लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मैत्रीत अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाला आईने मित्राच्या मदतीने मध्यप्रदेशातील जंगलात गळफास देवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आले आहे. या गुन्ह्यात आईसह सहकाऱ्याला बुधवारी २७ जानेवारी रोजी दुपारी जळगाव तालुका पोलीसांनी अटक केली असून पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुरूषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय-१४) रा. सावखेडा शिवार, जलाराम नगर जळगाव असे मयत मुलाचे नाव आहे. तर मंगलाबाई विलास पाटील (वय-३५) रा. जलाराम नगर आणि प्रमोद जयदेव शिंपी (वय-३८) रा. विखरण ता. एरंडोल असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. महिला ही मयत प्रशांतची आई आहे. याबाबत माहिती अशी की, विलास नामदेव पाटील हे चालक असून…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे घराचे खोदकाम करतांना पुरातन सोन्याचे व चांदीचे शिक्के व दागिने असा एकुण १९ लाख १७ हजार २८३ रूपये किंमतीचा मुद्देमाल सापडला आहे. हा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रहिवाशी ताराबाई गणपती समदानी यांच्या जुन्या व पडक्या घराचे खोदकाम करण्याचे काम गावातील जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव (वय-३२) , ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे (वय-५०), संजय उर्फ सतिष साहेबराव पाटील (वय-३५) सर्व रा. कासोदा ता.एरंडोल आणि राहूल राजू भिल (वय-२४) रा. बोरगाव ता. धरणगाव ह.मु. कासोदा यांना देण्यात आले होते. घराचे खोदकाम…
जामनेर प्रतिनिधी । याची युती त्याची युती, काहीही कारण सांगायची आणि आपली पुंगी वाजवायचे काम खडसे करत आहे. तुमच्या मनगटात जोर असेल तर निवडून दाखवा, असा समाचार माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी घेतला आहे. जामनेरात आज महावितरण विरोधात महामोर्चा काढण्यात आला त्यावेळ आ. महाजन बोलत होते. बोदवड येथील अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या, तर भाजपाला अवघी एक जागा मिळवता आली. ईश्वरचिठ्ठीने ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा…
धरणगाव प्रतिनिधी । येथील शिवसेना कार्यालयात २६ जानेवारीला ध्वजारोहण इंडियन नेव्हीमध्ये एसएसआर या पदी नुकतीच निवड झालेले नरेंद्र फुलपगार यांच्याहस्ते करण्यात आले. प्रथमच नऊ महिन्याचा ट्रेनिंग करून मी घरी परतलो आणि पहिला जीवना मधला ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे प्रती कृतज्ञता भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगरसेवक विनय भावे, भागवत चौधरी, प्रकाश पाटील, सुखदेव महाजन, भानुदास विसावे, नंदु पाटील, पदाधिकारी छोटू जाधव, प्रकाश जाधव, रवी जाधव, कमलेश बोरसे, सतीश बोरसे, हेमंत चौधरी, बाळू जाधव, रवी सोनार, भगवान माळी, गजानन माळी, दीपक महाले, गोपाल माळी, किरण अग्निहोत्री, प्रवीण निकम, विजय बडगुजर, सुरेश पारधी, किरण…
जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते उपचारासाठी होम क्वारंटाईन झाले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यांनी दिवसभर आराम केला. आज गुरूवारी २७ जानेवारी रोजी सकाळी कोरोना चाचणी केली. डॉ. पुढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ते पुढील काही दिवस होम क्वारंटाईन झाले आहे. त्यांच्या संपर्कातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत: काळजी घ्यावी व कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
जळगाव प्रतिनिधी । शहरातील ममुराबाद रोडवर एका तरूणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला आहे. सदरील तरूण उस्मानियॉ पार्क येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तालुकापोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) रा. उस्मानियॉ पार्क असे मयताचे नाव आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शेख गफ्फार हे बांधकामाचे सेंटींग काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आईवडील, पत्नी, भाऊ व दोन मुलांसह शहरातील उस्मानिया पार्क येथे वास्तव्याला आहे. बुधवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी काम आटोपून घरी निघाले होते. परंतू ते रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता कोठेही आढळून आले नाही. गुरूवारी २७ जानेवारी रोजी…
यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलीवर दोन जणांनी शेतात बळजबरी अत्याचार केल्याची खळबळजनक घटनासमोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील संशयित आरोपी प्रदीप चंद्रकांत धनगर आणि मयुर अनिल धनगर यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले. त्याठिकाणी दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. कुणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलगीने घरी गेल्यावर हा…
जामनेर प्रतिनिधी । शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गॅस कटरने कापून सुमारे १२ लाख ७८ हजारांची रोकड लांबविली आहे.चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पाचोरा रोडवर असलेल्या आयडीबीआय बँक एटीएम रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडले. बुधवार २६ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडले आहे. अवघ्या १५ मिनीटात एटीएम मधील पैसे चोरून नेले. ही माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. सदर घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सदर या बँकेच्या एटीएम…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील । शहरातील ज्योती देवी अन्नपुर्ण भंडार या सेवाभावी योजनेतून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ता भुकेल्यांसाठी खिचडीचे वाटप करण्यात आले. यासाठी बयस परिवाराने पुढाकार घेतला आहे. अधिक माहिती अशी की, धरणगाव येथे मुन्नादेवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाऊंडेशन संचलित ज्योती देवी अन्नपूर्ण भंडारच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सेवाशुल्क रुपये ५ मध्ये एक खिचडीची डिश मिळेल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धरणगावचे सुपुत्र आयकर आयुक्त विशाल मकवाने हे होते. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डी.आर. पाटील, काँग्रेसचे सचिव डी.जी. पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे, पोलीस निरीक्षक शेळके, जी जीनींगचे…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्याहस्ते सकाळी करण्यात आले. सविस्तर माहिती अशी की, देशात ७३ व्या भारतीय प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम साजरी करण्याचे आवाहन जिल्हाप्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्याहस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धनराज वणखडे, सुनिल पाटील, प्रभारी ग्रामसेवक जयश्री पाटील अंगणवाडी सेविका, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ…

