जळगाव प्रतिनिधी । तुमचे सिमकार्ड बंद होणार असल्याचे सांगून गणपती नगरातील एकाची केवायसीच्या नावाखाली ७४ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. यशोधन अरूण व्यवहारे (वय-४६) रा. गणपती नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार २७ जानेवारी रेाजी सायंकाळी ५ वाजता ते घरी असतांना त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मोबाईल समिकार्ड च्या केवायसीच्या नावाखाली कागदपत्रांची पुर्तता करण्याचे सांगून कस्टमर केअरला संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानुसार यशोधन व्यवहारे यांनी लागलीत दिलेल्या नंबरवर संर्क साधला असता अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर १० रूपयाचे रिचार्ज करण्याचे सांगितले. यासाठी एक…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाल्मिक नगरातील २८ वर्षीय महिला पती सोबत राहायचे नाही असे सांगून घरात कुणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. शनीपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश शिवाजी सपकाळे (वय-३०) रा. वाल्मिक नगर जळगाव हे पत्नीसह वास्तव्याला आहे. ते रिक्षा चालक असून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी रूपाती योगेश सपकाळे (वय-२८) रा. वाल्मिक नगर जळगाव हे शनिवारी २९ जानेवारी रोजी दुपारी घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेल्या आहे. त्यांचे पती योगेश सपकाळे यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू कोठेही आढळून आलेल्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर शुक्रवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोळन्हावी गावातील मुख्य चौकात यावल पोलिसाचे कर्मचारी सुशील घुगे हे शुक्रवार २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता गस्तीवर असताना विना नंबरचे असलेले ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असताना आढळून आले. पोलिस कर्मचारी सुशील घुगे यांनी ट्रॅक्टर थांबवून वाळू वाहतुकीची परवाना बाबत चौकशी केली असता ट्रॅक्टर चालक चेतन मच्छिंद्र सोळुंके वय-30 रा. कोळन्हावी ता. यावल यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. या कारणावरून पोलीस कॉन्स्टेबल यांनी ट्रॅक्टर यावल पोलिसात…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील सांगवी येथील १९ वर्षीय तरुणी घरात काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवार २८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसा, पूजा धनराज बाविस्कर (वय-१९) रा. सांगवी बुद्रुक ता. यावल जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहते. शुक्रवार २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कोणाला काहीही न सांगता राहत्या घरातून निघून गेली. नातेवाईकांनी दिवसभर आणि सायंकाळपर्यंत शोधाशोध केली परंतु तरुणी कुठेही आढळून आली नाही. यासंदर्भात धनराज दगडू बाविस्कर (वय-४५) रा. सांगवी ता. यावल यांनी यावल पोलिसात धाव घेऊन माहिती दिली. याबाबत यावल…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुक्यातील एका गावात येथे 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना १४ जानेवारी रोजी घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला शनिवार नशिराबाद पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने फिर्याद दिली की, १४ जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी परमानंद कैन्हैया गोरे (वय 24 रा. गुलई ता. खालवा जि. खंडवा, मध्यप्रदेश याने ४ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिला खेळण्याच्य बहाण्याने तो रहात असलेल्या पत्र्याच्या खोलीत बोलावुन घेवुन लैगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा मध्यप्रदेशात असल्याची गोपनिय…
पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासह विविध विकासकामांचे लोकार्पण लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : गाव कारभार्यांचा कारभार चांगला असल्यास गावचा विकास गतीने होतो. ” आमचं गाव, आमची एकी, अजून बरंच काम बाकी ” हा ध्यास घेऊन काम केलेल्या कारभार्यांच्या गावांनी विकासाचे तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रात लौकीक मिळविला आहे. प्रत्येक गाव कारभाऱ्यानी निर्धार केल्यास आदर्श गाव होऊ शकते. हाच निर्धार सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी करावा असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ना. गुलाबराव पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यांनी विकासाचा निर्धार करण्याचे आवाहन केले. टीकाकारांनी टिका करण्या आधी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगितले. हिंगोणे गावाला व्यायामशाळा साठी 10 लक्ष, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 22 लाख मंजूर करणार असल्याचे…
जळगाव प्रतिनिधी । दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने एक महिन्याचा सश्रम कारावास आणि १ हजार रूपयांचा दंड जळगाव जिल्हा न्यायालयाने ठोठावला आहे. उमर शहा रोशन शहा रा. जळगाव असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागात एक दाम्पत्य राहत आहे. सन २०१७ मध्ये (नक्की तारीख माहित नाही) विवाहिता ही घरात एकटी असतांना आरोपी उमर शहा रोशन शहा रा. जळगाव हा महिलेच्या घरात घुसून वाईट हेतूने तिचा हात पकडून विनयभंग केला. विवाहितेने आरडाओरड केल्यानंतर विवाहितेचा पती पती धावत आला. विवाहितेला हात का लावला असा जाब विचारला असता आरोपी उमर शहा रोशन शहा याने…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अनैतिक संबंधातून शहरातील एका भागातील राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाचा ममुराबाद रोडवर गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. दोघांना शनिवारी २९ जानेवारी रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरातील एका भागात राहणारा मयत ३५ वर्षीय तरूण आपल्या आईवडील, पत्नी व भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. ममुराबाद रोडवर मयत तरूणाचा मृतदेह २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता आढळून आला होता. पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी गळा आवळून खून करण्यात आल्याचा अहवाल यांनी दिला. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील जूने जळगावातील तेली चौकातील तरुणाने घराच्या दरवाजाच खिडकीला दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जुने जळगावातील तेली चौकातील रहिवासी विजय नामदेव खडके (वय-३१) हा तरुण रेमंड कंपनीत नोकरीस होता. गेल्या काही वर्षांपुर्वी आजारपणामुळे त्याच्या आई वडीलाचे निधन झाले आहे. त्यामुळे तो एकटाच घरात वास्तव्यास होता. आज सकाळच्या सुमारास विजय याने घराच्या दरवाज्याच्यावर असलेल्या खिडकीला दोरीच्या गळङ्गास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय याने गळफास घेत आपली…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील। येथील संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ, मोठा माळीवाडा यांच्या वतीने शहरातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील प्रतिभावंतांचा गौरव सन्मान सोहळ्याचे शुक्रवार २८ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले. या सन्मान सोहळ्याचे प्रस्ताविक माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाज पंच मंडळाचे समाज अध्यक्ष विठोबा महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून लोकसभेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माळी समाजाचे उपाध्यक्ष निंबाजी महाजन, सुखदेव महाजन, सहसचिव डिगंबर महाजन, मा.सचिव दशरथ महाजन, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, सुरेखाताई महाजन, प्रा. कविता महाजन, गटनेते कैलास माळी सर, आर.डी. महाजन सर, लहान माळीवाड्याचे विश्वस्त…

