Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हॉकर्सच्या प्रश्नासाठी उपमहापौर मनोज चौधरी मैदानात; खाऊ गल्लीची प्रत्यक्ष पाहणी!
    जळगाव

    हॉकर्सच्या प्रश्नासाठी उपमहापौर मनोज चौधरी मैदानात; खाऊ गल्लीची प्रत्यक्ष पाहणी!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 27, 2026Updated:August 27, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव शहर महानगरपालिकेला लागून असलेल्या खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या विविध प्रश्नांबाबत जळगाव शहर हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपमहापौर मनोज चौधरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी हॉकर्सच्या समस्या जाणून घेत त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

    निवेदनानंतर उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख दीपकभाऊ सूर्यवंशी, महानगर सरचिटणीस राहुल पाटील आणि उपायुक्त गोसावी यांच्या उपस्थितीत खाऊ गल्लीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी हॉकर्स संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

    सन २०१४ पर्यंत नोंदणीकृत असलेल्या तसेच नोटरीधारक हॉकर्सचा विशेष विचार करण्यात आला. संबंधित हॉकर्सना गोलाणी मार्केटच्या मागील बाजूस उपलब्ध जागेत व्यवस्थितपणे व्यवसायासाठी बसविता येईल का, याबाबत मनपा आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

    तसेच हॉकर्सना टेबल-खुर्च्या न ठेवता केवळ गाड्यांद्वारे व्यवसाय करण्याची परवानगी देता येईल का, याबाबतही मनपा प्रशासन, पदाधिकारी आणि हॉकर्स संघटनेची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

    “हॉकर्सचा व्यवसाय आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न कायम ठेवत जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रशासन आणि हॉकर्स यांच्यात समन्वय साधून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

    हॉकर्सची उपजीविका आणि शहराची स्वच्छता यांचा समतोल साधण्यासाठी मनपा प्रशासन व हॉकर्स संघटनांमध्ये समन्वयाने तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

    यावेळी मोहन तिवारी, दिनेश हिंगणे, शुभम जाधव यांच्यासह खाऊ गल्लीतील हॉकर्स बांधव उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!

    September 13, 2026

    रूपाली महाजन यांनी घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद; शहर विकासासाठी दिला महत्त्वाचा सल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.