Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव येथील ४० वर्षीय विवाहिता ह्या आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्याच भागातील राहणारा संशयित आरोपी अशपाक शहा माजिद शहा याने २० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता महिला घरात एकटी असताना तिचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी अशपाक शहा मजीद शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.

Read More

जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवरून दुचाकीने घरी जात असलेल्या तरुणाला दुसर्‍या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनार्धन जमनादास आगे (वय-२९) रा. कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ हे गुरुवार २० जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीटी ७९९३) वरून शिरसोलीकडून जळगावकडे येत असताना समोरून येणारी दुचाकी (एमएच १९ बीएस ९१४०) याने जोरदार धडक दिली. या धडकेत जनार्दन आगे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान धडक देणारा दुचाकी चालक हा दुचाकी घेऊन पसार झाला…

Read More

जळगाव प्रतिनिधी | मराठा सेवा संघ महानगर सहकार्य अध्यक्षपदी सचिन अशोकराव पवार यांची निवड करण्यात आली आहे.मराठा सेवा संघाचे जळगाव महानगर सचिव चंद्रकांत उत्तमराव देसले व जळगाव महानगर अध्यक्ष इंजिनीयर हिरामण हरिभाऊ चव्हाण यांनी सचिन पवार यांची महानगर सहकार्य अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सचिन पवार यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

Read More

आकोला वृत्तसंस्था । शेगाव येथील सराफा व्यापाऱ्यावर अनैसर्गिक लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडीत सराफ व्यापऱ्याने पोलीसांत तक्रार देण्यात आली. अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी शेगावमधील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकला रात्री ३ वाजता शेगावातून अटक केले होते. यावेळी शेगावातून अकोल्यात आणताना सराफा व्यापाऱ्याला गाडीतच प्रचंड मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या दोन दिवसांत आरोपी सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि शिपाई कांबळे याने मारहाण केली. तसेच पोलीस कोठडीत आरोपीवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. असा आरोप सराफ व्यापाऱ्याने केला आहे.…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, प्रमोद रवींद्र पाटील वय 32 रा. पाटील वाडा मराठी शाळेच्याजवळ खेडी बुद्रुक ता.जि. जळगाव हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. 18 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 20 जानेवारी रोजी सकाळी 6 दरम्यान त्यांनी त्यांच्या घरासमोर त्यांची (एमएच 19 एएल 1125) क्रमांकाची दुचाकी पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 12 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी प्रमोद पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुना आसोदा रोड येथील श्रीराम कॉलनी येथे एकाचे 15 हजार रुपये किमतीची अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, प्रदुम्न निवृत्ती बोरसे (वय-२३) रा. जुना असोदा रोड, श्रीराम कॉलनी जळगाव हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. यांच्याकडे त्याची मालकीची (एमएच १९, बीडी ८१००) दुचाकी असून ते खाजगी नोकरीसाठी त्याचा वापर करतात. १७ जानेवारी रोजी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची उघडकीला आले आहे. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता त्यांना दुचाकी कुठेही आढळून…

Read More

बंगळूर वृत्तसंस्था । भाडेकरू असलेल्या महिला शिक्षकेला घरमालकाकडून शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकी देत तिला अंतर्वस्त्रे भेट दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. यात पीडीत शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीत ती राहत असलेल्या घरमालकाने शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकी दिल्याचे नमूद केले आहे. घरमालकासोबत शरीरसंबंध नाही ठेवले तर घर खाली करण्याची धमकी दिल्याचेही त्या महिलेने म्हटले आहे. परंतू आरोप घरमालकाने फेटाळून लावले आहेत. आरोप निराधार असून महिला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. पीडित महिला शिक्षिकेनं घरमालकाने वाढदिनी भेट म्हणून अंतर्वस्त्र दिल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही, तर ती भेट दिलेली अंतर्वस्त्र घालून दाखवावी अशी मागणी केल्याचेही…

Read More

पाणीपट्टीच्या मुळ मुद्दलावरील विलंब शुल्क माफ होणार – गुलाबराव पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता पाणीपट्टीच्या मुळ मुद्दलावरील विलंब आकार/शुल्क माफीच्या सवलतीची अभय योजना जाहीर झाली असून ही योजना आजपासून राज्यात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. याबाबतचे शासन परिपत्रकही पाणी पुरवठा विभागाकडून निर्गमित करण्यात आले आहे. पाणी पुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात आजपासून अभय योजनेला सुरुवात होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता पाणीपट्टीच्या मुळ मुद्दलावरील विलंबाचा आकार, दंड, व्याज यात पाणीपुरवठा विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सूट देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल ४१४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातून आज २२१ कोरोना रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. आलेल्या अहवालानुसार जळगाव शहर-११६, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ-७९, अमळनेर-२०, चोपडा-७८, पाचोरा-१७, भडगाव-५, धरणगाव-४, यावल-१, एरंडोल-४, जामनेर-३२, रावेर-०, पारोळा-१६, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४१४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हार ११९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ३१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २२६ रूग्ण कोवीड रूग्णालयात उपचार…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर हुडको परिसरात तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, समीर रामदास बांदल (वय-३२) रा. शिवाजीनगर हुडको हा तरूण वडील, पत्नी, भाऊ व दोन मुलींसह वास्तव्याला आहे. गेल्या दीड महिन्यांपुर्वीच समीर हा पुण्याला नोकरी लागली होती. मंगळवारी १८ जानेवारी रोजी समीरच्या चुलत भावाच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम असल्याने तो जळगावात घरी आला होता. दरम्यान २० जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास समीर घरी एकटा असतांना त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. समीरचे वडील रामदास बांदल हे कामावरून घरी…

Read More