जळगाव ( प्रतिनिधी) – खोटे नगर परिसरातून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बंद घरातून अज्ञात चोरटयांनी ३६ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमंग सिमंग भगवानसिंग पाटील (वय ६१) हे पत्नी , मुलगा व सुन या परिवारासह वास्तव्यास आहेत. १५ जानेवारी रोजी कुटुंबासह उमंग पाटील हे खाजगी कामानिमित्ताने पुण्याला गेले होते. २० जानेवारी रोजी ते पुण्यावरुन घरी परतले. याप्रसंगी चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला . चोरट्यांनी उमंग पाटील यांच्या घरातून १० हजारांचा एलईडी टीव्ही, २० हजार रुपये रोख, फोन, ब्लुटूथ स्पीकर, ट्रॅव्हलिंग बॅग असे ६ हजारांचे साहित्य असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
चोपडा (प्रतिनिधी ) – उत्तर प्रदेशमधील तिघांनी एकाची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ४३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील रत्नदिप नगर येथील रहिवासी फिर्यादी अनिल संतोष पाटील यांच्या नातेवाईकांना आरोपी रुद्रप्रताप विजयसिंग, दिनेश रामेश्वरसिंह व मोना दिनेशसिंह यांनी भारतीय खाद्य निगमात आपली मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी आहे. त्यामुळे आम्ही कुणालाही नोकरीला लावून देवू शकतो अशी बतावणी करुन तब्बल ४३ लाख रुपयांची मागणी केली व सदर रक्कम वेगवेगळ्या क्रमांकांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी व साक्षीदार यांनी सदर रक्कम रु. ४३ लाख जमा केली. संपूर्ण रक्कम दिल्यानंतर सुद्धा भारतीय खाद्य निगममध्ये…
जळगाव ( प्रतिनिधी ) – पॆसे आणि घर खाली करून देण्याच्या नावाखाली खंडेराव नगर येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पहिल्या गटातील रविंद्र हरी मोरे (वय 32) रा. शिरसोली ता. जळगाव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खंडेराव नगरातील नसरीन खान आणि अज्जू खान यांनी पैसे देण्यावरून आणि घर खाली करण्याच्या कारणावरून रवींद्र मोरे यांना शिवीगाळ करून त्यांनी मारहाण केली. तर ज्यांना घर विकले आहे. लाला नागो कुंभार आणि रूपा नागो कुंभार यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात नसरीन…
धरणगाव प्रतिनिधी । शहरातील गजानन पार्क येथे बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुक्ल विभागाने धडक कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ११ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसाार, धरणगाव शहरातील गजानन पार्क परिसरात बनावट दारू तयार करून विक्री होत असल्याची गोपनिय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला शनिवारी २२ जानेवारी रोजी दुपारी मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादक शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक सीमा झावरे यांच्यासह निरीक्षक सी. एच. पाटील, दुय्यम निरीक्षक ए. एस. पाटील, एस. एफ. ठेंगडे, जवान एन. व्हि. पाटील, ए. व्ही. गावंडे, एम. डी. पाटील, के. पी. सोनवणे, राहुल सोनवणे यांनी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथील ४० वर्षीय विवाहिता ह्या आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्याच भागातील राहणारा संशयित आरोपी अशपाक शहा माजिद शहा याने २० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता महिला घरात एकटी असताना तिचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी अशपाक शहा मजीद शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.
जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवरून दुचाकीने घरी जात असलेल्या तरुणाला दुसर्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनार्धन जमनादास आगे (वय-२९) रा. कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ हे गुरुवार २० जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीटी ७९९३) वरून शिरसोलीकडून जळगावकडे येत असताना समोरून येणारी दुचाकी (एमएच १९ बीएस ९१४०) याने जोरदार धडक दिली. या धडकेत जनार्दन आगे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान धडक देणारा दुचाकी चालक हा दुचाकी घेऊन पसार झाला…
जळगाव प्रतिनिधी | मराठा सेवा संघ महानगर सहकार्य अध्यक्षपदी सचिन अशोकराव पवार यांची निवड करण्यात आली आहे.मराठा सेवा संघाचे जळगाव महानगर सचिव चंद्रकांत उत्तमराव देसले व जळगाव महानगर अध्यक्ष इंजिनीयर हिरामण हरिभाऊ चव्हाण यांनी सचिन पवार यांची महानगर सहकार्य अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सचिन पवार यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
आकोला वृत्तसंस्था । शेगाव येथील सराफा व्यापाऱ्यावर अनैसर्गिक लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडीत सराफ व्यापऱ्याने पोलीसांत तक्रार देण्यात आली. अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी शेगावमधील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकला रात्री ३ वाजता शेगावातून अटक केले होते. यावेळी शेगावातून अकोल्यात आणताना सराफा व्यापाऱ्याला गाडीतच प्रचंड मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या दोन दिवसांत आरोपी सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि शिपाई कांबळे याने मारहाण केली. तसेच पोलीस कोठडीत आरोपीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. असा आरोप सराफ व्यापाऱ्याने केला आहे.…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, प्रमोद रवींद्र पाटील वय 32 रा. पाटील वाडा मराठी शाळेच्याजवळ खेडी बुद्रुक ता.जि. जळगाव हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. 18 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 20 जानेवारी रोजी सकाळी 6 दरम्यान त्यांनी त्यांच्या घरासमोर त्यांची (एमएच 19 एएल 1125) क्रमांकाची दुचाकी पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 12 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी प्रमोद पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांनी…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुना आसोदा रोड येथील श्रीराम कॉलनी येथे एकाचे 15 हजार रुपये किमतीची अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, प्रदुम्न निवृत्ती बोरसे (वय-२३) रा. जुना असोदा रोड, श्रीराम कॉलनी जळगाव हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. यांच्याकडे त्याची मालकीची (एमएच १९, बीडी ८१००) दुचाकी असून ते खाजगी नोकरीसाठी त्याचा वापर करतात. १७ जानेवारी रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची उघडकीला आले आहे. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता त्यांना दुचाकी कुठेही आढळून…

