जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील एका कंपनीतून मशिनरीच्या वस्तू चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर महिती अशी की, किशोर रमेश कटारिया (वय-३८) रा. गणपती नगर जळगाव यांचे एमआयडीसीतील सेक्टर एच-२२ मध्ये एस.एस.डी. फुडस नावाची दाल कंपनी आहे. १ जानेवारी रात्री ८ वाजता ते २ जानेवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या कंपनीच्या आवारात असलेल्या लोखंडी मशीनरी यात मोटार, पुल्ली, लोखंडी स्टॅण्ड आणि मशिनची वायर असा एकुण ४१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय-२२) रा. मच्छी मार्केट सुप्रिम कॉलनी याने चोरून नेल्याचे उघडकीला आहे. या संदर्भात किशोर…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । वीज बिल भरण्याच्या नावाखाली भुसावळ येथील डॉक्टर दाम्पत्याला इलेक्ट्रीक ऑफीसर असल्याची बतावणी करून बँक खात्यातून परस्पर ३ लाख ९९ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हे भुसावळ शहरातील एका मल्टिस्पेशातील हॉस्पीटलचे डॉक्टर आहे. २३ आणि २४ जानेवारी रोजी त्यांच्या त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज आला. त्यात ईलेक्ट्रिसीटी ऑफीसर रोहित असे नाव सांगून वीज बिल भरण्यासाठी त्यांना एक लिंक पाठविली. लिंक ओपन करून डॉक्टरांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी यांच्या बँकेची सर्व माहिती दिली. समोरील रोहित नावाच्या व्यक्तीने दोघांच्या खात्यातून सुमारे ३ लाख…
चोपडा प्रतिनिधी । मेहुण्यासह इतर तिन जणांनी अत्याचार करून गर्भवती केलेल्या ३७ वर्षीय अपंग महिलेने आत्महत्या केल्या धक्कादायक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीला आली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय महिला आपल्या भावासह वास्तव्याला आहे. महिला ही अपंग असल्याने ही भावाकडे राहते. दरम्यान तिचे मेहुण्यासह इतरांनी अपंगपणाचा फायदा घेत पीडीत महिलेवर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून महिला ६ महिन्याची गर्भवती राहिली. हा त्रास सहन न झाल्याने पीडीत महिलेने २४ जानेवारी रोजी सकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात…
मुंबई वृत्तसंस्था । ‘आय लव्ह यू पप्पा त्याला सोडू नका’ असे सुसाईड नोटमध्ये लिहून २१ वर्षीय तरूणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेला असलेल्या रामवाडी भागात उघडकीला आला आहे. मृत्यूआधी तिनं लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे अनेकांना धक्का दिला आहे. नाव जान्हवी विजय चव्हाण असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापुर्वी तरूणीने आपला मोबाईलचा पासवर्ड तिनं सुसाईड नोटमध्ये सांगितला असून तिच्या आत्महत्येची नोट वाचून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ‘पप्पा यात सर्व पुरावे आहेत, त्याला सोडू नका’ असं जान्हवीने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. सोबत तिनं आपल्या मोबाईलचा पासवर्ड दिली आहे. दरम्यान, या घटनेनं जोगेश्वरीतील रामवाडी परिसर हादरुन गेला…
धरणगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने उभ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील रोटवद येथे घडली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील गावाजवळ रस्त्या बंद पडलेल्या ट्रक्टरला भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार मानसिंग देवसिंग पाटील हा दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी घडली. अपघात होताच काही तरूणांनी धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दुचाकीस्वाराला आणण्यात आले होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
यावल प्रतिनिधी । तालुक्यातील न्हावी शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने ४६ हजार रूपये किंमतीचे ठिंबक नळ्या मध्यरात्री चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, मनोज अनिल बोरेले (वय-४१) रा. लक्कडपेठ फैजपूर ता. यावल यांचे फैजपूर शिवारात शेत गट नंबर २५२ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतात त्यांनी ठिंबक बसविलेल्या आहे. २२ जानेवारी रोजी सायंकाळी शेतातील कामे आटोपून ते घरी गेले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील ४६ हजार रूपये किंमतीच्या ठिंबकच्या नळ्या चोरून नेल्या. हा प्रकार रविवारी २३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. मनोज बोरोले यांनी सायंकाळी ७…
जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयात कामानिमीत्त आलेल्या तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीतील फातेमानगरात वास्तव्यास असलेल्या मुश्ताक मुक्तार पटेल (वय-२७) हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हा तरुण २० जानेवारी रेाजी रात्री ८ वाजता कामानिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुचाकीने आले होते. दुचाकी (एमएच.१९सीजी.९६२२) मुख्य प्रवेशद्वारा जवळ उभी केली हेाती. काम अटोपुन परत जाण्यासाठी बाहेर रात्री १० वाजता बाहेर आले व दुचाकीजवळ आले. त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध करुनही वाहन सापडली नाही. मुश्ताक पटेल यांनी जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । अनुदान मंजूर करण्यासाठी २ हजार रूपयांची लाच मागणाऱ्या गटशिक्षणाधिकारी यांच्यासह एकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांच्या मालकीची पाळधी खुर्द येथे शाळा आहे. आरटीईच्या माध्यमातून विद्यार्थ्यामागे ८ हजार रूपये असे एकुण १७ विद्यार्थ्यांप्रमाणे एकुण १ लाख ३६ हजार रूपयांची अनुदानाची रक्कम मंजूर होण्यासाठी अनुकुल अहवाला सादर करण्यासाठी २ हजार रूपयांची मागणी गटशिक्षणाधिकारी अशोक दामू बिऱ्हाडे रा. राधाकृष्ण नगर, पिंपळे रोड अमळनेर आणि विभगातील कर्मचारी तुळशीराम भगवान सैंदाणे रा. रा.बोरोले नगर, पंडीत कॉलनी, चोपडा. ता.चोपडा, जि.जळगाव यांनी ३० डिसेंबर रोजी २ हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून सोमवारी २४ जानेवारी रोजी गटशिक्षणाधिकारी यांच्या सांगण्यावरून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शहरातील गोलाणी मार्केटमधील एका व्यापाऱ्याला रास्त भावात माल देण्याचे आमीष दाखवत १ लाख ६० हजार ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकॉलनी येथील रहिवासी सचिन रंगनाथ देशपांडे (वय-४३) यांचे गोलाणी व्यापारी संकुलात व्यवसाय आहे. सचिन देशपांडे यांना भोपाळ येथील व्हेरटेक्स होम केअर इंडस्ट्रीजच्या अभिलाश शर्मा या मालकाने स्वस्त दरात माल पुरवण्याचे आमीष दाखवुन देशपांडे यांना १ लाख ६० हजार रुपये ऑनलाईन खात्यात वर्ग करण्याचे सांगीतले. १२ मार्च २०२१ ते २४ मे २०२१ दरम्यान पैसे वर्ग करुनही माल दिला नाही. याबाबत देशपांडे…
एरंडोल तालुक्यातील धारागीर येथून बनावट दारू साठा जप्त धरणगाव प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुक्ल विभागाने धरणगाव शहरात बनावट दारू तयार करणाऱ्याला अटक केली होती. या प्रकरणात पथकाने तालुक्यातील पाळधी येथून अजून एकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान एरंडोल तालुक्यातील धारागीर येथे टाकलेल्या छाप्यात दीड लाखाचा बनावट दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. सचिन पाटील रा. पाळधी ता. धरणगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शनिवारी २१ जानेवारी रोजी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने धरणगाव शहरात छापा टाकून बनावट दारू निर्मिती कारखाना उध्वस्त केला होता. या कारवाईत संशयित आरोपी भूपेंद्र पाटील याला अटक केली…

