Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुटख्याने भरलेली पिकअप धडकली अन् जीव गेला!
    क्राईम

    गुटख्याने भरलेली पिकअप धडकली अन् जीव गेला!

    editor deskBy editor deskAugust 21, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोडवड : प्रतिनिधी 

    महाराष्ट्रात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध असतानाही काही भागांत परराज्यातून चारचाकी वाहनांच्या माध्यमातून गुटख्याचा पुरवठा होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे बंदीच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    दरम्यान बोदवड येथे गुटख्याने भरलेले चार चाकी वाहन भरधाव वेगाने बोदवडहून जामनेरकडे जात असताना संध्याकाळी ६:३० मि. शेलवड घाटीमध्ये बोलेरो पिकप (एमएच जीसी२९६७ दुचाकी स्वार मोटरसायकल (एमपी ६८ झेडपी ५८८१) पल्सर गाडीला धडक देऊन जागीच मृत्यू झाल्याची बातमी उघडकीस आली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली व गुटख्याने भरलेली गाडी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले. मध्य प्रदेश राज्यातून गुटख्याची सर्रास चार चाकी वाहनातून वाहतूक करून तो स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी पोहोचविला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः चारचाकी वाहनांचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, संबंधित मार्गांवर तपासणी वाढविण्याची मागणी होत आहे. गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अन्नसुरक्षा नियमांनुसार तंबाखू व निकोटीनचा अन्नपदार्थांमध्ये घटक म्हणून वापर करण्यास मनाई आहे.

    दरम्यान, गुटख्याची वाहतूक किंवा विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधित यंत्रणांनी नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलीस तसेच संबंधित तपासणी यंत्रणांनी संशयित वाहनांची तपासणी करून या प्रकाराला आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मैत्री नाकारली अन् तरुणाचा संताप अनावर : मध्यरात्री घरासमोर गोंधळ, जीवे मारण्याची धमकी

    August 21, 2026

    बांभोरी पुलाजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; योगेश महाजन ठार

    August 21, 2026

    शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर : ‘बड्या’ संस्थाचालकांनाही चौकशीच्या कक्षेत आणा; जळगावात संशयित कर्मचाऱ्यांचे वेतन पडताळणीनंतरच !

    August 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.