प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतले पहिले वृत्तपत्र दर्पण चा पहिला अंक प्रकाशित झाला त्यानिमित्त 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल कॅम्पस पाळधी येथे पत्रकार दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला. दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वृत्तपत्रांची पूजा करण्यात आली आणि विध्यार्थ्यांकळून वृत्तपत्राचे वाचन करवून घेण्यात आले. प्रसारमाध्यमांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका हे वृत्तपत्र निभावत असतात आणि वृत्तपत्रांना खऱ्या अर्थाने जिवंत करण्याचे काम आपले पत्रकार बंधू आणि भगिनी करतात. निर्भीड आणि प्रामाणिक कार्याचा आदर्श पत्रकारांच्या रूपाने आपल्या समोर येत असतो.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात अवैध धंद्यावर सलग तीन दिवसांपासून पोलीसांनी छडा लावण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ५ गावठी कट्टे,१ मँगझीन व ७ जिवंत काडतूस अशा १ लाख ४७ हजाराच्या मुद्देमाल हस्तगत करून चौघा जणांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपींना जळगाव तालुका व वरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळ गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची तसेच विदगाव येथील वैष्णवी हॉटेलजवळ एका तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील सहाय्यक निरीक्षक जालिंदर फळे, सहाय्यक…
जळगाव प्रतिनिधी । बसस्थानक आवारात एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एका वकीलावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, बस महामंडळाचे विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी.कर्मचारी हे संपावर आहे. दरम्यान बुधवार ५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता बसस्थानकाच्या आवारात संपकरी बसलेले असतांना ॲड. सतिष रोठे या व्यक्तीने एस.टी. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अश्लिल शब्दाचा वापर करून बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी…
ना. गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे प्रशासकीय मान्यता केल्या सुपूर्द लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : बारामती तालुक्यातील विविध गावांमधील पाणी समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या मागणीनुसार आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या योजनांचा प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. याच्या अंतर्गत तब्बल ३१६ कोटी ८७ लक्ष रूपयांच्या योजनांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश आज ना. पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन सुपूर्द केली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत जळगाव जिल्ह्यातील बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठीचा सुधारित निधी आणि बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकासाठी निधी मिळावा याबाबतची चर्चा करण्यात आली असून याला उपमुख्यमंत्र्यांनी सनिधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.*या…
जळगाव प्रतिनिधी । माहेरहून १ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील मंडळींविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील माहेर असलेल्या लता गणेश वंजारी यांचा विवाह रामेश्वर कॉलनीतील गणेश संजय लाडवंजारी यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दोन महिने चांगले गेल्यानंतर पती गणेश लाडवंजारी याने पैश्यांसाठी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तुझ्या वडीलांकडून एक लाख रूपये आणण्याची मागणी केली. परंतू वडील पैसे देवून शकत नसल्याने सासरे, सासून दिर व दिरानी यांनी शरिरीक व मानसिक छळ केला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या…
जळगाव प्रतिनिधी । बळीराम पेठेतील जळगाव जिल्हा पत्रकार संघातील सभागृहात गुरूवार ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून माल्यार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या लक्षात घेता बळीराम पेठेतील जळगाव जिल्हा पत्रकार संघातील सभागृहात पत्रकार दिन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. ‘पत्रकार दिन’ मर्यादित स्वरूपात शासनाने दिलेल्या नियमावली नुसार मास्क लावून, ठराविक अंतर ठेवुन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिरूळे, कार्याध्यक्ष अशोक भाटिया, ग्रामीण जिल्हाध्यक्ष…
जळगाव प्रतिनिधी । पत्नीला मारहाण करून खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांनी दिला आहे.अनिल चावदस सपकाळे वय ३० रा. शिक्षक कॉलनी जामनेर असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, ३ फेब्रुवारी रोजी जामनेर येथे शिक्षक कॉलनीत अनिल चावदस सपकाळे याने त्याची पत्नी मनिषा सपकाळे हिच्या डोक्यात मारहाण करत गंभीर दुखापत केली. उपचार सुरु असतांना दुसर्या दिवशी ४ फेब्रुवारी मनिषा हिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मनिषाची आई प्रभाबाई निना कोळी यांच्या फिर्यादीवरुन जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा न्यायालयात प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा कोरोना अहवालात दिवसात एकुण ४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर एक बाधित रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जळगाव जिल्ह्यात आत दिवसभरात एकुण ४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर- १५, भुसावळ-२१, अमळनेर-२, धरणगाव-१, एरंडोल-३, रावेर-१, चाळीसगाव-३ असे एकुण ४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरातून जिल्ह्यात एक रूग्ण बरा होवून घरी गेला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाखप ४२ हजार ९५२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३७ रूग्ण बरे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। राज्य शासनाच्या वतीने शासकीय व निमशासकीय कार्यालयात परिपत्रकानुसार महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देवून केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय व निमशासकीय कार्यालयात महापुरुषांच्या जयंत्या साज-या करण्यात येत असतात, परंतु नविन जीआर नुसार काही महापुरुषांची नवीन नावे समाविष्ट करण्यात आली आहेत, परंतु मागील वर्षी आमच्या निदर्शनास असे आले कि, कार्यालयाला सुटीचे दिवस असल्याने कर्मचारी, अधिकारी न येणे तसेच संबंधित महापुरुषांच्या प्रतिमा उपलब्ध नसने,या कारणांमुळे मागिल दोन,तीन वर्षे पासुन बरेच शे महापुरुषांची जयंती साजरी होत नाही असेआम्हाला स्थानिक पातळीवर निदर्शनास येत आहे,तरी हा महापुरुषांच्या…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील हुडको भागात राहणाऱ्या तरूणाला किरकोळ कारणावरून लोखंडी पट्टीने डोक्यावर मारून जखमी केले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन रमेश पाटील (वय-२४) रा. हुडको शिवाजी नगर जळगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गजानन पाटील हा मजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्यासोबत बबलु जोहरे रा. हुडको हा देखील राहतो. दरम्यान मंगळवारी ४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गजानन पाटील आणि बबलु जोहरे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यात बबलू जोहेरे हा दारूच्या नशेत गजाननला शिवीगाळ करून मारहाण करून डोक्यात लोखंडी पट्टी टाकली.…

