Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव हादरले : वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणांनी संपविले आयुष्य; कारण गुलदस्त्यात !
    क्राईम

    जळगाव हादरले : वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणांनी संपविले आयुष्य; कारण गुलदस्त्यात !

    editor deskBy editor deskAugust 28, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तरुणांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवार दि. २७ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये निखील सुनिल पाटील (वय ३४, रा. सदोबानगर) व राजन सुकलाल बारी (वय २८, रा. जुने जळगाव) या दोघांचा समावेश असून दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी एमआयडीसी व शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    शहरातील सदोबा नगरात राहणारे निखील पाटील हे एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात कामाला होते. गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ते महामार्गालगत असलेल्या हॉटेल त्रिमुर्तीजवळ दुकानाचे गोडावून असून निखील पाटील हे दुकानातून गोडावूनमध्ये वस्तू घेण्याकरीता आले होते. याच वेळी सामान पॅकींग करणाऱ्या प्लास्टीकच्या पट्टीने त्यांनी गोडावूनमधील लोखंडी अँगलला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. बराच वेळ झाला तरी निखील पाटील हे परतले नाही तसेच वारंवार कॉल करुन देखील ते प्रतिसाद देत नसल्याने दुकानातील कामगार हा गोडावून आला. त्याला निखील पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

    घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह खाली उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करुन निखील पाटील यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    दुसऱ्या घटनेत शहरातील जुने जळगाव परिसरात राहणारे राजन सुकलाल बारी (वय २८) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच, त्यांनी राजन बारी याला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहिण असा परिवार आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तडीपार असूनही सिद्धेश्वरनगरात वावर; पोलिसांच्या जाळ्यात निलेश काळे

    August 28, 2026

    हॉकर्सच्या प्रश्नासाठी उपमहापौर मनोज चौधरी मैदानात; खाऊ गल्लीची प्रत्यक्ष पाहणी!

    August 27, 2026

    आधी मुलगा बुडाला… वाचवायला गेलेले वडीलही बुडाले! अमळनेर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

    August 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.