जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण ३९ बाधित रूग्ण आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकुण ३९ रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात १७, भुसावळ तालुका-९, अमळनेर-१, चोपडा-३, एरंडोल-४, चाळीसगाव-५ असे एकुण ३९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ९०६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आता ९१ बाधित रूग्ण संख्या झाली असून विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आता कोरोना रूग्ण संख्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
मुंबई वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवरीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे सर्व परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची दिली आहे. राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात काल सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोविड 19 संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. उदय सामंत म्हणाले, राज्यातील फक्त अकृषी…
प्रतिनिधी प्रविण पाटील । जळगाव तालुका शेतकरी सल्लागार समितीची पहिली सभा मंगळवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील कृषी कार्यालयात बैठक घेण्यात आली. ही बैठक समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला जळगाव तालुका समिती सदस्य विलास पाटील, चंद्रकांत पाटील, नामदेव बिऱ्हाडे, नंदु पाटील, संजय माले, जितेंद्र पोळ, नारायण चव्हाण, जिजाबाई सोनवणे, संगीता बोंडे, सुरेखा देशमुख, निर्मला चव्हाण तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी पोकरा या योजनेबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी आत्मा योजनेअंतर्गत समितीचे कार्याबाबत उपस्थित सर्व सदस्यांना माहिती दिली. या बैठकीला मंडळ कृषी अधिकारी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील वेगवेगळ्या भागात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत मंगळवारी ४ जानेवारी रोजी दुपारी पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्यासह पथकाने शहरातील ९ ठिकाणी छापेमारी केली. ९ जुगार अड्ड्यावर कारवाई करून २९ जुगारांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ४१ हजार ९४२ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह पथकाने ९ ठिकाणी छापेमारी करून पोलीसांनी रोकड व मुद्देमाल जप्त केला. यात ९० हजार ९४२…
पालकमंत्र्यांच्या हस्ते तरडे व अहिरे येथे शेतरस्त्यांसह विकासकामांचा शुभारंभ ! धरणगाव प्रतिनिधी : मतदारसंघातील प्रत्येक गावातील शेत-शिवारांना जोडण्यासह नागरिकांसाठी आवश्यक असणार्या सर्व विकासकामांना आता प्रचंड गती मिळालेली आहे. विकासात कोणताही भेदभाव करण्यात येत नसून ग्रामस्थांनी आता कामे सुचवल्यास त्यांना तात्काळ निधी प्रदान करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील तरडे आणि अहिरे बुद्रुक या गावांमध्ये शेतरस्त्यांचे डांबरीकरण आणि अन्य सुमारे १ कोटी ३० लक्ष रूपयांच्या कामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी शेत रस्त्यांच्या कामांना विशेष करून प्राधान्य देण्यात येत असल्याचे आवर्जून नमूद केले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील तरडे आणि…
जळगाव प्रतिनिधी । आकाशवाणी चौकातून पायी जाणाऱ्या तरूणाचा हातातून मोबाईल अज्ञात तीन जणांनी हिसकावून दुचाकीवरून धुमस्टाईल लांबविला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, कल्पेश चंद्रकिरण सपकाळे (वय-२१) रा.गंधर्व कॉलनी, माधव मंदिराजवळ जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकाकडून पायी जात असताना टीव्हीएस कंपनीच्या मोटरसायकली वरून अज्ञात तीन येवून कल्पेश सपकाळे यांच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला व दुचाकीने तीघे पसार झाले. याप्रकरणी रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कल्पेश सपकाळे याच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात तीन…
जळगाव प्रतिनिधी । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नुतन मराठा महाविद्यालयात सोमवार ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते प्राध्यापक प्रबोधिनीच्या ‘कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा’ या उपक्रमाचा सुरूवात करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पणासह विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी व्यासपीठावर नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख, कवयित्री, लेखिका पुष्पा साळवे, संगीत विशारद विशाखा देशमुख, कमलिनी बचत गटाच्या किरण वनकर, अॅड. बोरसे उपस्थित होते. हा उपक्रम ३ ते १२ जानेवारी दरम्यान सुरू राहणार असून, यात क्रांतिज्योती सावित्रीबाई ते राजमाता जिजाऊ यांच्यासह महाराणी येसूबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील विसनजी नगरातील एका दुकानातून ७ हजार रूपये किंमतीचे कलरच्या बादल्यांची चोरी प्रकरणी तीन जणांना मुद्देमालासह अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकाउटंट विजेंद्र श्रावण सोनवणे, हेमंत महादू सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी, आणि रफिक पिंजारी असे अटक केलेल्या संशयित तिन्ही आरोपींची नावे आहे. याबाबत माहिती अशी की, कल्पेश प्रवीणचंद्र वेद (वय-५०) रा. विसनजी नगर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. विसनजी नगरातील राजेश टेन्ट हाऊसच्या गल्लीत असलेले श्रीनाथजी एजन्सी नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानावर हेमंत महादू सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी हा दुकानावर नोकरी करतो. २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानावर…
जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी दि. ३ जानेवारी जनसंपर्क कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच, रुग्णालय व महाविद्यालयाच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले असून लवकरच दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पदभार घेतल्यानंतर सुधारणांना सुरुवात केली आहे. तीन महिन्यांपूर्वी बंद झालेला जनसंपर्क कक्ष सोमवारी दि. ३ जानेवारी सुरु करण्यात आला. सोमवारी ओपीडीमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांनी गर्दी केली होती. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्ह्यातून शेकडो नागरिक वैद्यकीय सेवा घेण्यासाठी दररोज येत आहेत. रुग्णालयाच्या आवारात मुख्य गेट क्र. १ समोर…
जळगाव प्रतिनिधी । वाकोद शिवारातील वाघुर नदीच्या पुलाजवळ ३० डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ट्रक आडवून चालक व क्लिनरला लुटणाऱ्या पाच संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती अशी की, ३० डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वाकोद शिवारातील वाघुर नदीच्या पुलाजवळून जळगावच्या दिशेने रिकामी ट्रक (एमएच १९ सीवाय ६३८६) येत होती. त्यावेळी दोन मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात लुटारूंनी ट्रक अडविलाट्रकचालक व क्लिनर या दोघांना त्यांनी मारहाण करत त्यांच्याजवळ असलेले २ मोबाईल जबरीने हिसकावून पसार झाले होते. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

