Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

पालकमंत्र्यांच्या हस्ते म्हसावद व चिंचोली येथे शासकीय भरड धान्य खरेदीस प्रारंभ ! जळगाव प्रतिनिधी । राज्य शासन हमी भावाने धान्य खरेदी करत असल्याने शेतकर्‍यांना वाजवी दर मिळून त्यांना लाभ होत आहे. तर धान्य दीर्घ काळापर्यंत सुरक्षित टिकवण्यासाठी गोदाम आवश्यक असून म्हसावद येथे गोदामाच्या बांधकामासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील म्हसावद येथे शेतकी संघातर्फे शासकीय भरडधान्य योजनेचा शुभारंभ करतांना बोलत होते. याप्रसंगी त्यांनी शेतकी संघाने धान्य खरेदीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना उत्तम भाव देतांनाच संस्थात्मक पातळीवर नफा मिळवल्याबद्दल कौतुक केले. तर यानंतर चिंचोली येथे कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेतर्फे शासकीय धान्य खरेदीचा शुभारंभ पालकमंत्र्यांनी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी कळमसरा (ता. पाचोरा) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. कळमसरा येथील सरपंच अशोक चौधरी व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात डॉ. मनोज पाटील (न्यूरोलॉजिस्ट), डॉ अतुल भारंबे (कॅन्सर तज्ञ), डॉ श्रीराम महाजन (प्लास्टिक सर्जन), डॉ अभिजित पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. अनुश्री व्ही (एम. डी. मेडिसीन), डॉ वृषाली पाटील (नेत्ररोग…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा कोवीड प्रशासनाने शुक्रवारी पाठविलेल्या कोरेाना अहवाला दिवसभरात एकुण ८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. जळगाव जिल्ह्यात आज शुक्रवार ७ जानेवारी रोजी दिवसभरात एकुण ८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर -३१, भुसावळ तालुका-२४, चोपडा-२७, यावल-२, रावेर-१, चाळीसगाव -३ असे एकुण ८८ बाधित रूग्ण आढळले आहे. आता जिल्ह्यात २२३ बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ४० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल छगन सपकाळे (वय-३१) रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. अमोल हा भाऊ रविंद्र आणि आई विजूबाई यांच्यासह वास्तव्याला आहे. हातमजूरी आणि वाहन चालकाचे काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी ६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता आईला गावाला जावून येतो असे सांगून घराबाहेर निघाला. अमोल हा गावाला न जाता आव्हाणे शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ३००/ ३७ ते ३२६ या दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्यातील विविध शासकीय विभागावर दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविले आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा दिशा स्पर्धा परिक्षा केंद्राच्या वतीने करण्यात आला आहे. यांचा झाला सत्कार माधव पवार, कैलास पाटील (नवी मुंबई पोलीस), आरती पाटील, वसंत मारणार (नंदूरबार पोलीस), भटेसिंग पाटील (आरबीआय सुरक्षारक्षक), यश पाटील, योगीता वर्मा, जयश्री बिऱ्हाडे (नवी मुंबई चालक) यांची निवड झाल्याचे मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी यांची उपस्थितीयाप्रसंगी प्रा.वासुदेव पाटील, प्रा.मदन बनसोडे, प्रा.उमेश सूर्यवंशी, प्रा.कपिलदेव कोळी, प्रा.ललित विसपुते, राजेंद्र वाघमारे, प्रा.आर. के.पाटील, प्रा.डॉ. अविंत पाटील, प्रा. प्रवीण पाटील यांची उपस्थिती होती.

Read More

फैजूपर प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परिसरात ६ वर्षीय चिमुकल्याचा गळा दाबून खून करून बापाची गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी फैजपूर पोलीसात नोंद करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निलेश घनश्याम बखाल (वय-३५) रा. विवरे ता. रावेर ह.मु. बसस्थानकच्या मागे मिरची ग्राऊंड, फैजपूर ता. यावल हे आपल्या पत्नी व सहा वर्षाचा मुलगा आर्यन सोबत वास्तव्याला आहे. फैजपूर शहरातील बापू डेअरीचे संचालक आहेत. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांनी पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी बाजारात सोडले. त्यानंतर ते घरी गेले. दरम्यान ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ५ जानेवारी रोजी रात्री एकाच वेळी अयोध्यानगर, तांबापूरा, शनीपेठ परिसरासह इतर भागात गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. यात एमआयडीसी पोलीस हद्दीत तीन ठिकाणी, जिल्हापेठ हद्दीत चार ठिकाणी तर शनीपेठ पोलीसांनी तीन ठिकाणी असे एकुण १० ठिकाणी छापा टाकला. यात ११ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे ४ लाखाचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरात दोन दिवसांपुर्वी पोलीसांनी सट्टा व जुगार अड्ड्यांवर पोलीस अधिक्षकांनी धाडसत्र राबविण्यात आाले होते. त्यानंतर पोलीसांनी बुधवार ५ जानेवारी रोजी रात्री विना परवाना गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून कारवाई केली आहे.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । मेहरूण परिसरात अनोळखी ६० ते ६५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन एमआयडीसी पोलीसांनी केले आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील मेहरूण परिसरात गुरूवार ६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका अनोळखी ६० ते ६५ वर्षीय पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला होता. एमआयडीसी पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी याबाबतची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला कळवली. एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे दाखल अकस्मात मृत्यू प्रकरणी अनोळखी इसमाच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर अनोळखी मृतदेह सामान्य रुग्णालयात…

Read More

धरणगाव प्रतिनिधी :- समस्त शिवसेनेच्या मातृतुल्य स्व.माँ साहेब यांच्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रमाणे ह्या वर्षी ही धरणगाव महिला शिवसेना आघाडी तर्फे आयोजन करीत खऱ्या अर्थाने स्व.माँ साहेबांना आदरांजली वाहण्यात आली.धरणगाव शहरातील तुळजाभवानी नगरा लगत असलेल्या भिल्ल वस्तीतल्या महिलांनी माॅ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. धरणगाव शहरातील प्रसिद्ध ग्राम दैवत मरीआई परिसरातील माता तुळजाभवानी नगरा लगत असलेल्या भिल्ल वस्तीतील सर्व कष्टकरी महिलांना आज स्व.माँ साहेब मीनाताई ठाकरे जयंती निमित्ताचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडी तर्फे गरीब व गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या या प्रसंगी भिल्ल समाजातील बहुसंख्य महिलांनी हजेरी लावत स्व.माँ साहेबांना विनम्र आदरांजली वाहत…

Read More

महामातांच्या कार्यातून जगण्याची प्रेरणा मिळते – लक्ष्मणराव पाटील धरणगांव प्रतिनिधी : बुधवार रोजी धरणगाव तालुक्यातील पष्टाणे बु. गावात माँसाहेब जिजाऊ ते क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून महामातांच्या कार्याचा जागर करण्यात आला. या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक हेमंत माळी यांनी केले. प्रास्ताविकात माँसाहेब जिजाऊ ते ज्ञानज्योती सावित्रीमाई या मातांचा जन्मोत्सवानिमित्त नऊ दिवसाचा प्रबोधनाचा जागर धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात करण्यात येत आहे. यामध्ये विवरे, भवरखेडे, पष्टाणे, सोनवद, बांभोरी, गंगापुरी, धानोरे, गारखेडे या गावांचा समावेश आहे. या वैचारिक प्रबोधनाच्या अध्यक्षस्थानी पष्टाणे गावाचे सरपंच शिवाजी सैंदाणे होते. प्रमुख वक्ते महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील व शिवव्याख्याते…

Read More