जळगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता पूर्वतयारी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सी- २ हा कक्ष सुरू करण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिल्या आहेत. सोमवारी दि. १० जानेवारी रोजी त्यांनी कक्षाची पाहणी करीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या. कोरोना महामारीची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार सी-२ हा कक्ष पूर्वीसारखा सुरु करण्याबाबत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सोमवारी पाहणी करीत सूचना दिल्या. येथे पूर्णपणे साफसफाई करीत खाटांचे नूतनीकरण करण्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, गादी व चादरी स्वच्छ असाव्या. वेळोवेळी बदलल्या गेल्या पाहिजे, इतर अनावश्यक…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शहरातील लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. ६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पवयीन मुलगी ही टायपिंगच्या क्लासला जाऊन येते असे आईला सांगून क्लासला गेली. सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या आई व नातेवाईकांनी तिच्या क्लास आणि मैत्रिणींकडे शोधाशोध केली परंतु ती आढळून आली नाही. यासंदर्भात अल्पवयीन मुलीच्या आईने रविवार ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता…
जळगाव प्रतिनिधी । सिंधी कॉलनी परिसरातील लक्ष्मीनगर भागात हनुमान मंदिरासमोर पैशांच्या वादातून तरूणावर चाकूने वार करत जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात ४ जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर माहिती अशी की, समतानगर भागातील रहिवासी आकाश भोला राठोड वय २० हा तरुण कामानिमित्ताने शनिवारी सायंकाळी सिंधीकॉलनी परिसरातील लक्ष्मीनगर भागात गेला होता. यादरम्यान संदीप कोळी याच्यासह इतर तीन जणांनी आकाश सोबत पैशांवरून वाद घातला. या वादातून संदीप कोळी याने आकाशला दगड मारला तर संदीपचा भाऊ याने धारदार शस्त्राने आकाशच्या मांडीवर वार करून दुखापत केली. इतर दोन जणांनाही आकाशला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । पारोळा शहरासाठी नवीन जलकुंभ उभारण्याच्या कामासाठी मंजूर १ कोटीचा निधीतून वेळेत काम सुरू करून निधी खर्च करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारोळा नगरपरिषद क्षेत्रात वाढीव लोकसंख्या पाहता पिण्याच्या पाण्याची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी सध्या असलेली जलकुंभ व जलशुध्दीकरणाची क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. याकरीता शासनाकडून १ कोटी रूपयांची निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे. पारोळा शहरासाठी लागणारे पिण्याचे पाणी तामसवाडी धरणातून जलवाहिनीद्वारे पारोळा शहराला पुरविले जाते. धरणात पाण्याचा पुरेसा साठा असतांना शहरातील नागरीकांना ८ ते १० दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविली आहे. जळगाव शहर- १३, जळगाव ग्रामीण-४, भुसावळ -२५, अमळनेर-२, चोपडा-२५, यावल-१, जामनेर-१, रावेर-४, मुक्ताईनगर-४ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ३८६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ५५२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :- माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, प्रताप विद्या मंदिर चोपडा 1997-98 तुकडी क बैच च्या विध्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा मुख्याध्यापक आणि माजी वर्ग शिक्षक सर यांच्या उपस्थितीत प्रताप विद्या मंदिर चोपडा येथे दिनांक 09 जानेवारी 2022 रोजी पार पडला. कार्यक्रमचे सत्कारर्मूर्ती मुख्याध्यापक आर.आर.शिंदे सरांचे स्वागत माजी विद्यार्थीतर्फे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले, यावेळी माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या जीवनातील विविध पैलूंना उजाळा दिला अनेक शिक्षक भावुक झालेले दिसून आलेत विद्यार्थ्यांनीही शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला स्नेहमेळावा सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक आर.आर.शिंदे सर, यांनी भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून. माजी शिक्षक डॉ.सुधीर चौधरी, माजी शिक्षक एस. बी…
जळगाव प्रतिनिधी । खोटेनगर परिसरातील घरासमोरून दुचाकी व डिक्कीतील लॅपटॉप चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, धिरज विश्वासराव पाटील (वय-४५) रा. गुरूदत्त कॉलनी, खोटेनगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ एडब्ल्यू ४३०६ ) क्रमांकाची मोपेड दुचाकी आहे. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता ते कामावरून आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी घराच्या पोर्चमध्ये पार्किंगला लावली होती. मोपोड गाडी असल्याने त्यांनी त्यांचा १५ हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप देखील दुचाकीच्या डिक्कीत ठेवला होत. रात्री सर्वजण जेवण करून झोपले होते. दरम्यान…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात कौटुंबिक वादात भावावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात सचिन सुरेश सपकाळे हे पत्नी रेणूदेवी सपकाळे यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी सचिन सपकाळे यांचा भाऊ विशाल सुरेश सपकाळे देखील कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास सुरेश सपकाळे हा भाऊ सचिन सपकाळे यांच्या घरी येवून जुन्या कौटुंबिक वादातून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सुरेशने हातातील चाकू सचिनच्या डोक्यावर वार करून जखमी केले तर रेणूदेवी सपकाळे यांना डोक्याला मारहाण केली. दोघांवर जिल्हा शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात उपचार…
पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील वृध्दाचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, कैलास नथ्थु पाखले (वाणी) (वय-६८) रा. निंभोरा बुद्रुक ता. पाचोरा शनिवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरात इलेक्ट्रीकचे किरकोळ काम करीत असतांना त्यांच्या हातालाच वायरचा स्पर्श झाल्याने वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यात ते जागीच ठार झाले आहे. तातडीने त्यांना नातेवाईकांनी पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असत वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंके यांनी मयत घोषीत केले. या घटनेबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा पिंपळगाव (हरेश्र्वर)…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील पाण्याच्या टाकीच्या आवारात असलेल्या खुल्या भूखंडावर जैन इरिगेशन, गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यासह लोकसहभागातून वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची उपस्थिती होती. लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करूया असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी यावेळी उपस्थितांना केले. याप्रसंगी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, सदस्य सविता नंदनवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, सुधीर पाटील, जैन इरिगेशनचे अतिन त्यागी, अनिल जोशी, उद्योजक सुबोध चौधरी, राधेशाम मणियार, तांबापुरा फाऊंडेशनचे अध्यक्ष मतिन पटेल, अमन फाऊंडेशनचे शाहिद सय्यद यांच्यासह…

