जळगाव प्रतिनिधी । उस्मानियॉ पार्क येथील तरूणाचा ममुराबाद रोडवर गळा आवळून खून करण्यात आला होता. हा खून अनैतिक संबंधातून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. शेख शाबीर शेख सूपडू (वय-३३) आणि शेख फारूख उर्फ छोटू शेख शौकत (वय-२१) दोन्ही रा. श्रीरामपेठ जामनेर ,जळगाव असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, ममुराबाद रोडवर उस्मानियॉ पार्क येथील रहिवाशी शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याचे गुरूवारी खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी जमली होती. मयत शेख गफ्फार याचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा आरोप…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
नवी दिल्ली वृत्तसंस्था : कस्तुरबा नगरातील महिलेवर सामुहिक बलात्कार करून तिची रस्त्यावर धिंड काढण्यात आली होती. ज्यावेळी महिलेवर बलात्कार केला जात होता त्यावेळी इतर अनेक महिला गंमत पाहत होत्या असा धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यातील एकुण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या १५ महिलांची ओळख पटली आहे. पीडित महिलेचे समूपदेशन केले जात आहे. दिल्लीमधील महिलेची धिंड काढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात २७ जानेवारी रोजी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोर येताच संताप व्यक्त केला गेला. दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी पीडित महिलेची भेट घेतली आहे. त्यानंतर “महिलेचे तिच्या घरातून अपहरण करण्यात आले. दारू तसेच…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील गंगापूरी येथे जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, जि.प. सदस्य चौधरी, पं.स. सभापती प्रेमराज पाटील यांच्याहस्ते 5 लाख दलित वस्ती काँक्रेटिकरण, 3 लाख दलित वस्ती निधी पेव्हर ब्लॉक, 3 लाख पेव्हर ब्लॉक, मुतारी व गटार ढापे 3 लाख कामांचे भूमिपूजन पार पडले. पाणीपुरवठा व स्वछतामंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी गंगापुरीमध्ये विकासाची गंगा अवतरली आहे. असे प्रतिपादन जिप सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. याप्रसंगी सरपंच महेश पाटील, उपसरपंच एस पि पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ पाटील, निंबा पाटील, शाखाप्रमुख जिभाऊ पाटील, दीपक…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील तरूणाने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीला आले आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरीष प्रकाश पाटील (वय-३३) रा. शिरसोली ता.जि.जळगाव हा तरूण आई वडील, पत्नी आणि भाऊ यांच्यासह शिरसोली येथे वास्तव्याला आहे. गेल्या १३ वर्षांपासून ते बांभोरी येथील जैन कंपनीत कामाला आहे. गुरूवारी २७ जानेवारी रोजी रात्री त्याने कुटुंबियासह जेवण करून झोपले. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना मागच्या खोलीत गिरीष पाटील याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची पत्नी रेणूका ह्या शुक्रवारी २८ जानेवारी रोजी सकाळी ५.३०…
पुणे वृत्तसंस्था । शिक्षकांसाठी टीईटी परिक्षेत मोठा घोटाळा समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यात तब्बल तब्बल ७८०० परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केल्या धक्कादायक माहिती पुणे सायबर पोलीसांनी समोर आणली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांकडून याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे. या तपासातून 7 हजार 800 जणांना पैसे देऊन पात्र केले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी मोठा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांच्या तपासातून आणखी मोठे आकडे समोर येण्याचीही दाट शक्यता आहे. पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार झाल्याप्रकरमी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते. मात्र सायबर पोलिसांतून अनेकांना कोरोनाची लागण…
जळगाव प्रतिनिधी । घर बांधण्यासाठी माहेरुन २ लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कांचन नगरातील दिलीप किरणा येथील माहेरवाशीन योगिता अजिंक्य बोर्हाडे (वय-२१) यांचा पुणे जिल्ह्यातील आडेफाटा येथील अजिंक्य बजरंग बोर्हाडे यांच्याशी २५ जानेवारी २०१९ रोजी रितीरिवाजानुसार विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींकडून योगिता हिला घर बांधण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावे यासाठी त्रास देत त्या विवाहितेला शिविगाळ करीत मारहाण केली जात होती. तसेच पैसे आणले नाही म्हणून त्या विवाहितेला उपाशी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मैत्रीत अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाला आईने मित्राच्या मदतीने मध्यप्रदेशातील जंगलात गळफास देवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आले आहे. या गुन्ह्यात आईसह सहकाऱ्याला बुधवारी २७ जानेवारी रोजी दुपारी जळगाव तालुका पोलीसांनी अटक केली असून पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुरूषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय-१४) रा. सावखेडा शिवार, जलाराम नगर जळगाव असे मयत मुलाचे नाव आहे. तर मंगलाबाई विलास पाटील (वय-३५) रा. जलाराम नगर आणि प्रमोद जयदेव शिंपी (वय-३८) रा. विखरण ता. एरंडोल असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. महिला ही मयत प्रशांतची आई आहे. याबाबत माहिती अशी की, विलास नामदेव पाटील हे चालक असून…
जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे घराचे खोदकाम करतांना पुरातन सोन्याचे व चांदीचे शिक्के व दागिने असा एकुण १९ लाख १७ हजार २८३ रूपये किंमतीचा मुद्देमाल सापडला आहे. हा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रहिवाशी ताराबाई गणपती समदानी यांच्या जुन्या व पडक्या घराचे खोदकाम करण्याचे काम गावातील जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव (वय-३२) , ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे (वय-५०), संजय उर्फ सतिष साहेबराव पाटील (वय-३५) सर्व रा. कासोदा ता.एरंडोल आणि राहूल राजू भिल (वय-२४) रा. बोरगाव ता. धरणगाव ह.मु. कासोदा यांना देण्यात आले होते. घराचे खोदकाम…
जामनेर प्रतिनिधी । याची युती त्याची युती, काहीही कारण सांगायची आणि आपली पुंगी वाजवायचे काम खडसे करत आहे. तुमच्या मनगटात जोर असेल तर निवडून दाखवा, असा समाचार माजी मंत्री आमदार गिरीष महाजन यांनी घेतला आहे. जामनेरात आज महावितरण विरोधात महामोर्चा काढण्यात आला त्यावेळ आ. महाजन बोलत होते. बोदवड येथील अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या, तर भाजपाला अवघी एक जागा मिळवता आली. ईश्वरचिठ्ठीने ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा…
धरणगाव प्रतिनिधी । येथील शिवसेना कार्यालयात २६ जानेवारीला ध्वजारोहण इंडियन नेव्हीमध्ये एसएसआर या पदी नुकतीच निवड झालेले नरेंद्र फुलपगार यांच्याहस्ते करण्यात आले. प्रथमच नऊ महिन्याचा ट्रेनिंग करून मी घरी परतलो आणि पहिला जीवना मधला ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे प्रती कृतज्ञता भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगरसेवक विनय भावे, भागवत चौधरी, प्रकाश पाटील, सुखदेव महाजन, भानुदास विसावे, नंदु पाटील, पदाधिकारी छोटू जाधव, प्रकाश जाधव, रवी जाधव, कमलेश बोरसे, सतीश बोरसे, हेमंत चौधरी, बाळू जाधव, रवी सोनार, भगवान माळी, गजानन माळी, दीपक महाले, गोपाल माळी, किरण अग्निहोत्री, प्रवीण निकम, विजय बडगुजर, सुरेश पारधी, किरण…

