धरणगाव तालुक्यातील चमगांव येथील सौ. वैशाली ललित सावंत यांचे शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी मुंबई येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच चमगांव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्या श्री. नारायण शेनू सावंत यांच्या सुनबाई तर श्री. ललित नारायण सावंत यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, कुटुंबीय व मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून, चमगांव ता. धरणगाव येथून निघणार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत असून, अनेकांनी सावंत परिवाराच्या दुःखात सहभाग नोंदविला आहे.



