Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जुन्या घरगुती वादातून तरुणावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार !
    क्राईम

    जुन्या घरगुती वादातून तरुणावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार !

    editor deskBy editor deskApril 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जून्या घरगुती वादातून सागर सुपडू पाटील (वय २६, रा. शिरसोली प्र.न. ता. जळगाव) याच्यावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील शिरसोली येथे राहणारे सागर पाटील यांना दि. १९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास जून्या घरगुती वादातून गोविंदा पाटील व त्यांच्या साडूची मुलगी निकीता पाटील आणि मुलगा प्रशांत गोविंदा पाटील यांनी मारहाण केली. या मारहाणीत गोविंदा पाटील याने कुऱ्हाडीने सागरच्या डोक्यावर तर निकीता पाटील हीने विळ्याने वार करीत गंभीर जखमी केले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी देखील मारहाण करण्यात आली. जखमी सागर पाटील यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दि. २१ एप्रिल राजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ धनराज गुळवे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026

    चुंचाळेत बेकायदेशीर बियाणे विक्री उघड; एक आरोपी गजाआड

    April 23, 2026

    रुद्राक्षाचा चमत्कार दाखवत वृद्धाला लुबाडले;भोंदूंची जळगाव बसस्थानकात करामत

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.