जळगाव विजय पाटील : भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्ता कट करून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर नाराज पाटील यांनी हाती शिवबंद बांधून त्यांचे मित्र व भाजपमधीलच पदाधिकारी करण पवार यांच्या पाठीशी उभे राहून भाजप विरुद्ध आता सामना पुकारला आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असेल उमेदवार बदलण्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्या भाजप कार्यालयात गुरुवारी दुपारपासून बैठकींचे सत्र सुरू पहावयास मिळाले. यावेळी माजी खासदार रे टी पाटील गिरीश महाजन यांच्यामध्ये बंद दारआड चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. नाराज झालेले उन्मेष पाटील यांनी भाजपला राम राम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. महाविकास आघाडीतर्फे जळगाव लोकसभा…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
धरणगाव – तालुक्यातील आहिरे बुद्रुक येथील रहिवासी पांडुरंग नागो पाटील (वय ६५) यांचे आज शनिवार ता. ३० मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत यात्रा आज दुपारी ४ वाजता राहत्या घरून निघेल. ते दीपक, वासुदेव पाटील यांचे वडील आहे. तर त्याच्या पश्चात पत्नी, दोन सूना, नातू असा परिवार आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका असून विजेच्या कडकडाट सह चाळीसगाव शहरासह तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील पाटणा, गणेशपूर, बेलदारवाडी, बाणगाव, शिंदी आणि ओढरे गावात गारपीट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक गहू आणि हरभरा पिकाला फटका बसला आहे.
ठाकरे गटाचे पालकमंत्रीना आव्हान; जळगाव ग्रामीण मधून सुनील महाजन निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक..! जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघांमध्ये ही आता राजकीय गणिताला वेग आला आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन विधानसभेसाठी निवडणूक लढणार आहेत. पक्षाने आदेश दिल्यानंतर ते जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. आगामी लोकसभा निवडणूकानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रतिष्ठित नेतेमंडळी गुडघ्याला बाशिंग बाधून तयार असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुनिल महाजन यांच्या पत्नी माजी महापौर जयश्री महाजन यांनी पत्रकार परिषद घेवून आमदारकी लढविण्याची तयारी दर्शविली. तर दुसरीकडे त्यांचे…
जामनेर : मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन फाउंडेशन व न्यू रुबीस्टार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नव वर्षात नवीन संकल्पनांसह विविध योजनाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या योजनांमध्ये जीवन संजीवनी योजना, दिपज्योती योजना, मातृवंदना योजना, आधार वड योजना यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या योजनांतर्गत रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे, डॉ. रागिणी पारेख यांच्या सारख्या नामांकित डॉक्टरांकडून वैद्यकीय सेवा आता जामनेरमध्ये मिळणार आहे. जर एखादा रुग्ण सरकारी योजनेत बसत नसेल तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा चॅरिटी बेडच्या माध्यमातून त्या रुग्णावर मोफत उपचार करण्यात येतील. मंगळवारी पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याला जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधनाताई…
जळगाव शहरात पुन्हा एकदा वाळू माफ यांचा हैदोस सुरू झालेला आहे रात्रीच्या सुमारास जळगाव भुसावळ महामार्गावर निवासी जिल्हाधिकारी गस्तीवर असताना त्यांना अनोळखी वाळूमाफेंनी त्यांच्या चारचाकी शासकीय गाडीवर हल्ला केला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव भुसावल महामार्गावर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध वाळूमाफिया सुरू असते याची माहिती निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांना मिळाली असता त्यांनी लागलीच या परिसरात गस्तीवर गेले असता अनोळखी वाळू माफियांनी त्यांच्या शासकीय गाडीची तोडफोड करीत त्यांच्यावर देखील हल्ला केला आहे. या घटनेत निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार हे जखमी झाले असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे. या घटनेची माहिती महसूल व पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली होती.…
जळगाव : प्रतिनिधी समाज कल्याण विभागाच्या वतीने अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या १०० विद्यार्थी क्षमतेच्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारतीचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ४ फेब्रुवारी २०२४ रोजी होत आहे. दुपारी २:३० वाजता संपन्न होणार या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, श्री अजित दादा पवार , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील ,आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी श्री.अंकित , मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रशांत औटी, समाज कल्याण नाशिक…
धरणगाव -अमृत 2.0 अंतर्गत धरणगाव शहरासाठी आपण वाढीव पाणी पुरवठा योजना सदर योजने अंतर्गत प्रस्तावित केली होती. शहरासाठी 44 कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजनेचे. राज्य शासनाचे. राज्य स्तरीय तांत्रिक समिती कडे सादरीकरण करण्यात आले होते त्यास. मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. धरणगाव शहराला नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा वर्षाचे 365 दिवस व्हावा यासाठी पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री पाणी पुरवठा व स्वचछता गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा वितरण प्रणालीचे काम सुरू होते. लवकरच शहराला नियमित पाणी पुरवठा होणार होता.परंतु शहराचा पाण्याचा स्त्रोत तापी नदीवर धावडा येथून आहे, तेथील पाइप लाईन ही जुनी झाल्याने वारंवार लिकेज् होत असते. म्हणून…
जळगाव तालुक्यातील वारकरी भजनी मंडळांना झाले साहित्याचे वाटप जळगाव प्रतिनिधी दि. ०१ – सांस्कृतिक व धार्मिक परंपरा टिकून ठेवण्यासाठी भजनी साहित्य वाटप केले जात आहे. जीवनाची वाट सुकर होण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार समाजाला तारू शकतो. वारकरी संप्रदायाने सनातन संस्कृती टिकवली असून गावा – गावात संप्रदाय वाढवाला आहे. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. वडली येथील भाऊसो गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयात दुसऱ्या टप्यातील भजनी साहित्य वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सकाळी…
जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जळगावचे पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली आहे.एम. राजकुमार यांची सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबई येथील पोलीस उपायुक्तपदी असलेले एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी येत आहेत. राज्य शासनाचे मुख्य सहसचिव व्यंकटेश भट यांनी तसे आदेश काढले आहेत.

