जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जळगावचे पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली आहे.
एम. राजकुमार यांची सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली झाली असून त्यांच्या जागी मुंबई येथील पोलीस उपायुक्तपदी असलेले एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी येत आहेत. राज्य शासनाचे मुख्य सहसचिव व्यंकटेश भट यांनी तसे आदेश काढले आहेत.