Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र : प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात रविवारी 16 जानेवारी सकाळपासून नगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम सुरू केली असून यात संबंधीतांना दंड ठोठावण्यात येत आहे. सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढीस लागली आहे. या अनुषंगाने आरोग्य प्रशासन सर्तक झाले असुन, जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये यावल नगर परिषद प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने संयुक्तपणे कोवीड१९चे नियम न पाडण्यार्‍यांवर नागरीकांवर कार्यवाहीस सुरूवात केली आहे. यावल शहरातील बुरूज चौकात आज सकाळ पासुन जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये नगर परिषदचे मुख्यधिकारी अविनाश गांगोडे यांच्या व पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व स्थानिक पोलीस कर्मचारी भुषण चव्हाण, राहुल…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कोरोना संकटकाळात संचारबंदीमुळे अनेक सांस्कृतीक कार्यक्रमांना बंदी आली असल्याने अशा कलाकारांना अर्थसहाय्य करण्यासाठी एकल कलाकार अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभासाठी तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. सांस्कृतिक व कला क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील कलाकारांसाठी ही राज्य शासनने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एकल कलाकार एकरकमी अर्थ सहाय्य योजना सुरू केली असुन याकरिता तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांनी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समितीच्या माध्यमातुन अर्थसहाय्य योजनेचे अर्ज प्राप्त करावे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून या समितीचे तालुका पातळीवरील अध्यक्ष तहसीलदार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी, समितीचे सचिव सहाय्यक गटविकास अधिकारी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी पस्तीस वर्षापूर्वीच जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा रविवारी १६ जानेवारी रोजी 11 वाजता घडवून आणला मेळाव्याला ३५ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आदर्श विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी हे शासकीय निमशासकीय, व्यवसायिक, शेतकरी या दर्जातील होते. राज्यभरात विखुरलेले सर्व विद्यार्थी एकत्र आणण्याचे काम तुकाराम सोनवणे व डॉ. शोभना तळेले यांनी केले. या दुग्धशर्करा कार्यक्रमात तिन दशकानंतर आपल्या विद्यार्थ्यांना विद्यालयात पुनश्च पाहुन अक्षरशः सेवानिवृत्त शिक्षकांचे डोळे पाणावले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील तर मुख्याध्यापक एस.डी.चौधरी, सेवानिवृत्त शिक्षक एल.एम. चोपडे उपस्थित होते. प्रास्ताविक सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी गोकुळ पाटील, प्रवीण…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील एका भागातील तरुणीला तरुणाने फोनवरुन तुला मला भेट, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु जर मला भेटली नाही तर मी तुला मारुन टाकून अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रेहान शेख रा. जुने जळगाव याच्याविरोधात शनिवार १५ जानेवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, १९ वर्षीय तरुणी जळगावातील एका भागात राहते. ६ जानेवारी रोजी सायंकाळी रेहान शेख याने तरुणीला मोबाईलवरुन संपर्क साधला. तसेच तु मला भेट, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, तु जर मला भेटली नाही तर तुला मारुन टाकेन अशी धमकी दिली. याप्रकाराने…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । गुलाबी थंडीने धरणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात हुडहुडी भरली आहे. जळगाव जिल्ह्यात पारा घसरल्याने थंडी जाणवू लागली असून, दोन दिवसांपासुन सुर्यदर्शन झालेले नाही. गुलाबी थंडीने जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात आणि इतर ग्रामीण भागात हुडहुडी भरली आहे. थंडी जाणवू लागली असून, दोन दिवसांपूर्वी काही प्रमाणात धुके पडले आहे. पारा घसरल्याने तसेच सुर्यदर्शन नसल्याने गारठा कायम आहे. थंड हवा वाहत असल्याने थंडी जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पहाटेच्यावेळी आणि रात्री शेकोट्या पेटवुन थंडीपासून बचाव केला जात आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कोविड काळात वाढता वैद्यकीय खर्च आणि लॉकडाउनमुळे वेतन कपात यामुळे नोकरदारांसमोर मोठे संकट ओढावले. आपण जर कोवीड पॉलीसी घेण्याच्या विचारात असल तर एकदा ही बातमी वाचा. आगामी काळात इन्श्युरन्स पॉलिसीच्या संरचनेत अनेक बदल होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात वैद्यकीय खर्च आणि लॉकडाउनमुळे वेतन कपात केल्यामुळे कामगार व नोकरदार यांच्यासमोर मोठे संकट ओढावले आहे.इन्युरन्स पॉलिसीमुळे लाखो रुपयांचा वैद्यकीय बिलांचा भार सहन करणे शक्य ठरते. त्यामुळे इन्श्युरन्स पॉलिसी खरेदीकडे अनेकांचा वाढता कल असतो. मात्र, कोविड काळात वाढते डेथ क्लेम आणि पॉलिसी क्लेमच्या संख्येमुळे इन्श्युरन्स कंपन्यांचे बजट कोलमडले आहे. इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये अन्य आजारांसाठी असणारा प्रतीक्षा कालावधी कोविड इन्श्युरन्स धारकांसाठी…

Read More

घरीच झाले क्वारंटाईन जळगाव प्रतिनिधी : जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना कोरनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. काल अचानक त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून, श्री देवकर हे कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. लक्षणे सौम्य असल्याने त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. डॉक्टर घरीच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. गेल्या दोन दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आपापली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन श्री देवकर यांनी केले आहे. कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोरोना अहवालात आज दिवसभरातून ३७७ रूग्ण नवीन आढळून आले आहे. तर ४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण ३७७ कोरोना रूग्ण नव्याने आढळले आहे. यात जळगाव शहर-१५५, जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-१४४, अमळनेर-१३, चोपडा-१५, पाचोरा-१, भडगाव-७, धरणगाव-१, यावल-२, एरंडोल-३, जामनेर-२, रावेर-३, पारोळा-१, चाळीसगाव-२०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ३७७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ४६ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४४ हजार ८०५ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सोनवद रोडवरील विहीर फाट्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक्टर धरणगाव पोलीसांनी पकडले. पुढील कारवाईसाठी पोलीसांनी महसूल विभागाला पत्र दिले आहे. धरणगाव तालुक्यात बेकायदेशीर वाळूची वाहतूक सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांचे पथक सोनवद रोडवरील विहीर फाट्यावर १४ जानेवारी रोजी रात्री गस्तीला थांबले होते. दरम्यान विना नंबरचे एक ट्रक्टर बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना पोलीसांना आढळून आले. गस्तीवर असलेल्या पोलीसांनी ट्रक्टर चालकाला नाव व गाव विचारल्याने महेंद्र बाळू ठाकरे (वय 30 वर्ष, रा.खामखेडा ता.धरणगाव जि.जळगाव) असल्याचे सांगितले. वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलीसांनी ट्रक्टर ताब्यात…

Read More

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकाळी येथे भरधाव ट्रॅक्टरच्या अपघातात झालेल्या मृत्यूप्रकरणी ट्रॅक्टर चालकाला यावल न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. प्रकाश भिमसिंग बारेला रा. साकळी असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात असे की, साक्री येथील डांभुर्णी रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टर चा 17 एप्रिल 2017 रोजी अपघात झाला होता या अपघातात सुकलाल लालसिंग बारेला हा ट्रॅक्टरखाली दबल्याने त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान याप्रकरणी चालक प्रकाश भिमसिंग बारेला याची विरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता याप्रकरणी न्यायालयाने ट्रॅक्टर चालक प्रकाश भिमसिंग बारेला यास सहा महिन्याची शिक्षा व तीन हजार रुपये दंड सूनावला असून अपघातात मृत्यू झालेल्या वारसास ५ हजार रुपये नुकसान…

Read More