Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश स्कूलमध्ये जळके आरोग्य उपकेंद्र अंतर्गत १५ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी कोवीड लसीकरण शिबीराला बुधवारी १२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरूवात करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिक्षण संस्थोचे अध्यक्ष एल.एच.पाटील यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या लसीकरण शिबीराला आरोग्यसेवक सलीम पिंजारी, ए.सी.पाटील, सुनिता सपकाळे, आशा वर्कर्स सरीता पाटील, जयश्री पाटील, मुख्याध्यापक जयश्री पाटील, शिक्षक दिपक सराफ, स्वाती पाटील, योगेश चव्हाण, लिपिक महेंद्र पाटील, भरत पाटील, संदिप पाटील, जळके आरोग्य उपकेंद्राचे सर्व सहकारी उपस्थित होते. लसीकरण शिबीर यशस्वितेसाठी शाळेचे शिपाई प्रमोद मोरे, विजय पवार, संतोष वाघ, असलम मण्यार, रामचंद्र चव्हाण यांनी…

Read More

महामातांचे जीवन कार्य प्रेरणादायी ; पी.डी.पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील धानोरे गावात ३ जानेवारी ते १२ जानेवारी निमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिन याचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला. या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक सरपंच भगवान महाजन यांनी केले. या वैचारिक प्रबोधनाच्या अध्यक्षस्थानी तालुक्यातील प्रसिध्द काँट्रॅक्टर भगवान महाजन होते. प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील सर, हेमंत माळी सर आणि शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून गायत्रीबाई भगवान महाजन, उपसरपंच अशोक पाटील, ग्रा.पं. सदस्य हरी पाटील, राजाराम महाजन, वैजयंताबाई बाविस्कर सुरेखाबाई रोकडे, मायाबाई चांभार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता…

Read More

मुंबई वृत्तसंस्था । महाराष्ट्र राज्यातील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या होमगार्ड बांधवांच्या विविध समस्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती. या बैठकीत होमगार्डचे मानधन विहित वेळेत अदा करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांना विमा सुविधा आणि १८० दिवस नियमित स्वरूपात काम उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. होमगार्डच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी सर्वतोपारी सहकार्य करण्यात येईल, असे अश्वासन होमगार्ड यांना देण्यात आले.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात तब्बत २२१ बाधित रूग्ण आढळून ओ आहे. तर ६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्राकन्वये कळविले आहे. यात जळगाव शहर – ४३, जळगाव ग्रामीण-०४, भुसावळ-१०७, चोपडा-३२, एरंडोल-०५, पारोळा-०२, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०७ असे एकुण २२१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४३ हजार ६०७ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २६१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । गुजराती गल्ली राहणारे जगन्नाथ मोतीराम धनगर यांना त्यांची तीनही मुले त्यांना संभाळत नसून शेतजमीन परस्पर नावे केल्याबाबत तक्रार स्वत: जगन्नाथ धनगर यांनी धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्याकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीची दखल घेत तीनही मुलांना एरंडोल प्रांताधिकारी यांच्या समोर उभे केल्यानंतर चौकशी केली असता खरचं माझी मुले माझा संभाळ करत असून माझी मानस्थिती ठिक नसल्याची कबुली जगन्नाथ धनगर यांनी दिली. सविस्तर माहिती अशी की, गुजराथी गल्लीमधील वृद्ध इसम जगन्नाथ मोतीराम धनगर यांनी त्यांची मुले दिलीप जगन्नाथ धनगर, अरुण जगन्नाथ धनगर व गोविंदा जगन्नाथ धनगर यांचे विरुद्ध सांभाळ करत नसल्याचे व त्यांना अंधारात ठेवून जमीन बळकावल्या…

Read More

जळगाव प्रतिनिधी । भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना कानळदारोडवर घडली. याबाबत तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास लीलाधर चौधरी वय ५२ रा आव्हाणे ता. जळगाव हे जखमी झाले आहे. आव्हाणे येथील विकास चौधरी व त्यांची पत्नी वंदनाबाई हे दोघे जण ३ जानेवारी रोजी त्यांच्या एम.एच.१९ ऐ.वाय ५८१६ या क्रमांकांच्या दुचाकीने चोपड्याकडे जात होते. यादरम्यान कानळदा गावाजवळ एम.एच.४८ ए.टी. १३३९ या क्रमांकाच्या कारने विकास चौधरी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विकास चौधरी यांच्या उजव्या पायाला, तसेच कमरेला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर कार सोडून चालक घटनास्थळाहून पसार…

Read More

जळगाव प्रतिनिधी । गिरणा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या ट्रॅक्टरवर आज सकाळी तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक असे की, गिरणा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक निमखेडी शहरातील कचरा फॅक्टरी भागातून होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मंगळवारी ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला निमखेडी शिवारात कारवाई करण्याचे सूचना दिल्या. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस नाईक सुशील पाटील, भूषण सपकाळे, प्रशांत ठाकूर यांनी विनानंबर असलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. दरम्यान…

Read More

धरणगावात तालुकास्तरीय समितीची सभा संपन्न लाईव्ह महाराष्ट्र न्यूज- येथे काल तालुकास्तरीय पीक विमा समितीची सभा तहसिलदार धरणगाव नितीनकुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी धरणगाव तालुक्यातील एकूण ७००५ शेतकऱ्यांचे पिक विमा बाबत पंचनामे झाले असून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अथवा ऑफलाइन तक्रारी दाखल केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांचे नुकसान यादीतील नावे तपासून आयसीआयसीआय लोम्बार्ड या पिक विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खाती २८ जानेवारीपर्यंत पीक विम्याचे पैसे जमा होणार असल्याचे पिक विमा प्रतिनिधी सागर पाटील यांनी सभेमध्ये सांगितले तसेच तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांना मार्चअखेर रक्कम कंपनीकडे प्राप्त होताच त्यांनाही याबाबत लाभ मिळणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी यानंतर पिकाचे नुकसान असल्यास ७२ तासाच्या आत तालुका कृषी…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील। जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या ६१ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी १० जानेवारी रोजी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहेयाबाबत माहिती अशी की, सुनिल साळुंखे (पुर्ण नाव माहिती नाही, वय-६१) रा. अयोध्या नगर जळगाव हे आजारी असतांना स्वत:हून एकटे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६ जानेवारी रोजी दाखल झाले होते. त्याचा उपचारादरम्यान रविवारी ९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अच्छाव यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान दिलेल्या पत्त्यावरून पोलीसांनी नातेवाईकाचा शोध घेतला असता कुणीही…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील उस्मानिया पार्क येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सलग तीन घरे फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड मुद्देमालाची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, ममुराबाद रोडवरील उस्मानियॉ पार्क येथे रविवारी ९ जानेवारी मध्यरात्री सलग तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे सोमवारी १० जानेवारी सकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. यात फिरोज मोहम्मतद रफिक बागवान रा. उस्मानिया पार्क यांच्या घराच्या मागच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंड कपाट तोडून घरातील ४ तोळ्याच्या दोन सोन्याचे पोत, १० हजार रूपये रोख आणि पैशांचा गल्ला चोरून नेला, त्यांच्या घराच्या बाजूला…

Read More