लाकूड कोळसा वाहतूकीची परवानगी नाहीच – वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुक्यातील सोनवद आणि नांदेड शिवारात लाकडांपासून कोळसा पाडण्याचा गोरखधंदा मोठ्याप्रमाणावर सुरू आहे. कोळसा तयार करून वाहतूक करण्याची कोणतीही परवानगी दिलेली नसतांना हा प्रकार खुलेआम सुरू आहे. यासाठी वनविभाग प्रशासनाला माहिती असतांना कोणतीही कारवाई केली जात नाही. धरणगाव तालुक्यातील सोनवद आणि नांदेड शिवारात मोठ्याप्रमाणावर झाडे आहेत. शेतशिवारातील शेतकरी हे व्यापाऱ्यांना हाताशी घेवून १० ते २० वर्षांपासूनचे असलेले मोठे झाडे तोडण्यात येत आहे. यात सुळबाभूळ, निंब आणि कोटेरी बाभुळ या झाडांचा समावेश आहे. मोठी झाडे अवघ्या काही मिनीटात मशिनीच्या सहाय्याने कापून त्यांना जागेवरच जाळून त्याचा कोळसा तयार…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील किनगाव-ईचखेडा रस्त्यावरून विनापरवाना ट्रॅक्टरने वाळूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर यावल पोलीसांनी कारवाई केली. यावल पोलीसात ट्रक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “यावल तालुक्यातील किनगाव ते ईचखेडा रस्त्यावर यावल पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना मंगळवारी, १८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ट्रक्टर (एमएच १० सीवाय ४१६१) व विना नंबरची ट्रॉली यात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करतांना आढळून आले. वाळू वाहतूकीचा परवाना मागितले असता ट्रक्टर चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी सुशिल घुगे यांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर यावल पोलीसात जमा करण्यात आले. पोहेकॉ सुशिल घुगे यांच्या फिर्यादीवरून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुक्यात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत असतांना पोलीसांनी दोन संशयित आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी खाक्या दाखवताच चोरीच्या चार दुचाकी काढून दिल्या आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, धरणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरी प्रमाण वाढले आहे. गेल्या आठ दिवसात धरणगाव पोलीसा दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले आहे. मंगळवारी १८ जानेवारी रोजी रात्री धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना संशयित आरोपी निरंजन पाटील (रा.शेवगाव) आणि सागर वालदे (रा.मालपुर ता. पारोळा) अशा दोघांना नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून पकडले होते. त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे सांगितले. त्यांना पोलसांनी खाक्या दाखवता…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला बहुमत मिळाल्याने यावल येथे तालुका शिवसेनेच्या वतीने बुधवारी १९ जानेवारी रोजी पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.बोदवडच्या नगरपंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षीक निवडणुकीला सर्वच राजकीय पक्षासाठी अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बहुमताने विजय मिळवला असुन या निवडणुकीचा यावल तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने पेढे वाटुन आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा…
प्रतिनिधी प्रविण पाटील। तालुक्यातील वसंतवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे कोवीड लसीकरण शिबीराचे आयोजन गुरूवारी २० जानेवारी रोजी सकाळी घेण्यात येणार आहे. याप्रसंगी जळगाव तालुका वैद्यकीय अधिकारी आणि म्हसावद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्गदर्शनाखाली जळके आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी हे लसीकरण केंद्रावर उपस्थित राहणार आहे. यावेळी लसीकरण केंद्रावर १८ वर्षावरील सर्व तसेच प्रथम डोस घेऊन ८४ दिवस पुर्ण झालेले तसेच दुसरा डोस घेऊन ९ महीने पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांना बुस्टर डोस व १५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी येथे लसीचे डोस उपलब्ध राहणार आहे. अशी माहिती जळके आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक सलीम पिंजारी यांनी दिली आहे. वसंतवाडी गावातील नागरीकांनी कोवीड लसीकरण शिबीराचा लाभ घ्यावा…
प्रतिनिधी प्रविण पाटील। माजी पालकमंत्री तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील वावडदा येथे गुरूवार २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता रूग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी युवा नेते विशाल देवकर, मजदुर फेडरेशनचे सभापती लिलाधर तायडे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील व अजय सोनवणे यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांचे कार्यकर्ते यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब परदेशी यांनी केले आहे. या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन वावडदा सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेश वाडेकर यांनी केले आहे. सर्व…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पत्रकानुसार आज एकुण ४६९ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ७९ रूग्ण चांगले होवून घरी गेले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.जळगाव शहर-१२६, जळगाव ग्रामीण-२२, भुसावळ-११८, अमळनेर-३७, चोपडा-५५, पाचोरा-१३, भडगाव-०, धरणगाव-५, यावल-६, एरंडोल-४०, जामनेर-८, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-३३, मुक्ताईनगर-४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ४६९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४६ हजार २५४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार ८०६ रूग्ण बरे झाले आहे. आता २ हजार ८६८ बाधित रूग्ण उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा…
सांगली वृत्तसंस्था । राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर.आर.आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकरणात जोरदार एन्ट्री झाली आहे. विरोधकांना रोहित आर आर पाटील यांनी विरोधाकांना बाप दाखविला आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ येथील निवडणुकीच्या प्रचारात रोहित पाटील यांची तोफ धडाधडताना पहिल्यांदाच दिसली. रोहित पाटील यांनी आक्रमक भाषणं करून विरोधकांना नामोहरम केल्याचे दिसून आले. निवडणूक प्रचारातील त्यांची भाषणंही चांगलीच चर्चेचा विषय झाली. खासकरून त्यांनी विरोधकांना त्यांचा बाप दाखवण्याचे केलेले विधान तर अधिकच चर्चेत ठरले आहे. यावेळी अनेकांना आरआर आबा पाटील यांची छबीच रोहित यांच्यात दिसत होती. विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असा टोला लगावला होता. दरम्यान,…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । लपून छपून रात्री आंदोलन न करता मर्दाची औलाद असेल तर दिवस आंदोलन करून दाखवा असा सवाल शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला असून भ्याड आंदोलनाचा निषेध व्यक्त केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी कायदाव्यवस्थेचा भंग करीत मध्यरात्री भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकरीत एक प्रकारे आपला भ्याडपणा निदर्शनास आणला आहे. आंदोलन करा, पण निदान काही सामाजिक भान ठेवून करावे, पालकमंत्री कोरोना बाधित असतांना मध्यरात्री असे चोरासारखे येऊन आंदोलन करणे हे कितपत योग्य आहे. मर्दाची औलाद असता तर रात्री आंदोलन न करता दिवसा आंदोलन करून दाखवा असा सवाल करत अश्या भ्याड आंदोलनाचे धरणगाव शिवसेनातर्फे तीव्र…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मोहाडीरोडवर पोलीसांनी पकडलेले वाळूचे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा न करता चालक ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची घटना मंगळवारी १८ जानेवारी रोजी दुपारी घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मोहाडी रोडवर मंगळवारी १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसुल विभागाचे कर्मचारी विशाल नगराज सोनवणे यांनी पकडले. कागदपत्राची विचारणा केली असता वाळू वाहतूकीचा कोणताही परवानगी नसल्याचे सांगितले. त्यानुसार ट्रॅक्टर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्याचे सांगितले. मात्र, ट्रॅक्टर चालक हा पोलीस ठाण्यात वाळू जमा न करता तेथून पसार झाला. अखेर याप्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस…

