लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील दहीगाव येथील २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवार २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावलपोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील दहीगाव येथील सुरेश आबा नगर यावल रस्त्यावर राहणाऱ्या उच्च शिक्षीत तरूणी सुजाता संतोष पाटील २० वर्ष हिने रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपुर्वी आपल्या राहत्या घरात तिने काही तरी विषारीद्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबत मयत तरूणीचे काका काशीनाथ एकनाथ पाटील (वय-४८) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : । तालुक्यातील रायपूर फाट्यावर हातात तलवार घेवून दहशत माजविणार्या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्याच्या ताब्यातील तलवार जप्त करण्यात येवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शहा शरीफ शहा वय २० रा. रायपूर, कुसूंबा ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना रायपूर फाट्यावर २० वर्षीय तरूण हा तलवार घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, हेमंत कळस्कर, योगेश बारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, सिध्देश्वर डापकर, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने कारवाई करत तलवारीसह संशयित समीर शहा याला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुका पोलीस संघटनेची नुकतीच वार्षीक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यात संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी अशोक पाटील यांची पुनश्च फेरनिवड आली तर संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी प्रफुल्ला चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती रविवारी २ जानेवारी दुपारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी दिली.यावल येथील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शनिवार १ जानेवारी २०२२ शनिवार रोजी दुपारी पोलिस पाटील संघटनेची बैठक घेण्यात आली याप्रसंगी खान्देश विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्र्वर महाजन, प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार अजीज शेख…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतीने आपली कुटुंब प्रमुखाची जबाबदारी समजून गावात कोणताही बालक कुपोषित बालक राहू नये या भावनेतून रविवारी २ जानेवारी रोजी गावातील १० कुपोषित बालके दत्तक घेवून त्यांना सदृढ बनविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या वतीने आदीवासी भागातील बालकांसह कुपोषित बालकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. परंतू सर्वच योजना गरजूंपर्यंत पोहचन नसल्याने आपण गावाचे कुटुंब प्रमुख असल्याची भावना ठेवून गावातील काही कुपोषित बालकांना दत्तक घेवून त्यांनी सुदृढ बनविण्याचा उपक्रम हाती घेण्याच्या कामासाठी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यावेळी गावातील १० कुपोषित बालके दत्तक घेतले आहे. या बालकांचा शारिरीक विकास…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव तालुक्यातील भादली येथील ३५ वर्षीय तरूणाने रविवारी २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीला आली आहे. नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भागवत अशोक फेगडे (वय ३५, रा. भादली) असे मृत तरुणाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली येथील भागवत फेगडे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. फेगडे हे पेट्रोल पंपावर काम करुन उदरनिर्वाह करीत होते. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून भादली रेल्वेस्थानक परिसरातील रेल्वे खंबा क्रमांक ४२८/२ जवळ धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली. काही वेळातच परिसरातील नागरीकांनी मृतदेहाची ओळख…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल फैजपूर रोडवरील एका हॉटेलच्या परिसरात गावठी पिस्तुल व काडतूस बाळगणाऱ्या संशयित आरोपीला रविवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी यावल पोलीसांनी अटक केली आहे. गावठी पिस्तूल व काडतूससह दीड लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित युवराज घारू (वय-२१) रा. श्रीरामनगर यावल असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल-फैजपूर रोडवरील हॉटेल अंजली समोरील एका पानटपरी जवळ संशयित आरोपी सुमित घारू हा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. यावल पोलीस ठाण्याचे पथक रविवारी…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खर्दे येथे पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला धरणगाव पोलिसांनी अटक केली असून पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठाबाई नामदेव जाधव रा. कुशेळावाडी ता. मानगाव जि.रायगड हल्ली मुक्काम खर्दे तालुका धरणगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, विठाबाई जाधव ह्या पती नामदेव रामा जाधव यांच्यासह वास्तव्याला आहे. खर्दे येथील विट भट्टीवर काम करून उदरनिर्वाह करतात. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विठाबाई जाधव या घरी असताना पती नामदेव जाधव याने विट भट्टीसाठी कोळसा व गवत आण असे सांगत होता. त्यावेळी पत्नी ही दारू…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात गेल्या आठवड्यापासून उपचारार्थ दाखल असलेल्या एका ४५ वर्षीय अनोळखी पुरुष व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह पोलीस नाईक भरत चव्हाण पंचनामा केलेा. दरम्यान मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक भरत चव्हाण करीत आहे.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। चाळीसगाव तालुक्यातील रोकडे येथे लग्नासाठी आलेल्या दाम्पत्याचे सुमोर ६ लाख ४९ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, पंढरीनाथ गंगाराम पाटील (वय-५१) रा. गोंडगाव ता. भडगाव जि.जळगाव ह.मु. उल्हासनगर जि. ठाणे हे चाळीसगाव तालुक्यातील रोकडे येथील धनराज उत्तम पाटील यांच्या घरी लग्नाच्या निमित्ताने १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आले होते. लग्न आटोपून ते धरणगाव तालुक्यातील एका नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीचे साडेसहा लाखाचे २७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एका बँगमध्ये ठेवले होते. ते दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिलेला एकाने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी ३५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहते. गावातील गणेश भागवत मोहिते याने ३१ डिसेंबर रोजी रात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान महिलेच्या घराच्या खिडकीतून आत आला. संशयित आरोपी गणेश भागवत मोहिते (वय-३२) हा महिलेला चाकूचा धाक दाखवून महिलेला तिच्या घराच्या खिडकीतून बाहेर ओढत नेले. घराच्या बाजूच्या बांधकाम चालू असलेल्या घराच्या रूममध्ये घेऊन तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी महिलेच्या…

