जळगाव : प्रतिनिधी
शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास पुलाचा भराव खचल्याने सध्या महामार्गावरील संपूर्ण वाहतूक शहरातून वळवण्यात आली आहे. यामुळे जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवार दि. २० रोजी पहाटेच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी hue 1 जाणाऱ्या योगेश ऊर्फ युवराज कडून महाजन (वय ३८, रा. इच्छादेवी चौक) या तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बांभोरी पुलाजवळ घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ईच्छादेवी चौकात राहणारा योगेश उर्फ युवराज महाजन यांची इच्छादेवी चौकातच नाश्त्याची गाडी लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास दुचकारीने पाळधी येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी जाण्याकरीता निघाले. घरापासून काही अंतर पार केल्यानंतर गिरणा नदीवरील बांभोरी पुलाजवळ एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योगेश यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर संवेदनाहीन अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून तत्काळ वाहन घेवून पसार झाला.
योगेश महाजन यांची इच्छादेवी चौकातच नाश्त्याची गाडी होती. त्यांची साईबाबांवर नितांत श्रद्धा असल्याने दर गुरुवारी पाळधी येथे साईबाबांचे दर्शन घ्यायचे आणि त्यानंतरच आपली नाश्त्याची गाडी उघडायची, असा त्यांचा नित्यक्रम होता. दि. २० ऑगस्ट रोजीही ते पहाटे लवकर उठून, आंघोळ करून दर्शनासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, देवाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांच्यावर दुर्देवी काळाने झडप घातली.



