य हजर होते.निवडणूक कामी ग्रामपंचायत शिपाई रामेश्वर चव्हाण व कर्मचारी उमेश पाटील यांनी सहकार्य केले. निवडीच्या वेळी एकमेव सखुबाई पाटील यांचा अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध उपसरपंच घोषित करण्यात आले. उपसरपंच निवडणूक यशस्वी होण्यासाठी पॅनल प्रमुख आधार सुकदेव पाटील, भास्कर…
आरोपी काका हा मागील 11 वर्षांपासून पिडीतेला बंधक बनवून तिच्यावर सतत बलात्कार करत होता. विरोध केल्यावर तो तिला बेदम मारहाण करायचा आणि खोलीत कोंडून अनेक दिवस उपाशी ठेवायचा. आरोपीला आता तिच्याशी जबरदस्तीने लग्न करायचे आहे.उत्तर प्रदेशात नात्याला काळीमा, काकाने युवतीचे अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रूलाईव्ह महाराष्ट्र न्यूज : लखनऊ मध्ये गुन्हेगारी वाढलेल्या उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेला धक्का देणारी आणि नात्याला काळीमा फासणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या मावशीच्या पतीने भाचीचे अपहरण करून तिला 11 वर्षे आपल्या घरी डांबून ठेवले. त्यानंतर मागील 11 वर्षे तिची अब्रू लुटल्याची घटना घडली आहे. मावस काकाच्या अतिरेकी कृत्याने परिसरात प्रचंड खळबळ…

