Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पत्रकानुसार आज एकुण ४६९ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ७९ रूग्ण चांगले होवून घरी गेले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.जळगाव शहर-१२६, जळगाव ग्रामीण-२२, भुसावळ-११८, अमळनेर-३७, चोपडा-५५, पाचोरा-१३, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-६, एरंडोल-४०, जामनेर-८, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-३३, मुक्ताईनगर-४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४६९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४६ हजार २५४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८०६ रूग्ण बरे झाले आहे. आता २ हजार ८६८ बाधित रूग्ण उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा…

Read More

सांगली वृत्तसंस्था । राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर.आर.आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकरणात जोरदार एन्ट्री झाली आहे. विरोधकांना रोहित आर आर पाटील यांनी विरोधाकांना बाप दाखविला आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ येथील निवडणुकीच्या प्रचारात रोहित पाटील यांची तोफ धडाधडताना पहिल्यांदाच दिसली. रोहित पाटील यांनी आक्रमक भाषणं करून विरोधकांना नामोहरम केल्याचे दिसून आले. निवडणूक प्रचारातील त्यांची भाषणंही चांगलीच चर्चेचा विषय झाली. खासकरून त्यांनी विरोधकांना त्यांचा बाप दाखवण्याचे केलेले विधान तर अधिकच चर्चेत ठरले आहे. यावेळी अनेकांना आरआर आबा पाटील यांची छबीच रोहित यांच्यात दिसत होती. विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असा टोला लगावला होता. दरम्यान,…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । लपून छपून रात्री आंदोलन न करता मर्दाची औलाद असेल तर दिवस आंदोलन करून दाखवा असा सवाल शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला असून भ्याड आंदोलनाचा निषेध व्यक्त केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी कायदाव्यवस्थेचा भंग करीत मध्यरात्री भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकरीत एक प्रकारे आपला भ्याडपणा निदर्शनास आणला आहे. आंदोलन करा, पण निदान काही सामाजिक भान ठेवून करावे, पालकमंत्री कोरोना बाधित असतांना मध्यरात्री असे चोरासारखे येऊन आंदोलन करणे हे कितपत योग्य आहे. मर्दाची औलाद असता तर रात्री आंदोलन न करता दिवसा आंदोलन करून दाखवा असा सवाल करत अश्या भ्याड आंदोलनाचे धरणगाव शिवसेनातर्फे तीव्र…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मोहाडीरोडवर पोलीसांनी पकडलेले वाळूचे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा न करता चालक ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची घटना मंगळवारी १८ जानेवारी रोजी दुपारी घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मोहाडी रोडवर मंगळवारी १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसुल विभागाचे कर्मचारी विशाल नगराज सोनवणे यांनी पकडले. कागदपत्राची विचारणा केली असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवानगी नसल्याचे सांगितले. त्यानुसार ट्रॅक्टर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्याचे सांगितले. मात्र, ट्रॅक्टर चालक हा पोलीस ठाण्‍यात वाळू जमा न करता तेथून पसार झाला. अखेर याप्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शिरसोली येथील २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राजक्ता उर्फ कोमल अजय बारी (वय-२२) रा. शिरसोली प्र.न. ता.जि.जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता अजय बारी ह्या पती अजय अशोक बारी यांच्यासह वास्तव्याला आहे. अजय बारी हा खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करत असून आठवड्याचे तीन ते चार दिवस बाहेरगावी राहतात. विवाहितेच्या सोबत सासू, सासरे, जेठ व जेठाणी हे राहतात. प्राजक्ता या विवाहितेने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर मध्यरात्री साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघकीला आले. आत्महत्या करण्याचे…

Read More

बोदवड प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायतीच्या चार प्रभागातील जागांसाठी आज मतमोजणी करण्यात आली. आतापर्यंत १२ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले असून या निकालात शिवसेनेने ७ जागांवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. तर राष्ट्रवादीला ७ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना त्यांच्याच होमग्राऊंडला जोरदार धक्का बसला आहे. तर भाजपला ईश्वरचिठ्ठीने एक जागा मिळविली आहे. बोदवड नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यात आज निवडणूकीनंतर मतमोजणी करण्यात आली. बोदवड तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीपासून राष्ट्रवादीने आघाडी ठेवली होती. भाजपाला केवळ एक जागेवर समाधान मानले असून मुक्‍ताईनगर मतदार संघ असलेल्‍या आमदार चंद्रकांत पाटील यांच्‍या उमेदवारांनी नंतरच्‍या फेरींमध्‍ये बाजी पलवली. बोदवड…

Read More

बोदवड प्रतिनिधी । बोदवड नगरपंचायतीच्या आज मातमोजणीत पहिल्या जागांचे निकाल जाहीर झाले असून यात शिवसेनेला ६, राष्ट्रवादी काँगेसला ५ आणि भाजपाला १ जागा मिळाल्या आहे. प्रभाग क्र. १ – विजयी उमेदवार रेखा सोनू गायकवाड (४६६) मतांनी विजयी, राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) , भाजपच्या वैशाली योगेश कुलकर्णी ( ७३) मते आणि कॉंग्रेसचे कुसूम अशोक तायडे (२१ मते) मिळाली प्रभाग क्र. २- राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील (३३७) मते मिळवून विजयी, शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३), भाजपचे महेंद्र प्रभाकर पाटील यांना ७५ तर कॉंग्रेसचे अंकुश राजेंद्र अग्रवाल यांना ११ मते मिळून पराभूत झाले. प्रभाग क्र.३ – राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : आसोदा ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक ४ मध्ये एका जागेसाठी तिरंगी लढत झाली. आज मंगळवारी १८ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले असून ७० टक्के मतदान झाले. सविस्तर माहिती अशी की, जानेवारी २०२१ मध्ये आसोदा ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणूकी एक व्यक्ती दोन जागेवर निवडून आले होते. त्यामुळे पुन्हा एका जागेसाठी मंगळवार १८ जानेवारी रोजी वार्ड क्रमांक ४ साठी सर्वसाधारण स्त्री राखीव या मतदारसंघातून सार्वजनिक विद्यालयात मतदान घेण्यात आले. यात १ हजार ५५० मतदारांपैकी १ हजार ८८ जणांनी मतदान केले आहे. त्याप्रमाणे एकुण मतदार ७० टक्के मतदान झाले आहे. एका जागेसाठी ४ जणांनी उमेदवार रिंगणात उभे होते.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील चिंचपुरा येथे भरधाव रूग्णवाहिकेच्या धडकेत म्हैस जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यावेळी संतप्त झालेल्या काही नागरीकांनी रास्ता रोको केल्यामुळे रस्त्यावरीन दोन्ही बाजूने वाहतूकीचा खोळंबा झाला होतो. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा येथे भरधाव वेगाने जाणारी रूग्णवाहिकेने दोन म्हशींना जोरदार धडक दिली. या धडकेत एक म्हैस जागीच ठार झाली तर दुसरी जखमी झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरीकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको केलेा. त्यामुळे रस्त्यावरील दोन्ही  बाजूने वाहतूकीचा पुर्ण खोळंबा झाला होता. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पथकातील  सपोनि श्री. अहिरे आणि पोहेका…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील । तालुक्यातील पिंप्री खूर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात मंगळवारी धरणगाव तालुका आरोग्य विभागाच्यावतीने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय सोनवणे हे उपस्थित होते. त्यांनी कोरोना बाबत मार्गदर्शन करतांना सांगितले की, तुम्ही स्वतः चे आरोग्य जोपासा त्यातून आपोआपच इतरांचे आरोग्य जोपासले जाते असे सांगितले. या कार्यक्रमाला प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मयूर हिवरकर, आरोग्य सेविका आशा लोखंडे, पुष्पा पढयार, कविता चौधरी, आशा वर्कर, क्षयरोग पर्यवेक्षक नंदू चौधरी आदी सर्व उपस्थित होते . सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने अमूल्य वेळ दिल्याबद्दल पुष्प गुच्छ देत स्वागत करण्यात आले.…

Read More