Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव जिल्ह्यात भाजपात खळबळ ; उमेदवार बदल करण्याबाबत एकच चर्चा
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात भाजपात खळबळ ; उमेदवार बदल करण्याबाबत एकच चर्चा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 5, 2024Updated:April 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव विजय पाटील : भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्ता कट करून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर नाराज पाटील यांनी हाती शिवबंद बांधून त्यांचे मित्र व भाजपमधीलच पदाधिकारी करण पवार यांच्या पाठीशी उभे राहून भाजप विरुद्ध आता सामना पुकारला आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असेल उमेदवार बदलण्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्या भाजप कार्यालयात गुरुवारी दुपारपासून बैठकींचे सत्र सुरू पहावयास मिळाले. यावेळी माजी खासदार रे टी पाटील गिरीश महाजन यांच्यामध्ये बंद दारआड चर्चा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे.

    नाराज झालेले उन्मेष पाटील यांनी भाजपला राम राम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. महाविकास आघाडीतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातर्फे करण पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. भाजपत इच्छुकांनी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात माजी खासदार ए. टी. पाटील  यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली. या दोघांमध्ये भाजप कार्यालयातच बंद दाराआड चर्चा झाल्याने भाजप उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा राजकीय क्षेत्रामध्ये होऊ लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरघोस नफ्याचे आमिष; तरुणाला ९७.५० लाखांचा ऑनलाइन गंडा

    June 28, 2026

    गिरणा नदीपात्रातील वाळूमाफियांवर पोलिसांचा दणका; १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

    June 28, 2026

    दोन मित्रांमध्ये पैश्यांवरून वाद : एकाने संपविले आयुष्य !

    June 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.