Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पार्ट टाईम नोकरीच्या नादात तरूणाला दीड लाखात ऑनलाईन चुना
    क्राईम

    पार्ट टाईम नोकरीच्या नादात तरूणाला दीड लाखात ऑनलाईन चुना

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील निमखेडी परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणाला पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवत ऑनलाईन पध्दतीने १ लाख ४८ हजार ५७३ रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. . याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर माहिती अशी की, रोहन गजानन पाटील (वय-१९) रा. कल्याणी नगर, निमखेडी परिसर जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्याला एका अनोळखी मोबाईल नंबरच्या टेलीग्रॉम ॲपवर सुरेंद्र नावाच्या व्यक्तीने पार्ट टाईम नोकरी लावण्याचे सांगितले. त्यानुसार जॉबची ऑर्डस पास करून देतो असे सांगून ऑनलाईन पध्दतीने पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार रोहनने फोन-पे च्या माध्यमातून एकुण १ लाख ४८ हजार ५७३ रूपये ऑनलाईन पध्दतीने ट्रान्सफर केले. ७ डिसेंबरपर्यंत सुरूच होता. यात पार्ट टाईम नोकरी मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तरूणाने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.