Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ३३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २२१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. जळगाव शहर-११९, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ-८७, अमळनेर-२०, चोपडा-२६, पाचोरा-२, भडगाव -५, धरणगाव-१३, यावल-६, एरंडोल-०, जामनेर-८, रावेर-३, पारोळा-०, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-५, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ३३८ रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४७ हजार ८८५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४२ हजार ५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजवर एकुण २ हजार ५८२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यातून २२१ बाधित…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातून वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक आशिर्वाद व शुभेच्छा देण्यात येत आहे. पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील यांच्या वाढदिवस अतिशय साध्यापध्दतीने साजरा करण्यात आला. शिवसेने जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वत: भेट घेत अनिल पाटील यांना पुष्पगुच्छ देवून वाढदिवाच्या शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी उपसभापती प्रेमराज पाटील, किशोर पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील। धरणगाव तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय मतदार दिनी त्यांचा मान्यवरांच्याहस्ते करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, धरणगाव येथील कर्तव्यदक्ष अधिकारी व एक संवेदनशील व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख आहे, असे तहसिलदार नितीनकुमार देवरे यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार धरणगाव जि. जळगाव यांनी आगामी जि.प. आणि न.पा. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुणीही मतदार वंचित राहू नये यासाठी विविध उपक्रम तालुक्यात राबवले. यामध्ये नवमतदार जे १८ वर्ष पूर्ण केले आहेत अशा विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी केली.…

Read More

एरंडोल प्रतिनिधी । महिलेचा अशिक्षितपणाचा फायदा घेत दोन जणांनी शेतावरील हक्कसोड लेखी दस्त नोंदणी केल्याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, कमलबाई आनंदा महाजन (वय-६५) रा. महादेव चौक, पातोंडा ता. अमळनेर या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. त्याच्या नावे पातोंडा शिवारातील शेत गट नं. ६२६/२ आणि ५५६/१ मधील असे दोन शेत आहे. सदरील शेत प्रल्हाद शामराव चौधरी रा. गणपती बाप्पा नगर धरणगाव आणि रमाबाई मधुकर चौधरी रा. रिंगणगाव ता. एरंडोल यांनी कमलबाई महाजन यांचा अशिक्षीतपणाचा फायदा घेत दोघांनी दोन्ही शेतावरील हक्क सोड दस्त नोंदणी केल्याचे उघडकीला आले आहे. दरम्यान, कमलबाई महाजन यांनी एरंडोल पोलीस…

Read More

लातूर वृत्तसंस्था । शहरातील विशाल नगरमध्ये साई मंदिराच्या समोर भरदिवसा कोयत्याने वार करून विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. लातुरच्या दयानंद महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा विद्यार्थी असलेला राहुल सुरेश उजळंबे आणि काही मुलांमध्ये विशाल नगर मधील साई मंदिरासमोर रविवारी साडेबाराच्या सुमारास वाद झाला आणि या मुलांनी राहुलवर कोयत्याने वार करत घटनास्थळावरुन पसार झाले. पोलिसांना माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. राहुलला शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. घटनास्थळी एक हत्यार सापडले असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस फरार मुलांच्या शोधात आहेत.

Read More

नाशिक वृत्तसंस्था । नाशिक जिल्ह्यातील एका महिला तलाठीला शरीर सुखाची मागणी करण्‍याचा संतापजनक प्रकार प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात प्रांताधिकाऱ्याविरोधात तक्रार देवून त्याची बदली करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील वर्ग एक पदावर प्रांतअधिकारी म्हणून सोपान कासार यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कासार याने गेल्या वर्षी काही कामानिमित्त एका महिला तलाठ्याला घरी बोलावले. त्यानंतर त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या तलाठ्याने या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याप्रकरणाची प्रकरण चौकशीसाठी विशाखा समितीकडे सोपवण्यात आले आहे. विशाखा समितीने तक्रारदार महिला तलाठी आणि प्रांतअधिकारी कासार या दोघांचेही जबाब नोंदवले. इतर साक्षीदारांचे जबाब घेतले. शिवाय दोघांना समोरासमोर बसवून उलट तपासणीही केली. त्यानंतर…

Read More

जळगाव ( प्रतिनिधी) – खोटे नगर परिसरातून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बंद घरातून अज्ञात चोरटयांनी ३६ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमंग सिमंग भगवानसिंग पाटील (वय ६१) हे पत्नी , मुलगा व सुन या परिवारासह वास्तव्यास आहेत. १५ जानेवारी रोजी कुटुंबासह उमंग पाटील हे खाजगी कामानिमित्ताने पुण्याला गेले होते. २० जानेवारी रोजी ते पुण्यावरुन घरी परतले. याप्रसंगी चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला . चोरट्यांनी उमंग पाटील यांच्या घरातून १० हजारांचा एलईडी टीव्ही, २० हजार रुपये रोख, फोन, ब्लुटूथ स्पीकर, ट्रॅव्हलिंग बॅग असे ६ हजारांचे साहित्य असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज…

Read More

चोपडा (प्रतिनिधी ) – उत्तर प्रदेशमधील तिघांनी एकाची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने ४३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील रत्नदिप नगर येथील रहिवासी फिर्यादी अनिल संतोष पाटील यांच्या नातेवाईकांना आरोपी रुद्रप्रताप विजयसिंग, दिनेश रामेश्वरसिंह व मोना दिनेशसिंह यांनी भारतीय खाद्य निगमात आपली मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी आहे. त्यामुळे आम्ही कुणालाही नोकरीला लावून देवू शकतो अशी बतावणी करुन तब्बल ४३ लाख रुपयांची मागणी केली व सदर रक्कम वेगवेगळ्या क्रमांकांच्या बँक खात्यावर जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी व साक्षीदार यांनी सदर रक्कम रु. ४३ लाख जमा केली. संपूर्ण रक्कम दिल्यानंतर सुद्धा भारतीय खाद्य निगममध्ये…

Read More

जळगाव ( प्रतिनिधी ) – पॆसे आणि घर खाली करून देण्याच्या नावाखाली खंडेराव नगर येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पहिल्या गटातील रविंद्र हरी मोरे (वय 32) रा. शिरसोली ता. जळगाव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खंडेराव नगरातील नसरीन खान आणि अज्जू खान यांनी पैसे देण्यावरून आणि घर खाली करण्याच्या कारणावरून रवींद्र मोरे यांना शिवीगाळ करून त्यांनी मारहाण केली. तर ज्यांना घर विकले आहे. लाला नागो कुंभार आणि रूपा नागो कुंभार यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात नसरीन…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील गजानन पार्क येथे बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुक्ल विभागाने धडक कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ११ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसाार, धरणगाव शहरातील गजानन पार्क परिसरात बनावट दारू तयार करून विक्री होत असल्याची गोपनिय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला शनिवारी २२ जानेवारी रोजी दुपारी मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादक शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक सीमा झावरे यांच्यासह निरीक्षक सी. एच. पाटील, दुय्यम निरीक्षक ए. एस. पाटील, एस. एफ. ठेंगडे, जवान एन. व्हि. पाटील, ए. व्ही. गावंडे, एम. डी. पाटील, के. पी. सोनवणे, राहुल सोनवणे यांनी…

Read More