जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयात कामानिमीत्त आलेल्या तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीतील फातेमानगरात वास्तव्यास असलेल्या मुश्ताक मुक्तार पटेल (वय-२७) हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हा तरुण २० जानेवारी रेाजी रात्री ८ वाजता कामानिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुचाकीने आले होते. दुचाकी (एमएच.१९सीजी.९६२२) मुख्य प्रवेशद्वारा जवळ उभी केली हेाती. काम अटोपुन परत जाण्यासाठी बाहेर रात्री १० वाजता बाहेर आले व दुचाकीजवळ आले. त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध करुनही वाहन सापडली नाही. मुश्ताक पटेल यांनी जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । अनुदान मंजूर करण्यासाठी २ हजार रूपयांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांच्या मालकीची पाळधी खुर्द येथे शाळा आहे. आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यामागे ८ हजार रूपये असे एकुण १७ विद्यार्थ्यांप्रमाणे एकुण १ लाख ३६ हजार रूपयांची अनुदानाची रक्कम मंजूर होण्यासाठी अनुकुल अहवाला सादर करण्यासाठी २ हजार रूपयांची मागणी गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे रा. राधाकृष्ण नगर, पिंपळे रोड अमळनेर आणि विभगातील कर्मचारी तुळशीराम भगवान सैंदाणे रा. रा.बोरोले नगर, पंडीत कॉलनी, चोपडा. ता.चोपडा, जि.जळगाव यांनी ३० डिसेंबर रोजी २ हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून सोमवारी २४ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्या सांगण्यावरून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शहरातील गोलाणी मार्केटमधील एका व्यापाऱ्याला रास्त भावात माल देण्याचे आमीष दाखवत १ लाख ६० हजार ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकॉलनी येथील रहिवासी सचिन रंगनाथ देशपांडे (वय-४३) यांचे गोलाणी व्यापारी संकुलात व्यवसाय आहे. सचिन देशपांडे यांना भोपाळ येथील व्हेरटेक्स होम केअर इंडस्ट्रीजच्या अभिलाश शर्मा या मालकाने स्वस्त दरात माल पुरवण्याचे आमीष दाखवुन देशपांडे यांना १ लाख ६० हजार रुपये ऑनलाईन खात्यात वर्ग करण्याचे सांगीतले. १२ मार्च २०२१ ते २४ मे २०२१ दरम्यान पैसे वर्ग करुनही माल दिला नाही. याबाबत देशपांडे…
एरंडोल तालुक्यातील धारागीर येथून बनावट दारू साठा जप्त धरणगाव प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुक्ल विभागाने धरणगाव शहरात बनावट दारू तयार करणाऱ्याला अटक केली होती. या प्रकरणात पथकाने तालुक्यातील पाळधी येथून अजून एकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान एरंडोल तालुक्यातील धारागीर येथे टाकलेल्या छाप्यात दीड लाखाचा बनावट दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. सचिन पाटील रा. पाळधी ता. धरणगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शनिवारी २१ जानेवारी रोजी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने धरणगाव शहरात छापा टाकून बनावट दारू निर्मिती कारखाना उध्वस्त केला होता. या कारवाईत संशयित आरोपी भूपेंद्र पाटील याला अटक केली…
जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ३३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २२१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. जळगाव शहर-११९, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ-८७, अमळनेर-२०, चोपडा-२६, पाचोरा-२, भडगाव -५, धरणगाव-१३, यावल-६, एरंडोल-०, जामनेर-८, रावेर-३, पारोळा-०, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-५, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ३३८ रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४७ हजार ८८५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४२ हजार ५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजवर एकुण २ हजार ५८२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यातून २२१ बाधित…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातून वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक आशिर्वाद व शुभेच्छा देण्यात येत आहे. पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील यांच्या वाढदिवस अतिशय साध्यापध्दतीने साजरा करण्यात आला. शिवसेने जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वत: भेट घेत अनिल पाटील यांना पुष्पगुच्छ देवून वाढदिवाच्या शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी उपसभापती प्रेमराज पाटील, किशोर पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील। धरणगाव तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय मतदार दिनी त्यांचा मान्यवरांच्याहस्ते करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, धरणगाव येथील कर्तव्यदक्ष अधिकारी व एक संवेदनशील व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख आहे, असे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार धरणगाव जि. जळगाव यांनी आगामी जि.प. आणि न.पा. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुणीही मतदार वंचित राहू नये यासाठी विविध उपक्रम तालुक्यात राबवले. यामध्ये नवमतदार जे १८ वर्ष पूर्ण केले आहेत अशा विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी केली.…
एरंडोल प्रतिनिधी । महिलेचा अशिक्षितपणाचा फायदा घेत दोन जणांनी शेतावरील हक्कसोड लेखी दस्त नोंदणी केल्याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, कमलबाई आनंदा महाजन (वय-६५) रा. महादेव चौक, पातोंडा ता. अमळनेर या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. त्याच्या नावे पातोंडा शिवारातील शेत गट नं. ६२६/२ आणि ५५६/१ मधील असे दोन शेत आहे. सदरील शेत प्रल्हाद शामराव चौधरी रा. गणपती बाप्पा नगर धरणगाव आणि रमाबाई मधुकर चौधरी रा. रिंगणगाव ता. एरंडोल यांनी कमलबाई महाजन यांचा अशिक्षीतपणाचा फायदा घेत दोघांनी दोन्ही शेतावरील हक्क सोड दस्त नोंदणी केल्याचे उघडकीला आले आहे. दरम्यान, कमलबाई महाजन यांनी एरंडोल पोलीस…
लातूर वृत्तसंस्था । शहरातील विशाल नगरमध्ये साई मंदिराच्या समोर भरदिवसा कोयत्याने वार करून विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लातुरच्या दयानंद महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलेला राहुल सुरेश उजळंबे आणि काही मुलांमध्ये विशाल नगर मधील साई मंदिरासमोर रविवारी साडेबाराच्या सुमारास वाद झाला आणि या मुलांनी राहुलवर कोयत्याने वार करत घटनास्थळावरुन पसार झाले. पोलिसांना माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. राहुलला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. घटनास्थळी एक हत्यार सापडले असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस फरार मुलांच्या शोधात आहेत.
नाशिक वृत्तसंस्था । नाशिक जिल्ह्यातील एका महिला तलाठीला शरीर सुखाची मागणी करण्याचा संतापजनक प्रकार प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात प्रांताधिकाऱ्याविरोधात तक्रार देवून त्याची बदली करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील वर्ग एक पदावर प्रांतअधिकारी म्हणून सोपान कासार यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कासार याने गेल्या वर्षी काही कामानिमित्त एका महिला तलाठ्याला घरी बोलावले. त्यानंतर त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या तलाठ्याने या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याप्रकरणाची प्रकरण चौकशीसाठी विशाखा समितीकडे सोपवण्यात आले आहे. विशाखा समितीने तक्रारदार महिला तलाठी आणि प्रांतअधिकारी कासार या दोघांचेही जबाब नोंदवले. इतर साक्षीदारांचे जबाब घेतले. शिवाय दोघांना समोरासमोर बसवून उलट तपासणीही केली. त्यानंतर…

